अंबाजोगाईचा सांस्कृतिक वारसा जपणारे कलावंत, सोशलमिडीयावर नेटकर्यांना मिळतोय सदाबहार गाण्यांचा अस्वाद
अंबाजोगाईचा सांस्कृतिक वारसा जपणारे कलावंत सोशलमिडीयावर नेटकर्यांना मिळतोय सदाबहार गाण्यांचा अस्वाद अंबाजोगाईचा इतिहास पाहिला तर अंबाजोगाईचा इतिहास प्रचंड मोठा आहे. अंबाजोगाईने अनेक कलावंत घडवले आहेत. अंबाजोगाईने महाराष्ट्राला अनेक कलावंत दिले आहेत. अंबाजोगाई शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी तर आहेच शिवाय अंबाजोगाई कलावंतांची खान आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. अंबाजोगाईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे कलावंत अंबाजोगाईच्या खानीत नव्याने तयार होत आहेत व झालेही आहेत. तरुण पिढी ही संगीत क्षेत्राकडे वळतेय हे पाहून आपल्या भुवया नक्कीच उंचावतील व ही बाब अभिमानाची व कौतुकाची आहेच. विविध क्षेत्रातील आपापल्या जबाबदार्या पार पाडून हे सर्व कलावंत संगीत क्षेत्रातही आपला ठसा नव्या जोमानं उमटवत आहेत. ही अंबाजोगाईकरांसाठी अभिमानाची बाब आहे. काही कलावंतांनी संगीत क्षेत्रात स्वतःला इतके वाहून घेतले आहे की, आता गाणंच त्यांचा श्वास बनला आहे. संगीत क्षेत्रातही अनेक कलावंत विविध कलागुणांनी समृध्द असल्याने त्यांचे अनेक पैलू पहावयास मिळतात. आपल्या सर्वांना वरदान ठरत असेलेली सोशल मिडीया जसं एक...