मुक्या झाडांना ‘तोंडे’ भेटले ; वाळलेल्या खोडांना ‘अंकुर’ फुटले

मुक्या झाडांना ‘तोंडे’ भेटले ;

वाळलेल्या खोडांना ‘अंकुर’ फुटले

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार विजेते संपादक बालाजी तोंडे यांच्या कार्याला बीड जिल्हयातील नव्हे तर राज्यभरातील जनता सलाम करत आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांनी असं काही काम केलं आहे की प्रत्येकाला आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याशिवाय रहात नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरे आपण म्हणतो, पण याच सोयऱ्यांची कत्तल राज्यभर दिवसा ढवळ्या सुरू आहे. पण याचं दु:ख निसर्गावर निस्वार्थ प्रेम करणारांनाच कळते. झाडाचे रोपटे लावून त्याच्यासोबत सेल्फी काढून प्रसारमाध्यमातून प्रसिध्दी मिळवणारे मोप मिळतील. पण बालाजी तोंडे यांना निसर्गप्रेमी अवलियाच म्हणावं लागेल. 

बीड तसेच राज्यभरात महामार्गावरील रस्ता रुंदीकरणासाठी हजारोवर्षे जुन्या वृक्षांची कत्तल होत आहे. शासनदरबारी बालाजी तोंडे यांनी वेळोवेळी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. बालाजी तोंडे यांच्या मते अफाट वृक्षतोड झालीच तर प्रत्येकाला पाठीवर आक्सीजनचा सिलेंडर घेवून रत्याने चालावे लागेल. ही वृक्षतोड थांबवण्यासाठी व झाडे लावण्यासाठी बालाजी तोंडे यांचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू आहेत. मांजरसुंबा नजीक नेकणूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हजारो वर्षे प्राणवायु देणारा एक सोयरा म्हणजेज मोठे वृक्ष तोडून त्याची कत्तल करण्यात आली. हे बालाजी तोंडे यांना पहावलं नाही त्यांनी लगेच या झाडाच्या खोडाला त्याच पुन्हा रोपन करण्याचं ठरवलं व त्या झाडाला पुन्हा रोपन करुन मराठवाड्यातील आगळावेगळा पहिला वहिला प्रयोग करुन सिध्द करुनच दाखवलं. ते झाड अगदी डोलाने बहरुन त्याल पालवी फुटली असून त्याचं मोठं वृक्ष होतांना आपण सर्वचजण पाहणार आहोतच.


मनुष्यप्राण्याला जीवनदान देण्यासाठी डॉक्टर असतो आपण त्याला देव म्हणतो, पण निसर्गावर प्रेम करणाऱ्या बालाजी तोंडेसारख्या अवलियाला काय म्हणावे ? वृक्षांचा देव, वृक्षांच्या भावना जाणून घेणारा मनकवडा, वृक्षांसाठी जीवनदान देणारा दानशूर, असा देवमाणूस या मराठवाडयाच्या जन्मभूमीत जन्म घेतो हे मराठवाड्याचं भाग्यच म्हणावं लागेल. कत्तल झालेल्या बलाढ्य वृक्षाच्या खोडाचं पुन्हा रोपन केल्याची बातमी सर्वत्र पसरतांच ते पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. बालाजी तोंडे यांच्यामुळेच या वृक्षाला अंकुल फुटले, गेली कित्येक वृक्ष वसुंधरा समृध्दी अभियानाच्या माध्यमातून वृक्षतोड बाबत जनजागृतीचं काम बालाजी तोंडे करत आहेत. तीन गावांत दारुबंदीसाठी मतदान घेवून अथक संघर्ष करुन तीन गावात दारुबंदी केली व बाटली कायमची आडवी केली. राज्यशासनाने दखल घेवून विविध राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव के ला आहे. शिवाय त्यांच्या या कार्यावर लघुचित्रपटाचीही निर्मिती झाली. केवळ समाजाने या त्यांच्या आदर्श कामाचा नक्कीच आदर्श घ्यावा एवढीच निस्वार्थ सेवा त्यांच्या हातून जीवनात घडवी अशी अशा त्यांना वाटते, त्यांचं जनजागृतीचं अखंड कार्य तर चालूच आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या वृक्षतोड होत असलेल्या गंभीर प्रकरणाविषयी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. रोपन केलेल्या खोडाला पालवी फु टल्याने पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते की, मुक्या झाडांना ‘तोंडे’ भेटले वाळलेल्या खोडांना ‘अंकुर’ फुटले ....

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?