हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीच ...

हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीच ...

संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे, हा व्हायरस आला कसा यावर चर्चा करण्यापेक्षा, आता प्रत्येकाला आपला जीव वाचवण्याची भ्रांत पडली आहे. या रोगाची सुरूवात चीन देशात झाली. वुहान शहरामध्ये या रोगाची सुरूवात झाली असून यामध्ये अनेकजण मृत्यूमुखी पडले. तसा तसा याचा प्रसार संपूर्ण जगामध्ये वार्‍याच्या वेगाप्रमाणे पसरतोय व अनेकांचे जीव घेतोय. जीव गेलेल्या व्यक्तीचा देह सुध्दा पाहणं, त्यावर अंत्यसंस्कार करणं याचं सुध्दा भाग्य त्या परिवाराला मिळत नाही. याचं कारण म्हणजे हा रोग संसर्गजन्य आहे. या महामारीमुळे संपुर्ण जगामध्ये कडेकोट बंद पाळण्यात येतोय. प्रत्येक देशामध्ये किडयामुंग्यांसारखे लोक मरत असल्यामुळे आपापल्या स्तरावर रुग्णांची काळजी घेतली जात आहे. प्रशासन आपापल्या स्तरावर नागरीकांची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेवून देशवासीयांच्या आरोग्याची काळजी घेत आहे व मिडीया व सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करत आहे. जेणे करुन मृत्यूदर कमी व्हावा. त्याप्रमाणे नैतिक जबाबदारी म्हणून आपणही आपापल्या पातळीवर प्रशासनाला सहकार्य करणे कर्तव्य आहे. आज संपूर्ण देशात कडेकोट बंद असल्यामुळे यामध्ये प्रत्येकाचे हाल होणार आहेत. प्रत्येकालाच त्रास होणार आहे. काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा सुध्दा भासेल किंवा इतर कोणात्याही प्रकारच्या समस्या उद्भवतील. पण खचून न जाता आपल्या जीवासाठी, आपल्या परिवारासाठी देशातील जनतेच्या आरोग्यासाठी कोरोनामुक्त देश व्हावा यासाठी या लढ्यामध्ये शंभरटक्के प्रत्येक नागरीकाची नैतीक जबाबदारी आहेच. आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री, पोलीस यंत्रणा, डॉक्टर्स, नर्स, दवाखान्यातील इतर कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी ताई, मदतनीस, काही शिक्षक, शिक्षीका व इतर संबंधीत सर्वजण जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करण्यासाठी आज घरदार सोडून रस्त्यावर आहेत. त्यांनाही आपण सर्वांनी मिळून सहकार्य करायला हवे. तसेच त्यांना त्रास होईल किंवा प्रशासकीय स्तरावर कुठल्याही प्रकारचा अडथळा व अडचण आपल्यामुळे होणार नाही याचीही काळजी आपण स्वतः घेतली पाहिले व इतरांनाही याबाबत सांगितले पाहिजे. कोरोना व्हायरसने आजपर्यंत अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. तरीही काही लोक तोंडाला मास्क, रुमाल न लावता फि रतांना दिसत आहेत. त्यांना स्वतःची, त्यांच्या परिवाराची काळजी नसेल का हा खुप मोठा चिंतेचा विषय व विचार करायला लावणारी बाब आहे. देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देश एकवीस दिवसांसाठी बंद केला आहे. सर्वत्र 144 कलम लागू केले आहे. संचार बंदी कायदा लागू केला आहे. तरी पण काही उतावीळ लोकं मात्र घरी बसायला तयार नाहीत. देशावर एवढं मोठं संकट आलं काही ही बाब गांभीर्यानं घेण्याचे सोडून बिनधास्त रस्त्यावर काहीतरी शुल्लक कारण सांगुन रस्त्यावर फि रत असतांना दिसून येत आहेत. तसेच सोशल मिडीयावरही कोरोना व्हायरस संदर्भात अनेक खोटे व लक्ष विचलीत करणारे तसेच गैरसमज पसरवणारे व भीती निर्माण करणारे संदेशाचे एकमेकांना हस्तांतरण होत आहे. हे आधी थांबले पाहजे. मोबाईल हातात आहे म्हणून आलेले संदेश न शहानिशा करता पुढील ग्रुपवर किंवा इतरांना पर्सनल न पाठवता त्यावर आळा घालण्याचे काम प्रत्येकाने वैयक्तिकरित्या करायला हवे. कोरोना हा व्हायरस किती गंभीर आहे. तो एवढा गंभीर आहे की, तो जीवाशी बेतेल एवढा गंभीर आहे याचंही भान सर्वांनी