ही 'सेल्फी' आणखी किती बळी घेणार ?
ही 'सेल्फी' आणखी किती बळी घेणार ?
तंत्रज्ञान विकसीत झाले, आपला वावर डिजीटल युगात झाला
त्यामुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला व ज्ञानाची पावर वाढली. कधी काळी रोलचा कॅमेला
असायचा, त्यात निगेटीव्ह फि ल्म रोज टाकून तो रोल संपल्यासच फोटो धुवून अर्थात डेव्हलप
करुन मिळायचा, फोटो काढणे ही पध्दत दुर्मीळच. मोजक्याच, आवश्यक अशाच कार्यक्रम प्रसंगी
क्वचितच ही पध्दत वापरली जायची. कालांतराने दिवसेंदिवस जग प्रगतीकडे जातंय म्हटल्यावर
सोयी सुविधा हया सर्वांसाठी उपयुक्त आहेत. मोबाईलयुगाची निर्मिती झाली. फोटो कॅमेऱ्यांच्या
सुध्दा जडणघडणीत अमुलाग्र बदल घडून आला, आता पाच हजारांपासून ते पन्नास लाखांपर्यंतचे
फोटो काढण्यासाठी विविध रंगाचे अन ढंगाचे कॅमेरे उपलब्ध आहेत. त्यात भर पडली ती मोबाईमध्ये
फोटो कॅमेरा आला. हा बदल फोटोग्राफी क्षेत्राला मागे सरकवणारा ठरला व तो यशस्वी झाला.
कधी काळी फ ोटो काढायचा म्हटलं तर प्रोफेश्नल कॅमेरामनच फोटो काढायला यायचां. पण आता
त्यांची तेवढी गरज उरली नाही, हा बदल व तो मान आता स्मार्ट फोनने हिसकावून घेतला आहे.
पण कॅमेऱ्यातील जीवंतपणा व तशी कला आत्ताच्या स्मार्ट फोन मध्ये कुठं. मोबाईलला पूर्वी
एकच कॅमेरा असायचा तोही बऱ्यापैकी दर्जाची प्रतिमा काढायचा, पण कालांतराने त्याही तंत्रज्ञानात
बदल होवून एकाच मोबाईलला आता दोन दोन कॅमेरे असल्याची सोय मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना
करुन दिली आहे. अगदी सकाळी उठल्यापासून दिवसा झोपेपर्यंत दिवसभर आपण काय केले याबाबत
व्हिडीओ पासून विविध प्रतिमा आपण त्या मोबाईलमध्ये साठवू शकतो. आपले प्रझेंटेशन तयार
करु शकतो अशा विविध कार्यालयीन, सामाजिक, राजकिय, शैक्षणिक व इतर वैयक्तिक कामांसाठी
याचा उपयोग होत आहे. पण त्यात मोबाईलला समोरच्या बाजूला जो कॅमेरा मोबाईल कंपन्यांनी
सोय म्हणून मानव जातीच्या हातामध्ये दिला त्या सोयीचा प्रत्येक जण सेल्फी काढण्यासाठी
म्हणजेच स्वत: फोटो स्वत:च काढणे होय, त्याला स्वयंप्रतिमा काढणे असेही संबोधतात, परंतू
सर्वच भाषांमधून सेल्फी असाच शब्दप्रयोग केला जातो. मुख्यता हा सेल्फी प्रकार प्रत्येकाच्या
जीवावर उठला आहे, आजपर्यंत याच प्रकाराने अनेकांचे बळी गेले आहेत. त्याचे पुरावे आपल्याकडं
विविध वर्तमानपत्र, ईलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडया यांच्या माध्यमातून जाणले आहेत.
सेल्फी काढणे शक्यतो, निसर्गरम्य ठिकाण, मित्र मैत्रिणींसोबत, प्रेक्षणीय ठिकाणी, पुढाऱ्यांसोबत,
अभिनेत्यांसोबत, समुद्र, निसर्गाच्या सानिध्यात येणारी सर्वच प्रमुख आकर्षणं त्यांसोबत
सेल्फी काढण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. हा प्रकार हल्ली सर्वचजण वापरतात अगदी
लहन मुलांनासुध्दा सेल्फी हा प्रकार कळायला लागला आहे. तेही म्हणतात मम्मी पप्पा इकडे
पहा सेल्फी घेवूयात. परवा परवा समुद्रात काही विद्यार्थी गेले त्यांची बोड बुडाली काहींना
वाचवण्यात यश आले पण काहीं प्राण सोडले. काही महिन्यांपूर्वी तलावात बोट घेवून मित्र
मजा करण्यासाठी गेले फेसबुकवर लाईव्ह व्हिडीओ शुटींग करण्याच्या व सेल्फी काढण्याच्या
नादात बोट पलटली व त्यातच त्यांना जलसमाधी मिळाली. परवाची गोष्ट डहाणू येथील बोट कशामुळे
बुडाली याची धक्कादायक माहिती समोर आली तेंव्हा कळाले की हा ही प्रकार व अनेक विदयार्थ्यांचा
जीव हा सेल्फीनेच घेतला आहे. कित्येक दा समुद्र, सरोवर, दरी, डोंगर, धबधबे अशा रिस्क
असणाऱ्या ठिकाणी आजपर्यंत अनेकांनी सेल्फी काढण्याच्या नादात आपला जीव गमवला आहे. अरे
थांबा विचार करा जरा जीव हा अनमोल आहे त्याला साध्या सेल्फीच्या नादात नका गमवू.
वेळीच सावध व्हाव व सेल्फीचा मोहाला आवरा, जे वय संपूर्ण जग पाहण्यासाठी
आहे ते किरकोळ मोहापायी नका व्यर्थ ठरवू, आपल्या मागे परिवार आहे, आपली कोणी वाट पहात
आहे, याचेही भान राहू द्या, या मोहापासून वाचण्यासाठी आपण काळजी जरुर घ्या, बस एवढंच
!
- शंकर
चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल
: 9921042422, hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment