माकडांच्या हातात मोबाईलचं खोकडं …
माकडांच्या हातात मोबाईलचं खोकडं … तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ! आता हे काय नवीन. पण तुम्ही जे वाचताय ना, ते खरंच आहे. जर माकडांच्या हातात मोबाईल दिला, तर ते माकड, त्या मोबाईलचं काय करेल ? हे तुम्हाला सांगण्याची मुळीच गरज नाही. कारण माकड हा प्राणी. त्यामुळे मोबाईल चालवायचा कसा, याचे ज्ञान त्यास नसल्यामुळे तो त्या मोबाईलचे काहीही करेल, त्याला हवं तसं करेल. तसंच जगामध्ये सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातले असतांना. प्रत्येकजण आपला जीव वाचण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यात भर म्हणून अशीच काही माकडं आपल्या समाजामध्ये आहेत. जे समाजाची दिशाभूल करण्यासाठी सज्ज असून याच मोबाईलच्या खोकडयाचा वापर वाईट पध्दतीने करत आहेत. देशात काय परिस्थिती आहे. याचं गांभिर्य व भान असल्याचं या माकडांना मुळीच दिसून येत नाही. परिस्थितीचं गांभिर्य लक्षात आलं असंत तर यांनी असं केलं नसतं मुळीच. जीवावर बेतण्याची परिस्थीती निर्माण झाली असतांना व्हॉटसॲप, टिकटॉक, फेसबुक, इन्सटाग्राम, टेलीग्राम व इतर सोशल मिडयाचा वापर करुन काहीजण अफवा पसरवणे, चुकीच्या माहितीचा प्रसार व प्रचार करणे, एखादा संदेश समाजामध्ये ते...