मुक्या झाडांना ‘तोंडे’ भेटले ; वाळलेल्या खोडांना ‘अंकुर’ फुटले
मुक्या झाडांना ‘तोंडे’ भेटले ; वाळलेल्या खोडांना ‘अंकुर’ फुटले आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार विजेते संपादक बालाजी तोंडे यांच्या कार्याला बीड जिल्हयातील नव्हे तर राज्यभरातील जनता सलाम करत आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांनी असं काही काम केलं आहे की प्रत्येकाला आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याशिवाय रहात नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरे आपण म्हणतो, पण याच सोयऱ्यांची कत्तल राज्यभर दिवसा ढवळ्या सुरू आहे. पण याचं दु:ख निसर्गावर निस्वार्थ प्रेम करणारांनाच कळते. झाडाचे रोपटे लावून त्याच्यासोबत सेल्फी काढून प्रसारमाध्यमातून प्रसिध्दी मिळवणारे मोप मिळतील. पण बालाजी तोंडे यांना निसर्गप्रेमी अवलियाच म्हणावं लागेल. बीड तसेच राज्यभरात महामार्गावरील रस्ता रुंदीकरणासाठी हजारोवर्षे जुन्या वृक्षांची कत्तल होत आहे. शासनदरबारी बालाजी तोंडे यांनी वेळोवेळी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. बालाजी तोंडे यांच्या मते अफाट वृक्षतोड झालीच तर प्रत्येकाला पाठीवर आक्सीजनचा सिलेंडर घेवून रत्याने चालावे लागेल. ही वृक्षतोड थांबवण्यासाठी व झाडे लावण्यासाठी बालाजी तोंडे यांचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू आहेत...