घोटाळ्यांचा देश …
घोटाळ्यांचा देश … भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, याच कृषीप्रधान देशाची ओळख आता घोटाळ्यांचा देश म्हणून होत आहे. त्याचं असंय की, या देशात सर्वात जास्त प्रमाणात घोटाळे हे राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. भारत देशाची अर्थव्यवस्था ही शेतीपासून सुरु होते व राजकीय वर्तुळात गोल गोल फिरु लागते. असंच समीकरण या देशात गेल्या सत्तरहून अधिक वर्षांपासून घडत आहे. या देशातील सुजाण जनता चुकीच्या व्यक्तींना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो. तसेच या देशात घरणेशाहीचे राजकारण मोठया प्रमाणात आहे. याच घराणेशाहीच्या राजकारणामुळे गरीब श्रीमंतीच्या मधले अंतर हे जास्त वाढत चालले आहे. इथं प्रत्येकाला राजकारणात नाव नाही तर बक्कळ पैसा व गडगंज संपत्ती कमावण्यासाठी यायचं असतं. राजकारणाचा दुसरा अर्थच जणू घोटाळा. समाजकारणाच्या नावाखाली लागलेला हा कलंकच म्हणावा लागेल. पैशांशिवाय निवडणुका जिंकताच येत नाहीत. हे वाक्य इथल्या प्रत्येक राजकारण्यांच्या डोक्यात फिट्ट बसलेलं व दृढ झालेलं आहे. घराणेशाहीच्या राजकारणामुळे पैसा दुपटी तिपटीने याच घरात वाढतो, त्यानंतर हळूहळू घोटाळयात सामील असलेले कार्यकर्ते यांची घर...