आपण संस्कार विसरोलत का ?



आपण संस्कार विसरोलत का ?

धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण पैशांच्या मागे धावत आहे. प्रत्येकाला स्ट्रगल करायचं आहे व जीवनात आपलं काही तरी अस्तित्व निर्माण करायचं आहे. त्यामुळे दिवस रात्र पैसा कोणत्या मार्गाने कमावता येईल असा विचार प्रत्येक जण करतो. प्रत्येकाला गाडी, बंगला, ऐशो आरामाचे जीवन आवडते. हाताखाली नोकर असावेत. एन्जॉय करायला एखादं फार्म हाऊस असे तर चांगलंच. पण मेहनत न करता असं फक्त स्वप्नातच होऊ शकतं. असे आयुष्य प्रत्येकाच्या वाटयाला नाही येत. कधी कधी तर खुप कष्ट करुनही यापैकी एक सुध्दा सुख अनुभवन्यासाठी मिळत नाही. आयुष्यामध्ये नाती खुप महत्वाची असतात. ती नाती जपण्यासाठी खुप काळजी घ्यावी लागते. अगदी तळहातातल्या फोडाप्रमाणे. कारण नाती ही खुप नाजुक असतात. त्याला तडा जाऊ नये म्हणून आपण्‍ काळजी करतोच पण काही लोकांमध्ये संस्कार म्हणजे काय या गोष्टीशी यांना काही देणं घेणंच नसतं असं वाटायला लागलेलं आहे. वाटेल तसं वागायचं, वाटेल त्या ठिकाणी काही पण करायचं, दुसऱ्याचे नुकसान झाले तर आपल्याला काय त्याचं. अशा प्रवृत्तीच्या काही लोकांमुळे संस्कार या सुसंस्कृत शब्दाची व्याख्या पार बदलून गेली आहे. कळत न कळत कुठेतरी संस्कार आपण विसरत चाललो आहोत हे मात्र नक्की. आई वडील, भाऊ बहिण, बायको, काका काकू, मामा मावशी इत्यादी प्रकारची नाती जपण्यासाठी आपल्या आई वडीलांचे एक संस्कार असतात आणि आई वडीलांचे संस्कार म्हणजे जगात संस्कार शिकण्यासाठी आजून तरी कार्यशाळा सुरु नाही झाल्या. शाळेत जाण्या आगोदर आपली माय माऊलीच आपल्या प्रथम गुरूची भूमिका पार पाडत असते. त्यानंतर वडील आपले कर्तव्य करुन आपल्या मुलांना जीवनात चांगल्या मार्गाने जावे यासाठी सतत उपदेश करता असतात. पण हल्ली या सर्व गोष्टींचा नाश झाला आहे. म्हणजेच संस्कार लोप पावला आहे. इथं कोणाच्याच अंगात संस्कार दडला नाही किंवा संस्कार म्हणजे काय हे काय आहे हेच मुळात माहित नसल्याने अशा प्रकारचा गोंधळ होत असतो. आपण घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वचजण स्त्री पुरूष दोन्ही दिवसभरामध्ये काय काय वाईट उपक्रम करतो त्यापेक्षा चांगल्या कामांची यादी फारच कमी असल्याचे दिसून आले. कारण वाईट व्यसनं, पैसा कमावण्याचे मार्ग चुकीचे, खोटं बोलणे, टाळाटाळ करणं, गुन्हे करणं, वाईट सवयी इत्यादी प्रकारचे संस्कार कोणावर घडवावे लागत नाहीत. किंवा आई वडील अशा प्रकारच्या कामांना प्रोत्साहन देत नाहीत. मुळात अशा प्रकारच्या वाईट गोष्टींना लांब ठेवावे असे प्रथम मार्गदर्शन आपले पालक आपल्याला करता म्हणजे आपल्यावर संस्कार करतात. पण आपण दिवसेंदिवस संस्कार विसरत चाललोय की काय असे वाटत आहे. अशा वाईट गोष्टींनी जर आपण सुरूवात केली तर याचा शेवट सुध्दा वाईटच होतो हे सुध्दा लक्षात असणे तेवढेच महत्वाचे आहे. आपर्यंत समाजप्रबोधन करण्यासाठी आपल्यासाठी जिवाचे रान करुन चांगल्या शब्द आपल्या कानावर पडावे यासाठी प्रयत्न केले. मात्र त्याचा उपभोग आपल्याला घेता आला नाही हे दुर्दैवच. खरंच विचार करण्यासारखी बाबत आहे ना. बघा विचार करा अजुनही वेळ गेलेली नाही. आजच्या या क्षणापासूनच निश्चय करा आपले स्वन्ं साकारण्यासाठी नियोजन करा व तयारीला लागा बघा यश तुमच्या हातात आहेच. 
शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422
hr.shankarchavan@gmail.com

Comments

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..