कोटयावधी रुपये खर्चूनही भारत शेवटी अस्वच्छच !


कोटयावधी रुपये खर्चूनही भारत शेवटी अस्वच्छच ! 

स्वच्छ भारत मिशन च्या नावाने भारत सरकारने देश स्वच्छ होण्याचे धडे गिरवण्याचे काम शिपायांपासून ते वर्ग 1 च्या अधिकाऱ्यांपर्यंत दिले व स्वच्छ भारत मिशन ही सक्तीची योजना केली.परंतू शेवटी भारत देश हा अस्वच्छच दिसतोय सर्वत्र. मागील काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रातून एक विदेशी जोडप्यांचा फोटो प्रसिध्द झालेला सोशल मिडीयावर पाहितला. तो फोटो बरंच काही आपल्या देशातीत जनतेला शिकवण करुन देणारा होता. त्या फ फोटोमध्ये एका व्यक्तीने सिगारेट ओढल्यानंतर उरलेला तुकडा इतरत्र न टाकता आपल्या बॅगमध्ये टाकला, तेथीलच जवळ असलेल्या भारतीय व्यक्तीने हे कृत्य पहात होता, न राहून त्याने विचारले, असे का केले ? त्या विदेशी पर्यटकाने जे उत्तर दिले खरंच आश्चर्यकारक होते ! देश घाण करण्यात जे जे सहभागी आहेत अर्थात आपण सर्वचजण त्यांनाही लाज वाटेल असेच होते. ते विदेशी पर्यटक म्हणाले, की मी हा कचरा इथे टाकला तर मलाही माझ्या मायदेशी गेल्यावर अशीच सवय लागेल आणि आमच्या देशामध्ये असे कृत्य करणारास भारतीय रक्कमेप्रमाणे जवळपास पंधरा हजार रुपये दंड ठोठावतात. बघा हा देश, याला म्हणायचं खरं महासत्ता! जिथं कायदा पाळतात लोकं, जिथं देशासाठी देशाच्या मोहिमा, मिशन मध्ये स्वत:ला झोकून देवून देशसेवा करतात, मुळात आपल्याकडे देशभक्तीचे गोडवे फक्त प्रचासत्ताक दिन व स्वातंत्र दिन याच दिवशी बळजबरी देश सेवा करायला सांगितल्यागत आपण करतो. शेजाऱ्याच्या दारात कचरा ढकलून आपण त्याला भांडायला जेंव्हा खंबीर उभारतो तेंव्हा आपण आपलीच लाज वेशीला टांगते असे होत. परंतू ही बाब आपल्या लक्षात येईल तर ना ! आणि स्वच्छ भारत मिशन ही संकल्पना उदयास येते हेच मोठं भारताचं दुर्देव, मुळात आपण आपलं घर स्वच्छं ठेवतो, आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो, तसं आपण सार्वजनिक ठिकाणी असं का नाही वागत ? सरकारी कार्यलयं, सरकारी दवाखाने, बसस्थानकं यांच्याकडे पाहिल्यास असे वाटते की, आपण अजूनही अश्मयुगात वावरतोय का काय ? असं वाटतं की मानव अजूनही जंगलातच राहतो, जिथे खातो, जिथं बसतो, उठतो, रमतो, काम करतो तिथंच कचरा टाकायला किंवा घाण करायला कसा तयार होतो, त्याला शरम वाटत नाही का ? त्याल देशाबद्दल प्रेम नाही का ? असे सवाल नविन पिढीच्या मनात आल्याशिवाय राहत नाहीत. लोकप्रतिनिधी, नेते, मंत्री यांची दैनिक, साप्ताहिक, मासिकांतून व इतर माध्यमांतून फोटो प्रसिध्द होतात वर्तमानपत्रातून, देशसेवा करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनमध्ये आम्हीही सहभागी आहोत. पण तेच लोकं स्वत:च्या अधिकारात असणाऱ्या ग्रामपंचायत, नगर पालिका, महानगरपालिका यांच्या माध्यमातून शहरात घाणीचे सम्राज्य वाढत असतांना ढूंकूनही पहायला तयार नसतात. हा फ रक कशामुळे ? यांना फ क्त प्रसिध्दीसाठीच देशसेवेचा पुळका आलेला असतो ? नुसतंच ढोंग करणारा हा वर्ग हा देश स्वच्छ होवू देणार नसल्याचे संकेत देतो. भारत सरकार हया मिशन साठी कोटयावधी रुपये खर्च करते मात्र गेल्या चार वर्षात परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसते. देश स्वच्छ होण्याची स्वप्नं पाहण्यासाठी आगोदर आपलं मन स्वच्छ असावं लागतं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. यावर खोलवर विचार करायला हवा, देशासाठी, देशावर प्रेम करणे व कार्यचे बलिदान देणे इतके सोपे नसते, त्यासाठी कृती आवश्यक असते, टपऱ्यांच्या आवतोभोवती, रिकामे प्लॉट, नाले, बसस्थानकं, सरकारी दवाखाने, इतर सार्वजनिक ठिकाणं जर सुंदर दिसावी वाटत असतील तर अगोदर मनाने स्वच्छ व्हा, व देशाचे म्हणजे आपले स्वत:चेच पैसे वाचवा व ते पैसे देशातील गरीबी कमी करण्यास कामी येतील, स्वच्छ विचार करा, स्वच्छ वागा, स्वच्छ रहा, इतरांना स्वच्छ रहायला सांगा, आधि मन स्वच्छ करा देश आपोआप स्वच्छ झालेला दिसेल. बस एवढं साधं सोपं आत्मचिंतन करुन तयारीला लागा व देशसेवेत आपले स्वत:चंही योगदान द्या.
शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?