आय.टी. इंजिनिअर ते यशस्वी उद्योजक ओमकार वायकर, तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व; नोकरी सोडून फ्लॉवर डेकोरेटर्सचे बनले मालक

आय.टी. इंजिनिअर ते यशस्वी उद्योजक ओमकार वायकर
तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व; नोकरी सोडून फ्लॉवर डेकोरेटर्सचे बनले मालक
क्षेत्र कोणतंही असो तिथं स्पर्धा आहेच, स्पर्धेमध्ये टिकूण रहायचं म्हटलं तर तेवढं बळ, सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. ते सामर्थ्य आपल्यामध्ये आहे असं जेव्हा ज्यांना कळतं ते स्पर्धेत टिकून राहतात आणि जिंकतातही. असंच एक उदाहरण म्हणजे ओमकार वायकर या अवलियाचं. म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, तसंच काहीसं करुन ओमकार यांनी एक आगळावेगळा आदर्श तरुणांसमोर ठेवला आहे. त्यांच्या या अनुभवातून बरंच काही शिकण्यासारखं तर आहेच शिवाय आय.टी क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी हे एक उत्तम प्रेरणेचा स्त्रोत ठरु शकतो. कारण असं एवढया लहान वयात असं पहिल्यांदाच झालंय असं म्हटलं तर वावगं ठरु नये. गाव नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील ओमकार विश्वास  वायकर हे नाव मुंबई नगरीमध्ये एका आयटी कंपनीत नोकरीला लागलं. त्यांनी नोकरी अगदी काही वर्षे म्हणजे अडीच वर्षे केली. नोकरी करतांना त्यांची काही तरी स्वत:चं करण्याची उर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांना सतत वाटायचं     आपणही स्वत:चं असं अस्तित्व निर्माण करायला हवं. पण काय करावं हा त्यांच्या पुढे मोठा पेच होता. मागील वर्षापूर्वी त्यांना असं उमजलं की, त्यांनी काय करावं हे शोधण्यापेक्षा आपल्या स्वत:जवळ काय कौशल्य आहेत याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याच गोष्टीचा व्यवसाय केला पाहिजे, जेणेकरुन त्या ज्ञानाचा फायदा होईल. सॉफ्टवेअर टेस्टींग या पलिकडचं त्यांना दुसर्‍या कोणत्याही क्षेत्रातलं ज्ञान फारसं नव्हतं. त्यांना अगदी लहानपणापासून फुलांची आवड होती. फुलं म्हणजे त्यांच्यासाठी जीव की प्राण. एवढी आवड फुलांची त्यांना होती.  वेगवेगळया फुलांची माहितीसुध्दा अगदी लहान वयापासूनच त्यांना होती. ओमकार वायकर यांचे वडील सुरुवातीपासून फुलांच्या दुकानावर मुंबईमध्ये काम करत होते.  अजूनही ते गावी फुलांच्या दुकानावर काम करतात. वडील काम करत असलेल्या क्षेत्रातच आपणही आपलं करीअर करण्याचं ओमकार वायकर यांनी ठरवलं  त्यांनी तशी त्या दिशेनं वाटचाल सुरु केली. त्यांची जिद्द म्हणजे त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ते पूर्णत्वाकडे नेल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. ही त्यांची सवय अगदी लहानपणापासूची आहे. ओमकार यांचे वडील विविध प्रकारचे फुलांचे हार बनवतात. त्यात वेगळेपण असं काही नव्हतं पण त्याच फुलांचे   वेगळेपणात रुपांतर करण्याची शक्कल ओमकार वायकर यांना सुचली. ग्राहकाला याच फुलांच्या माध्यमातून नाविन्य काय देऊ शकतो याचा विचार ओमकार वायकर हे करत होते. त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून अभ्यास करण्याची तयारी केली. फ्लॉवर्स रेजमेंट कसं करायचं, नवनवीन डिझाईन्स कशा बनवायच्या, त्याचे किती प्रकार आहेत. डेकोरेशन, इव्हेंट मॅनेजमेंट कसं असतं वगैरे वगैरे गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे हे काम एकटयानं कसं करणार. हा मोठा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे त्यांना या कामासाठी नविन व्यक्ती शोधयची होती. जेणेकरुन काम करण्यासाठी सोपे होईल व या क्षेत्रातली माहिती त्या व्यक्तीला असेल. आता त्यांना याच क्षेत्रात आपण काही तरी करु शकतो असं एकंदर वाटू लागलं होतं. ओमकार यांची बालमैत्रीण ओमकार यांचे वडील ज्या फुलांच्या दुकानावर कामाला होते. त्यांची मुलगी अंकीता राजेंद्र चव्हाण हिला ओमकार भेटले. नवीन व्यावसायासंदर्भात नियोजन कसे करावे यावर दोघांमध्ये चर्चा झाली. अंकीता चव्हाण या बायोमेडीकल क्षेत्रामध्ये कर्तव्यावर आहेत. त्यांनी हे सर्व ओमकार यांची कल्पना