Posts

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

Image
  महाराष्ट्र ाच्या पावन भूमीत   एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जन्माला आले ,   महाराष्ट्र ाच्या पावन भूमीत अनेक वीरांनी देशाला वीर योध्दे दिले आहेत .   या मातीत जन्माला येणं म्हणजे नशीबच लागतं .   माऊंट एव्हरेस्टवीर नंदकुमार जगताप यांच्या देशसेवेमुळे व कामगिरीमुळे   महाराष्ट्र ाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे हे मान्य करावेच लागेल .   बीड जिल्हयात ,   अंबाजोगाई तालुक्यात वसलेलं मुडेगाव हे त्यांचं मुळ गाव .   याच गावच्या शूरवीरानं व त्यांच्या टीमने आज जगात आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे .   माऊंट एव्हेरेस्ट सर करुन सहीसलामत परत येणं म्हणजे जीवघेण्या संकटावर मात करुन जणू मृत्यूच्या दारातून परत येणं .   दोन मजली घराच्या पायऱ्या चढणं सर्वसामान्य माणसाला असाह्य होतं आणि तो धापा टाकायला सुरुवात करतो .   समुद्रसपाटीपासून ८८४८   मीटर उंच असे जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारे नंदकुमार जगताप हे भारतीय सैन्य दलातील चौथा मराठा एल . आय . रेजीमेंट मध्ये कार्यरत असतांना जगताप यांनी एव्हरेस्ट टीममधील दोन नंबर दुकड...

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

Image
लेडीज फस्ट मग ‘ आई शेवटी का जेवते ’ ? प्रश्न सरळ आणि साधा आहे ,  आपल्या अवती भोवती असे अनेक प्रश्न आपल्याला कदाचित माहित नसतात ,  कदाचित ते आपल्या जवळ असूनही आपण त्या गोष्टीपर्यंत पोहचत नाहीत .  पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे आई .  आईविना जीवन व्यर्थ आहे .  जगातली सर्व ताकद एकीकडे व फक्त एकटी आई एकीकडे अशी ही आईची व्याख्या आहे .  म्हणतात ना आकशाचा कागद आणि समुद्राची शाई जरी केली तरी आईविषयी निबंध लिहिला जाऊ शकणार नाही कारण ते सुध्दा कमी पडेल . " स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी "  हे अगदी तंतोतंत खरं आहे .  ज्याच्याजवळ आई नाही त्याला विचारा आई खरंच काय असते .  आईची व्याख्या इतक्या सहज कोणीच करु शकत नाही .  देवाला प्रत्येकाडं वेळ देणं होत नाही त्यामुळं त्या परमेश्वरांन आईच्या रुपात आपल्यावर माया करत आहे .  आई वडीलांएवढं प्रेम जगाच्या पाठीवर कोणीच करु शकत नाही .  स्त्रीमध्ये नवनिर्माण करण्याची क्षमता असते .  तिच्यामध्ये असणारी सकरात्मक उर्जा परिवर्तन करण्याची हिम्मत असते .  प्रत्येक स्त्री कोणाची तरी आई ,  बहिण ,...