जीवंत रहायचे असेल तर घरातच बसा; दीड जीबी वाल्यांनो उगाच वळवळ करु नका

जीवंत रहायचे असेल तर घरातच बसा;
दीड जीबी वाल्यांनो उगाच वळवळ करु नका.

आपल्या देशातील नेटकर्‍यांनी कोरोना वर विनोद करण्याची हद्दच पार केली आहे. जणू काही यांच्या एकट्यावरच हे जागतिक संकट आलं आहे. यांच्या डोक्यात अजूनही विनोदाचे फवारे सोशल मिडीयावर सुरूच आहेत. कोरोना या व्हायरसमुळे जगामध्ये कित्येकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मात्र भारतामध्ये अजूनही या गंभीर व्हायरसला गांभिर्याने घ्यायला नेटकरी मुळीच तयार नाहीत. काही दीडशहाण्या दीडजीबी वाल्यांमुळे अफूची गोळी असलेल्या सोशल मिडीयावर बावळटांकडून उगाच नको त्या गोष्टींचा बाऊ होतांना दिसत आहे. यांनी कोरोना या व्हारसची गांभिर्याने दखल जर घेतली नाही तर येणार्‍या काळात शासनाला नक्कीच ठोस पावलं उचलावी लागतील. संचार बंदीच्या काळात नियमाचं पालन न करणे, उगाच घराबाहेर फेरफटका मारणे, विनाकरण गाड्या घराबाहेर नेउन मला कहीच होत नाही असा डायलॉग मारणे, अशा प्रकारचे विविध चाळे हे दीडशहाणी मंडळी करातंना दिसत आहे. माकडांच्या हातातल्या खोकड्यात दीड जीबी भरल्यामुळे हे अतिउत्साही माकडं उगाच वळवळ करतांना सोशल मिडीयावर पहावयास मिळत आहेत. शासन स्तरावर बेंबीच्या देठापासून वेवेगळया पध्दतीने जनजागृती करुन जीवंत रहायचे असेल तर घरातच बसा म्हणून ओरडून ओरडून विविध माध्यमांद्वारे सांगत आहेत. परंतू कोणी ऐकेल तर शप्पथ. कित्येकांच्या बुडाला पोलीसांचे दांडके सुध्दा पडलेत तरी हे वठणीवर येण्याचे नावच घेत नाहीत. येणार्‍या काळात कोरोनासारख्या महाप्रलंयंकारी व्हायरसपासून आपल्या सर्वांना, आपल्या परिवाराला, देशाला वाचवायचे आहे. त्यासाठी शासनाला व स्वतःचा जीव वाचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. जेणेकरुन कोरोनावर मात करण्यासाठी मदत होईल. हातात मोबाईल आहे म्हणून कोणाचीही दिशाभूल करुन नका, खोटे मेसेज इतरांना पाठवू नका, शहानिशा न करता खात्री झाल्याशिवाय उगाच इकडून तिकडे मेसेज फॉरवडर्र् करु नका, अधिक पुस्तके वाचा व आपले स्वतःचे मस्तक सशक्त करा. आनंद माना की, एवढा वेळ आपण या आधी उभ्या आयुष्यात घरी आपल्या परिवारासोबत कधी घालवलाय का ? या संधीचा फायदा करुन घ्या व घरातच बसा. डॉक्टर, पोलीस व इतर कोरोनाशी लढाई करणारे देशसेवकांना सहकार्य करा. तरच आपण कोरोनाची लढाई जिंकू शकू. खरंच हे ही दिवस जातील. स्वतःवर विश्वास ठेवा.

- शंकर चव्हाण, अंबाजोगाई  9921042422

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?