हीच का ती समानता ? अन हेच का ते महापुरूषांचे विचार ?


हीच का ती समानता ?
अन हेच का ते महापुरूषांचे विचार ?
महिलांना चुल अन मुल शिवाय आजच्या युगात फ क्त नावालाच आरक्षण अन संरक्षण आहे. केवळ महिलांना आम्ही पुरूष वर्ग तिला पुरूषासमान वागणुक देतो असं भासवतात. मात्र तिला ना आरक्षण आहे ना संरक्षण, गेल्या कित्येक वर्ष झालं बलात्काराचं प्रमाण देशात काही कमी होता होत नाही. ही कीड निघून जाण्याचं नाव घेत नाही. तेंव्हा आपण महापुरूषांचे व्याख्यानं जनजागृती साठी, परिवर्तनासाठी, क्रांती घडवण्यासाठी, चांगल्या जीवनाचा मार्ग शोधण्यासाठी विचार आत्मसात करतो. परंतु त्यांचे विचार खरंच आत्मसात होवून त्याप्रमाणे आपण स्वत: अनुकरून करतो का ? तर बिलकुलच नाही असे लक्षात येते. स्त्रीयांना समानतेची वागणुक मिळावी यासाठी महापुरूषांनी त्यांच्या साहित्य विचारातून प्रेरणा मिळावी यासाठी जीवाचं रान केलं पण आपणा आजही त्यांच्या त्या विचारांना मान्य करायला तयार नाहीत. क्वचीत एखादा अपवाद वगळता. आजही स्त्रीयांना शिवजयंती (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वगळता) किंवा अन्य जयंती निमित्त मिरवणुक असो वा विविध कार्यक्रम महिलांना घरातच ठेवण्याची प्रथा बहुतेक ठिकाणी चालते. त्यांना मिरवणुकीत पुरूषांसोबत घेतलं जात नाही, या सावित्रीच्या लेकीला शिक्षणाचा हक्क आहे, तसाच विचार मांडण्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्राचा ही तेवढाच हक्क आहे. तीही मिरवणुकीत जावू शकते, आपल विचार मांडू शकते, पण असे होतांना दिसत नाही. कारण पुरूषांना व युवकांना डॉल्बी लावून पुरोगामी महाराष्ट्रातच्या महापुरूषांच्या विचारांचा अवमान करुन मद्यधुंद होवून नाचायचं असतं ना ? अरे अरे अरे हे कुठंतरी थांबायला पाहिजे ! मी नेहमीच म्हणतो मुळात महापुरूषांच्या जयंतीला डॉल्बी कशाला ? महापुरुषांच्या विचाराच्या उलट आपण वागतो, त्यालाच आपण     स्त्री -पुरूष समानता असल्याचे खोटे समाधान मानतो. अन्य बऱ्याच धर्मामध्ये तर महिलांना गोशा आहे. इथे तर त्यांच्या विचारांना व त्यांच्या समानतावादी विचारसरणीला अगदी पायांपासून नखांपासून डोक्यांच्या केसांपर्यंत सलामच केला पाहिजे. त्यांच्या महिलांच्या बाबतीत तर वेगळेच बंधन आहेत. जी भारतीय अभिव्यक्ती स्वांतत्रच्या विरुध्दच चालतात. हा एकच समुदाय नाही तर अशा दिवाळखोरी विचारसरणीची नको त्या ठिकाणी अक्कल पाजळणारे बरेच समुह आहेत, ज्यांना आजही महापुरूष कळले नाहीत, ना त्यांचे विचार, ना समानतेचा अर्थ, मुळात अडचण त्यांची हीच आहे.



शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?