अंबाजोगाईचा सांस्कृतिक वारसा जपणारे कलावंत, सोशलमिडीयावर नेटकर्‍यांना मिळतोय सदाबहार गाण्यांचा अस्वाद


अंबाजोगाईचा सांस्कृतिक वारसा जपणारे कलावंत
सोशलमिडीयावर नेटकर्‍यांना मिळतोय सदाबहार गाण्यांचा अस्वाद 
अंबाजोगाईचा इतिहास पाहिला तर अंबाजोगाईचा इतिहास प्रचंड मोठा आहे. अंबाजोगाईने अनेक कलावंत घडवले आहेत. अंबाजोगाईने महाराष्ट्राला अनेक कलावंत दिले आहेत. अंबाजोगाई शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी तर आहेच शिवाय अंबाजोगाई कलावंतांची खान आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. अंबाजोगाईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे कलावंत अंबाजोगाईच्या खानीत नव्याने तयार होत आहेत व झालेही आहेत. तरुण पिढी ही संगीत क्षेत्राकडे वळतेय हे पाहून आपल्या भुवया नक्कीच उंचावतील व ही बाब अभिमानाची व कौतुकाची आहेच. विविध क्षेत्रातील आपापल्या जबाबदार्‍या पार पाडून हे सर्व कलावंत संगीत क्षेत्रातही आपला ठसा नव्या जोमानं उमटवत आहेत. ही अंबाजोगाईकरांसाठी अभिमानाची बाब आहे. काही कलावंतांनी संगीत क्षेत्रात स्वतःला इतके वाहून घेतले आहे की, आता गाणंच त्यांचा श्वास बनला आहे. संगीत क्षेत्रातही अनेक कलावंत विविध कलागुणांनी समृध्द असल्याने त्यांचे अनेक पैलू पहावयास मिळतात. आपल्या सर्वांना वरदान ठरत असेलेली सोशल मिडीया जसं एकमेकांना कनेक्ट ठेवत आहे. तसंच हे कलावंत याच सोशलमिडीयाच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी आजही थेट कनेक्ट आहेत. त्यांच्या कलेचा अविष्कार नेटकर्‍यांना रोजच पहावयास मिळतोय. टिकटॉक, स्टारमेकर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम, ट्विटर व इतर सोशलमिडीयावर या कलावंतांनी गायलेल्या सदाबहार गाण्यांचा अस्वाद आता नेटकर्‍यांना घेता येतोय. सोशल मिडीयावर मराठी, हिंदी तसेच शास्त्रीय गायणाचा अस्वाद अंबाजोगाईकरांसोबतच अख्या महाराष्ट्राला मिळतोय. त्यामुळे सर्वच स्तरातून या कलावंतांचे कौतुक होत आहे. हे कलावंत संगीत क्षेत्रातले उद्याचे भावी स्टार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरु नये. आपापला व्यवसाय, नौकरी, शाळा, कॉलेज व पोटापाण्यासाठी कामं करुन या क्षेत्रातही अनेक कलावंतांनी आपल ठसा उमटवला आहे. त्यामध्ये सुभाष शेप हे अनेक वर्षांपासून सर्वांना परिचित असणारं गायन क्षेत्रातलं खुप जुनं  नाव आहे. त्यामुळे अंबाजोगाई तसेच पंचक्रोशीतील जवळपास सर्वजण या कलावंतास ओळखतात. जिथं घुसतंया मराठयाचं पोर फे म अभिजित जाधव त्यांच्या विविध हटके गाण्यांमुळे संपूर्ण राज्याला परिचीत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला सह्याद्री वाहीनीच्या माध्यमातून प्रसिध्द झालेले गायक  बळीराम उपाडे, तालमार्तंड प्रसिध्द तबला वादक प्रकाश बोरगांवकर, शिवदास देगलूरकर यांचे शिष्य प्रसाद कुलकर्णी, जहांगीर ऑर्ट गॅलरीत ज्याचं प्रदर्शन भरलं व महराष्ट्राचं तसेच अंबाजोगाईचं नाव देशात झळकलं असे नेताजी यादव, अत्यंत कमी वयात गायनाची अवड असलेले व अल्पावधीतच प्रसिध्द झालेले महादेव माने, ज्याच्या गोड आवाजामुळे त्याची ओळख आहे असे शंकर गुट्टे, गायक आसाराम जोशी, पत्रकारिता करत करत ज्यांची नुकतीच गायन क्षेत्राकडे वाटचाल सुरु झाली व त्यांनी किशोर कुमार, महंम्मद रफी, यांच्यासारख्या महान गायकांच गाणी अगदी सुरात गायला सुरुवात केली असे संपादक परमेश्वर गित्ते, इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष तथा प्रसिध्द मानसोपचार तज्ञ, वैद्यकीय, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे
डॉ. राजेश इंगोले हे सुध्दा अनेक गाणी अगदी तंतोतंत सुरात गायन करतात, अंबाजोगाई येथील पिताजी सारडा नगरी येथीर कामकाज सांभाळून स्टारमेकर अ‍ॅपवर जे स्टार अगदी सुरात व छान गायन करतात असे अमित वर्मा-जैन, विशाल लोंढे, महेश गित्ते, डॉ मुक्तार शेख, बोरगांवकर घराण्याचं नाव पुढे नेणारी गोड गळयाची श्रुती बोरगांवकर, अष्टपैलू व्यक्तीमत्व असणारे नेताजी यादव यांची कन्या श्रेया नेताजी यादव, सुरेख गोड आवाज असणारी सर्वात लहान अशी बालगायीका सृष्टी शंकर चव्हाण. अशी अनेक नावं अंबाजोगाच्या मातीत नव्यानं  संगीत क्षेत्रात पाउल टाकत आहेत. अंबाजोगाई हे विद्येचं माहेरघर आहे, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक वारसा जपत असलेले अंबाजोगाई शहराच्या योगदानात आता या कलावंतांचे योगदान मोलाचे ठरत आहे. भाविष्यात राज्य तसेच देशपातळीवर अंबाजोगईचे नाव हे कलावंत भूषवतील यात शंक्काच नाही. देव जसा भक्तीचा भुकेला असतो, तसंच प्रत्येक कलावंताला हवा असतो तो कौतुकाचा पाठीवर हात. सोशल मिडीयाच्या माध्यमातून या कलावंतांना आपण सारे मिळून नेहमीच कौतुक व प्रोत्साहन देउ. हीच त्यांच्या क्षेत्रात शिखर गाठण्याची पहिली पायरी ठरेल.

 - शंकर शेषेराव चव्हाण, अंबाजोगाई (संपर्क : 9921042422)

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..