ऐकली व त्यांना ती आवडली तसेच त्यांनी लगेच होकार सुध्दा दिली. पण पुन्हा एक प्रश्न उपस्थित राहिला तो म्हणजे भांडवलाचा. व्यवसाय करण्यासाठी भागीदार मिळाला पण भांडवलाचे काय ? दोघांकडेही भांडवल नव्हते. घरातून कसल्याही प्रकारचे सहाय्य नसतांना व भांडवलाशिवाय हा व्यवसाय करणे कठीणच काम होते. मात्र त्या दोघांनी ठरवलं की व्यवायाय तर सुरु करायचाच आहे. ऍट एनी कंडीशन. त्यांनी असं ठरवलं की, पहिला टप्पा लोकांना माहिती झाल्याशिवाय कामं मिळणार नाहीत. त्यासाठी ते दोघं ऑफीस सुटल्यावर एक एक एरियामध्ये जावून विविध लोकांच्या भेटी घ्यायचे. आम्ही काम करुन देऊ असं सांगायचे. तिथे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काहीजणतर ऐकूण घेण्यासाठीसुध्दा तयार व्हायचे नाहीत. काहीजण तर उपलब्ध असुन सुध्दा उपलब्ध नाहीत म्हणून सांगायचे. भेटणे टाळायचे. असे विविध अनुभव त्यांना आले. त्यावेळेस त्यांना समजले की, ही मोठी माणसं आणि आम्ही दोघं लहान मुलांसारखे होतो. शिवाय या कामाचा त्यांना अनुभव सुध्दा नव्हताच. काही लोकांनी सकारात्मकता दर्शवली परंतू हाती आलेले काम शेवटी दुसर्‍याला दिले जायचे, त्यामुळे त्यांच्या हाती निराशाच आली. त्यामुळे ओमकार व अंकिता मानसिकतेने खचले. परंतू हार न मानता त्यानंतर त्यांनी फुल मार्केटचा अभ्यास केला व पूर्ण अभ्यास झाला तोवर नवरात्रीचा सण हातून निघून गेला होता. त्यानंतर दसरा सण येणार होता. ही संधी ओमकार यांना सोडायची नव्हती. त्यांनी झेंडू अर्थात गोंडा हे फुल दसरा ह्या सणाला जास्त प्रमाणात विकले जाणारे फुल आहे असे त्यांना उमजले. त्यांनी वडीलांना त्यांच्या गावी संपर्क केला व फुलांचा भाव   विचारला. तेव्हा मुंबईच्या फुलांचा भाव आणि गावाकडील फुलांचा भाव यात फरक होता. त्यामुळे गावाकडील फुलांची किंमत ही अल्प होती. म्हणून मुंबई फुल मार्केट पेक्षा अगदी स्वस्त दरात आणि घरपोच डिलिव्हरी देऊ असा मुंबईकरांना विश्वास दिला. त्याच विश्वासावर त्यांना विविध चार दुकानदारांकडून अकराशे किलो फुलांच्या मागणीची ऑर्डर मिळाली. ही त्यांच्या व्यवयासायची पहिली ऑर्डर होती. हीसुध्दा ऑर्डर त्यांनी पूर्णत्वास नेली व टेप्मोमध्ये माल भरणे, गाडी खाली करण्यापर्यंतची सर्व कामं स्वत: दोघांनी केली. अगदी तिथूनच त्यांच्या व्यवसायाची खरी सुरुवात झाली होती. त्यानंतर मार्केटिंग, लोकांना भेटणं, मिळणार्‍या नफ्याचा योग्य वापर करणं व या क्षेत्रातला अभ्यास ते करत राहिले व त्यांना मोठया प्रमाणात कामे भेटत गेली. आता ते जवळपास संपूर्ण मुंबईमध्ये कामं घेऊ लागले व ते पूर्णत्वास नेऊ लागले होते. शिवाय त्यांनी अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांसोबत संलग्नीकरण करुन कामं करण्यात यश संपादन केलं होतं. सोबतच ते स्वत:ही छोटे छोटे इव्हेंट मॅनेज करु लागले व त्यांच्या कंपनीचा विस्तार वाढत जाऊ लागला. सोशल मिडीयाचा वापर करुन लवकरच त्यांची स्वत:चे फर्म सुरु केले. त्यांनी गेल्या सहा ते सात महिन्यांमध्ये प्रीटी पेटल्स फ्लॉवर डेकोरेटर्स नावाने व्यवसायाचे नामकरण केले. योग्य अभ्यास, प्रॉडक्टचे योग्य ज्ञान, अभ्यासपूर्ण निर्णय, त्याची किंम्मत नफ्याचा योग्य उपयोग, बचत, सोशल मिडीयाचा योग्य वापर यामुळेच  हा त्यांचा व्यवसाय भविष्यात नक्कीच यशाचे शिखर गाठेल असा विश्वास एकूणच त्यांनी केलेल्या या धाडसामुळे समजतो. ओमकार यांनी आता आय.टी कंपनीमधील नोकरीसुध्दा सोडून पूर्ण वेळ हा व्यवसाय करण्याचं ठरवलं होतं व तसंच त्यांनी केलं सुध्दा.  भविष्याचा वेध घेत त्यांनी हे उचललेलं पाऊल तरुणांसाठी खरंच महत्वपूर्ण व प्रेरणा देणारं ठरेल. सोबत अंकितासारख्या मुलींनी सुध्दा अशा  प्रकारच्या व्यवासायसाठी धाडसी निर्णय घेणं सुध्दा तरुणींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल हे नाकारता येणार नाही. ओमकार वायकर व अंकिता चव्हाण यांच्या पुढील वाटचालीसाठी जयवंती टाईम्स परिवाराकडून उदंड व हार्दिक शुभेच्छा.
- शंकर शेषेराव चव्हाण, अंबाजोगाई (संपर्क : 9921042422)

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?