बील गेट्स म्हणतात …

जगातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बील गेट्स यांचा संगणक क्षेत्राच्या क्रांतीमध्ये सिंहाचा वाटा आहे. जगात यशस्वी असलेली मायक्रोसॉफ्ट विंडोज ही ऑरेटींग सिस्टीम साऱ्या जगातील संगणक प्रणालीच्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी सर्वांनाच उपयुक्त ठरली आहे. अनेकांनी कोटयावधी पैसा या माध्यमातून कमावला आहे. 'फोर्ब्स' जाहीर करत असलेल्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचा समावेश होत आला आहे. इ.स. २००९ पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. अमेरिका मधील न्यू मेक्सीको मध्ये त्यांच्या कंपनीचे मुख्यालय स्थित आहे. बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी यांनी सामाजिक जाणीवेतून एका एनजीओ सेवाभावी संस्थेची स्थापना केली असून त्या माध्यामातून गोरगरीब कष्टकऱ्यांना मदतीचा हात म्हणून समाजसेवा हा भला माणूस करतोय ही अत्यंक कौतुकास्पद गोष्ट आहे. बील गेट्स यांच्याकडून नवतरुणांना शिकण्यासाठी प्रेरणादायी खुप मोलाच्या गोष्टी आहेत. ते म्हणतात  “जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर त्यामध्ये तुमचा कसल्याही प्रकारचा दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो दोष नक्कीच तुमचा आहे” हे मान्य करावे लागले. कारण जन्म गरीब किंवा श्रीमंत कुटूंबात होणं हे आपल्या कोणाच्याच हातात नाही परंतू मृत्यू होण्यापुर्वी कष्ट करुन मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहचणं हे आपल्या हाती आहे. जीवनात येऊन पैसा कमावणे व श्रीमंत होणं हे आपल्या हातात आहे परंतू जर काहीच न करता आपण मेलो तर हा दोष तुमचा नक्कीच आहे असं जगातील श्रीमंत थोर व्यक्तीमत्व बिल गेट्से यांचं म्हणणं आहे. स्वत:ला कधीही कमी लेखू नका, स्वत:ची तुलना इतरांसोबत करु नका, सतत काही ना काही करत रहा. प्रयत्न करा यश नक्कीच मिळेल अशा विविध प्रेरणादायी गोष्टी बिल गेट्स नेहमीच तरुणाईपुढं ठेवत असतात. त्या आपण आत्मसात करुन जीवनाची वाटचाल करायला हवी. स्वत:वर विश्वास असला की जग जिंगता येतं असं म्हणतात. एकदा स्वत:वर विश्वास ठेऊन तर बघा आणि एखादं छोटं कठीण काम त्या जोरावर करुन पहा तुम्हाला ते काम झाल्याचे पाहून अध्यात्मिक समाधान तर मिळेच परंतू छोट्याशा यशाची अनुभूती अनुभवता येईल हे नक्की. अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं शोधून एक दिवशी नक्कीच तुम्ही मोठया यशावर पोहचाल. बिल गेट्स यांचा जीवनप्रवास खुप मोठा आहे त्यामुळे एवढ्याशा शब्दांमध्ये त्यांच्याबाबत लिहिणे अश्यक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आत्मचरित्र त्यांच्या यशोगाधा, त्यांनी लावलेले शोध यांविषयी विविध पुस्तकं, कादंबऱ्या , विविध लेख पुस्तकस्वरुपात उपलब्ध आहेत. तसेच इंटरनेटवरही त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल मोठया प्रमाणात साहित्य उपलब्ध असल्यामुळे आपण त्या साहित्याचा नक्कीच अस्वाद घेऊ शकता. तुम्ही बिल गेट्स यांच्याबद्दल प्रेरणादायी गोष्टी खुप मोठया प्रमाणात ऐकल्या असतीलही पण त्यांनी कमी वयात लावलेले शोध व त्यांची जिज्ञासू वृत्ती याबाबत अनेकांना कुतूहल आहे कारण त्यांनी लावलेल्या शोधांमुळे जागतीक स्तरावर मोठया प्रमाणात क्रांती झाली आहे. 

- शंकर चव्हाण (महाराष्ट्र राज्य) 9921042422

Write to : hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..