ठेवायला हवे. त्याचा उगाच बाउ करणे किंवा सोशल मिडयावर त्याबाबत मजाक करणे, त्याचे विनोद तयार करणे हे न शोभणारे आहे. शहाण्यांनी असं करणे म्हणजे बौध्दीक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे यातून दिसून येते. गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठया देशांमध्ये शहरांमध्ये आपले बांधव, भगिनी, विद्यार्थाी अडकले आहेत. त्यांना सोडवणे त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे यासाठीसुध्दा सेवाभावी संस्था, विविध माध्यमांनी यावर प्रकाश टाकून देशातील कोणीही उपाशी राहून नये याबाबत काळजी घेतली पाहिजे व तशा प्रकारच्या उपाययोजना आपापल्या स्तरावर ही करायला हव्यात. जेणेकरुन अशा परिस्थीतीमध्ये ऐकमेकांना सहाय्य होईल. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी इतर गरजुंना पैशांची मदतही वेळोवेळी केली तर यापेक्षा मोठी समाजसेवा कोणतीही नाही. ज्या समाजामुळे आपण दान धर्म करण्यास योग्य झालो आहोत. त्यांनी समाजाचे काही देणे दिले तर कुठेही बिघडणार नाही. प्रत्येक गोष्टीला अंत आहे. ही वेळ सुध्दा निघून जाईल व सर्वकाही पुर्ववत होईल या आशावादी विचारांचे पालन करुन उद्याचा दिवस सर्वांसाठी नक्कीच आशावादी असेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये माणूसच माणसाच्या कामी येतो हे अधोरेखीत वाक्य येणार्‍या काळात सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे. कारण सध्याचा काळ असाच आहे की, माणूसच माणसाच्या मदतीला जाती धर्माच्या रेषा ओलांडून धावून जाणार आहे. एवढी परिस्थीती जर लवकरात लवकर टळली तर आणखीन एक अत्यंत महत्वाची बाब सर्व बुध्दीवादी नागरीकांनी लक्षात घ्यावी. मुक्या जनावरांवर दया करावी. त्यांंच्या हत्या थांबवाव्यात. जास्तीत जास्त प्रमाणात मनावर ताबा ठेवून मांसाहार न करता शाकाहारी व्हावे. चीन देशामध्ये आपण सोशल मिडीयावर पाहिले तर जगाच्या पाठीवरचा किटकांपासून ते सर्वच पशु, पक्षी विषारी जीवांची कत्तल करुन तशा प्रकारचा मांसाहार करुन ताव मारतांना आपण बर्‍याच चित्रफ ीती पाहील्या असतीलच. त्यामुळे अशा प्रकारांपासून आपण सावधानी केली पाहिजे. प्रोटीन्स मिळण्याठी जीवसृष्टीवर अनेक  खाद्यपदार्थ आहेत. त्याचे जास्तीत जास्त सेवन केले पाहिजे. जगाच्या पाठीवर व्यसनांध करणार्‍यांची संख्या अमाप आहे. त्यामुळेही मानवाचे मृत्यूच्या प्रमाणात आधीच वाढ झालेली आहे. खाद्यपदार्थ विकातंना, तयार करतांना, शेतामधील किटकनाशकं, याची काळजी आपण घेतली पाहिजे जेणेकरुन तुटपुंजा मिळकतीसाठी निष्पाप जीवांशी जीवघेणा खेळ थांबेल. रस्त्यावरील अन्नपदार्थ आपण चवदार व चांगले म्हणून खातो, पण त्यापासून होणारे आजार या बाबीकडेही यापुढे लक्ष द्यायला हवे. मात्र काहीजणांकडे याशिवाय पर्याय नसतो त्यांच्यासाठी विक्रेत्यांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. अन्न व भेसळ प्रशासनाच्या ज्या ज्या जबाबदार्‍या आहे त्यांनी नैतीकतेने यापुढे पार पाडायला हव्यात. तरच येणार्‍या काळात माणूस अरोग्यसंपन्न आयुष्य जगू शकेल. स्वतःच्या हव्यासापोटी इतर निष्पाप जीवांशी जीवघेणा खेळ खेळण्याचा अधीकार कोणासही नाही. निसर्गाशी दोनहात करण्याचा विचार कराल तर कोरोनासारखे जीवघेण्या रोगांचा भविष्यकाळात आजूनही भयानक असा सामना माणसाला करावा लागेल. म्हणूनच सर्वांनी निसर्गाशी निसर्गाने लावून दिलेल्या नियमांप्रमाणेच रहावे. जीवन अतिशय सुंदर आहे. ते सुंदर पध्दतीने जगले पाहिजे. त्याचा आनंद घेतला पाहिजे. निसर्गाने दिलेली देणगी म्हणून आयुष्य व हे आयुष्य पुन्हा पुन्हा होणे नाही. याचा नीट गांभीर्याने विचार कराच.
-         शंकर चव्हाण, अंबाजोगाई 9921042422

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..