महापुरूषांच्या जयंतीला ‘डॉल्बी’ कशाला ?
महापुरूषांच्या जयंतीला ‘डॉल्बी’
कशाला ?
अखंड भारत देशामध्ये जागतिक किर्तीच्या महापुरूषांची किर्ती आजच्या शतकातसुध्दा
तेवढीच आहे. खरंतर महापुरूषांच्या कार्याचा इतिहास आपण अभ्यासून आपला वर्तमानकाळ सुखकर
व्हावा व त्यांच्या आदर्शाचं रोपटं आपल्या मनी रुजवण्यासाठी अभ्यासतो. शिवछत्रपती शिवाजी
राजे भोसले, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा
फुले, छत्रपती शाहु महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, टिपू सुलतान, डॉ ए.पी.जे.अब्दुल
कलाम अशी किती तरी महापुरूष होऊन गेले ज्यांनी नावं लिहिण्यासाठी एक पुस्तक सुध्दा
कमी पडेल. आज त्यांच्या एका एका कार्याचा इतिहास वाचत असतांना आपण रोमांचक होतो व अंगावर
काटा आणणाऱ्या घटना त्यांच्यासोबत घडल्या, स्वराज्य मिळवण्यासाठी व आपल्याला लोकशाही
मिळवून देण्यासाठी कित्येक महापुरुष व क्रांतीकारकांनी आपल्यासाठी प्राणांची आहुती
दिली. ते हे दिवस पाहण्यासाठी नाही. काय नशीब काढलंय आपण. आज समाजामध्ये निस्वार्थ
वृत्तीने समाजप्रबोधन करणारे कित्येक अविलये सापडतील. अशा महापुरषांच्या कर्तृत्वाचं
हेच पांग फेडता का तुम्ही ? महापुषांच्या जयंत्या कशा प्रकारे साजरी कराव्या हे जर
आपण आजपर्यंत शिकू शकलो नाही तर आपण त्यांच्या विचाराचे नाही तर त्यांना देव बनवुन
त्यांच्या नावाचा वापर करुन नाही ते काळे धंदे करुन त्यांचे नाव खराब करतोय असे नाही
वाटत. महापुरूषांनी आपले संपूर्ण आयुष्या आपल्याला भविष्यकाळात सुख, शांती, लोकशाही
जपण्यासाठी प्रयत्न केले ते का एवढयासाठीच ? त्यांच्या जयंतीला ‘डॉल्बी’ लावून नशा
करुन त्यांच्या मुर्ती व प्रतिमेसमोर नंगा नाच करण्यासाठी ? महापुरूषांना डोक्यात न
घालता महापुरषांचे विचार डोक्यात घाला. जयंतीला डॉल्बी नशा करुन अर्धनग्न होऊन आपली
अब्रु वेशीला टांगतांना जनाची नाही तर मनाची काहीच कशी वाटली नसावी हा एक संभ्रमात
टाकणारा साधा सरळ प्रश्न आहेच की. नेमके असे करुन का साध्य होते. मुळात सर्वच जातींनी
आपापल्या जातीचा एक एक महापुरूष वाटूनच घेतलाय म्हणा. त्यात रंग वाटून घेतलेते. लोकशाहीच्या
देशात कितीही अमुलाग्र बदल झाला असला आणि देश महासत्ता बनन्याकडे वाटचाल करु लागला
तरी त्याचा शन्य एवढासुध्दा फायदा कोणालाच होणार नाही जोपर्यंत आपल्या देशातील जातीव्यवस्था
बदलत नाही तोपर्यंत. समाजामध्ये फक्त देखावा करण्यासाठी आम्ही भारतीय सर्व एक आहोत
असेच दिसते. मात्र अंतर्गत चाचलेली जातीनिहाय चळवळ व जाती जातीतील भांडणे कधीही सुपुष्टात
येणार नसल्याचे अभ्यासावरुन लक्षात येते. महापुरूषांच्या जयंत्या हया शासनानेही सक्तीच्या
केल्या मात्र सक्तीच्या करण्यासाठी त्यांचे पुजन सक्तीचे केले हे जास्त आवर्जुन सांगण्यात
आले. पण अरे सरकारी दुधखुळयांनो जनता एवढी भाबडी आहे की, तुम्ही सांगितेले पालन त्यांनी
केले. जसे की नंदी बैल काहीही बोलले की मान हालवून गुबू गुबू करतो ती झाली त्याची प्रवृत्ती
मात्र सर्वच समाजातील जनतेला महापुरषांच्या जयंतीच्या पुजनासोबत त्यांचे विचारही आत्मसात
करा अशी तुमच्या सक्तीच्या निर्णयामध्ये ओळ घातली असतील तर निदान जनतेने नवीनशासकिय
सक्कतीच्या निमित्ताने का होईना विचार करायला सुरूवात केली असती. हे सर्व खरंच विचार
करायला लावणारं आहे व ज्याच्या डोक्यात याबाबत खरंच बदल करावा असं वाटत असेल त्याचा
मेंदू खरंच देवाने वेग्यळया फॅक्टरीत तयार केला असंच म्हणावं लागेल. कारण आपल्याकडे
फक्त भाषण ऐकायला बरं वाटतं, एखादयाने आक्रमक, टिकात्मक भाष्य केले की कसे कानाला गोड
वाटते फक्त टाईमपास म्हणून. पण खरंच जातीव्यवस्थेत बदल करायचा असेल व जयंती निमित्त
मिरवणुकीच्या वेळीस सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहचेल असे वागायचे असेल तर नक्कीच भविष्य
काळात डॉल्बी लावून नंगा नाच कधीही पहावयास मिळणार नाही हे ठाम आहे. तेव्हा असा प्रश्न
कधीच निर्माण होणार नही की ‘महापुरुषांच्या जयंतीला डॉल्बी कशाला ?’
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422
hr.shankarchavan@gmail.com
hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment