आक्रोश शेतकऱ्यांचा !
आक्रोश शेतकऱ्यांचा ! कुणाचं काय तर कुणाचं काय ? म्हणजे आपल्या देशामध्ये सर्व धर्म समभाव असे मानले जाते . ते कितपत हे स्वत : च स्वत : ने ठरवावे . गेली कित्येक वर्षे जाती जाती मध्ये मतभेत तर आहेतच पण धर्मामध्ये सुध्दा मतभेद आहेत . आपापल्या धर्माचे पालन कसे करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . पण हल्ली या धर्मापरिसरामध्ये एक राजकारण चालू झाले आहे . कोणाला मंदीरामधील काकड आरती ची ऍलर्जी आहे म्हणजेच त्यामुळे झोप मोड होते असे बऱ्याच जणांचे म्हणणे आहे , तर कोणाला मशिदीमधील नमाजाच्यावेळी होणाऱ्या भोंग्याच्या त्रासामुळे झोप उडते असे बरेच जण व्यक्त होतात . असो , मला धर्मा विरोधात कोणतेही भाष्य करायचे नाही किंवा कोण्या धर्माविरोधात चांगली अथवा वाईट चर्चा करायची नाही . आपल्या देशामध्ये नको त्या गोष्टीला महत्वाचं स्थान देण्याची सवय असल्यामुळे असे प्रकार नेहमी घडतच असतात . पण शेतकऱ्यांचा आक्रोश अजुनही कोणाला जाणवला नाही , शेतकऱ्यांच्या आक्रोशामुळे कोण...