अस्तित्वाच्या लढाईत कुठे जाऊन बसलाय आधारस्तंभ ‘माझा’ ?'


अस्तित्वाच्या लढाईत कुठे जाऊन बसलाय आधारस्तंभ ‘माझा’ ?'

गेल्या काही दिवसांपासून लोकशाहीच्या चौथ्या अधारस्तंभावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय नागरीकांनी निषेधाच्या फैरी झाडल्या. तीव्र संताप व्यक्त करण्यात आला व अजूनही हे सत्र चालूच आहे. हा राग इलेक्ट्रॉनिक मिडीया म्हणजेच एका नामांकित वृत्तवाहिनीबद्दलचा होता. मिडीयाने काय केले पाहिजे व काय केले गेले याबाबतच्या टिपण्‍ण्या युवा पिढीसह सर्वच स्तरातुन  सोशल मिडीयाच्या माध्यमातून नोंदवल्या गेल्या. खरंच आता माध्यमांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे का हो ? जेंव्हा सर्वसामान्य जनताच लोकशाहीच्या चौथ्या खऱ्या खुऱ्या अधारस्तंभावर एवढी भडकावी ? त्यांनी निषेध व्यक्त करावा ? मला वाटते आजवर इतपत अशी वेळ इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा मुद्रीत माध्यमे (प्रिंट मिडीया) बहुतांश कोणावरच आली नसावी. म्हणतात ना, की सामान्य माणसांमध्ये एक असामान्य ताकद असते. मग ही ती ताकद तर नव्हे ? कदाचित याचा परिणाम खरंच भारी पडेल ? स्पर्धेच्या युगामध्ये आणखी एका गोष्टीचे भान सर्वच माध्यमांनी लक्षात ठेवायला हवे. मुळात स्पर्धा एवढी वाढली आहे आणि त्यात प्रसिध्दीसाठी, नाव, पैसा, अस्तित्व मिळवण्यासाठी पैशांच्या बॅगांपुढे हल्ली काही प्रमाणात लोकांचा लोकशाहीच्या आधारस्तंभावर जेवढा प्रचंड प्रमाणात विश्वास आहे तो विश्वास घात करण्याचं, स्वत:ला विकण्याचं व कासरे दुसऱ्याच्या हाती देण्याचं काम बरीच बडवे मंडळी करतांना दिसतात हे सत्य आहे. पण यामुळे सर्वच माध्यमं अशी आहेत असे होत नाही किंवा प्रत्येक वृत्तवाहिनी किंवा पत्रकार म्हणजेच लोकशाहीचा चौथा स्तंभ या प्रकारात मोडत असेल असे अजिबात नाही. मिडीया आहे म्हणून देशात सर्वच व्यवस्था राखली आहे. प्रत्येकाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जीवाचं रान करावं लागते हे ही मान्य. परंतु जेंव्हा आपण आपलीच विकतो तेंव्हा नक्कीच अशा प्रकारची वेळ का म्हणुन कोणावर येऊ नये ? इथे सुध्दा असेच घडले. त्यामुळे स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी कुठे जाऊन बसलाय आधारस्तंभ ‘माझा’ अशी म्हणण्याची वेळ वृत्तवाहण्यांवर यावी यापेक्षा कलंकित व लज्जास्पद कोणतीच गोष्ट नसावी. आपल्या वर होणाऱ्या आरोपाचे उत्तर तर जनतेला दयावेच लागेल. चुक झाली तर ती मान्य करावीच लागेल. केवळ मान्य न करता त्यात सुधारणा करुन भविष्यकाळात असा कोणावर अन्याय होईल, एकतर्फी मत मांडणे, पैशांसाठी स्वत:ला पूर्णत: विकणे अशा गोष्टी होऊ नये याची काळजी वृत्तवाहिन्यांना घेणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाची गोष्टी म्हणजे ज्याप्रमाणे मुद्रीत माध्यमांनी (प्रिंट मिडीया) स्वत:चं अस्तित्व, स्वत:ची विश्वासार्हता जशी टिकवून ठेवली त्याचा आदर्श वृत्तवाहिन्यांना घेणे अधिक महत्वाचे वाटते. कारण इथं आता सोशल मिडीया हा लोकशाहीच्या पाचव्या स्तंभाची भूमिका बजावत असल्यामुळे स्पर्धक हा वृत्तवाहिन्यांना वृत्तवाहिनी नसून किंवा वृत्तृपत्रांना वृत्तपत्र नसुन सर्वसमान्य जनतेच्या हातामध्ये असणारी सोशल मिडीया आहे. त्यामुळे कोणतेही पाऊल हे जपूनच टाकणे योग्य. स्वार्थासाठी कोणीही कुटील कारस्थान करत असेल, ज्या ठिकाणी अन्याय होत आहे त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम हे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचं आहे हे प्राथमिक दृष्टया विसरुन चालणार नाही. जातीयवादी, एकतर्फी भूमिका ठेवणे सुध्दा धोकादायक ठरु शकते. अशा बऱ्याच घटना यापूर्वीही झाल्या आहेत. आपले अस्तित्व राखून ठेवण्यासाठी भविष्य काळात सर्वच मिडियाला स्ट्रगल करावेच लागणार . अन्यथा अस्तित्वाच्या लढाईत कुठे जाऊन बसलाय आधारस्तंभ ‘माझा’ अशी म्हणण्याची वेळ येईल.

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?