चायना वाल्यांनी एवढी ‘जिरवली’, तरीबी टिकटॉकवर चालूय ‘ढंगाळांग मचाळांग’
चायना वाल्यांनी एवढी ‘जिरवली’,
तरीबी टिकटॉकवर चालूय ‘ढंगाळांग मचाळांग’
असे शब्द, अशी भाषा लेखकांकडून अनपेक्षितच. किमान वाचनात
अशुध्द भाषा म्हटलं की, जरा ऑड वाटणारंच, पण
काय करु. काहीजण सुधरायला तयारच नाहीत. ढंगाळांग मचाळांग म्हटलं की, थोडसं हसू आलंच असेल, वरचा मथळा
वाचून थोडासा विनोद वाटलाच असेल आणि तुम्हाला थोडसं खुदकन हसायला सुध्दा आलंच असेल. आजचा विषय जेवढा विनोदानं घ्यावा तेवढाच गांभिर्यानं
सुध्दा. मुद्दामहुन असा मथळा लिहिला आहे. कारण त्याचं गांभिर्य आपल्या सर्वांना
लक्षात यायला हवं. टिकटॉकवरील नाच म्हणजेच ‘ढंगाळांग मचाळांग’. हा शब्द मराठवड्यात ओळखीचा शब्द आहे.
कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात, माणूस म्हणून आपल्याला
पिढ्यान-पिढ्या काही संस्कार घालून दिलेले आहेत. टिकटॉक बनवणाऱ्यांचं वाढतं प्रमाण
पाहून व त्या माध्यमातून नव्या पिढीला जो संदेश जातोय हे पाहून भविष्यात काय बरं परिणाम
होतील याचे जरा जास्तच भय वाटत आहे. नौटंकी करणारे करत बसतील पण बालबुध्दीवर होणाऱ्या
विपरीत परिणामाचे जास्त दु:ख वाटते. अश्लिल हावभाव, अश्लिल संवाद यामुळे पुढच्या पिढीचं
नक्की काय होणार हा चिंतेचा विषय आहे. अनेक पाल्यांचे पालकसुध्दा पाल्यांसोबत यात पूर्णत:
रमलेले दिसून येत आहेत. हल्ली मनोरंजनाचं एकमात्र साधन म्हणजे टिकटॉक. बस्स ! तुम्हाला
माहिती आहे का ? टिकटॉक हे ॲप चीन या देशातील
एका कंपनीने निर्माण केलेले आहे. आपण उच्चशिक्षीत
आहोत. भारत देशाचे सुजाण नागरीक आहोत. हे ॲप
सुरक्षित आहेत का ? असे ॲप वापरायचे की नाही याचा विचार करण्या इतपत आपली बौध्दीक क्षमता ही भक्कम आहेच. काय चांगलं
नि काय वाईट या गोष्टी आपल्या सर्वांना बरोबर कळतात. पण हल्ली कळतंय पण वळत नाही असा
अनेकांचा गोंधळ उडालेला दिसतोय.
प्रत्येकजण स्वत:च्या स्मार्टफोनमध्ये काळाची गरज म्हणून
बँक खात्याशी संबंधीत माहिती, वैयक्तिक माहिती, ओटीपी सेवा, व्हेरिफिकेशन लिंक, खाजगी
महत्वाच्या नोंदी, कार्यालयीन टिपण्णी बाबत कामकाजाच्या माहितीची देवाणघेवाण, खाजगी
छायाचित्र व चित्रफितींची देवाण घेवाण करतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये इतरही काही असे
ॲप्स असतात की, त्यांच्या माध्यमातून आपल्या स्मार्टफोनमधून काही खाजगी गोष्टी हॅकर्स
मार्फत किंवा स्वत: हॅकर्स चोरुन घेऊ शकतात व त्याचा दुरूपयोग करु शकतात. असे अनेक
फसवणुकीचे गैरप्रकार घडलेले आहेत. आपले क्रेडीट कार्ड, बँक खाते, सुरक्षित ठेवण्यासाठी
आपण अविश्वसनिय असणारे म्हणजे ट्रस्ट नसलेले कुरापती करणाऱ्या देशातील सॉफ्टवेअर्स
व ॲप्स आपल्या स्मार्टफोनमधुन कायमचा रामराम ठोकला
पाहिजे. अविश्वसनिय ॲप्स व सॉफ्टवेसअर्संना आपल्या स्मार्टफोनमधून तात्काळ हद्दपार
केले पाहिजे. म्हणेजच अनइंस्टॉल करायला हवेत.
ज्यांच्या चुकीमुळे अख्या जगाला त्रास सहन करावा लागतोय त्यांनी
किंवा त्यांच्या देशातील कंपन्यांनी निर्मिती केलेल्या सर्वच गोष्टींवर बहिष्कार टाकणे
हाच खरा रामबाण इलाज. जेणेकरुन असे देश यापुढे असे प्रयोग किंवा अशा काही हरकती की,
ज्या स्वत:च्या व इतरांच्या जीववर बेतणाऱ्या संशोधनाच्या ते नादी लागणार नाहीत. एवढी साधी बाब प्रत्येक देशातील सुजाण बंधु आणि भगिनींना
समजली तर देशाच्या माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत ही खुपच सुरेक्षच्या दृष्टीने महत्वाची
बाब असेल. छोटया छोटया गोंष्टीमुळेच मोठया मोठया गोष्टी घडत असतात. जसं थेंबे थेंबे
तळे साचे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नाहीच. अति तिथं मातीच असते
हे पण आपण अभ्यासलं पाहिजे. उगाच एखाद्या गोष्टीला
मी विनाकारण विरोध करत नाही. धोक्याची फक्त
सुचना दिली जाते कार्यवाही आपल्या सर्वांनी स्वत:हून करायला हवी. अगदी छोट्या छोटया
निष्काळजीपणामुळे जीवनात अनेक मोठे धोके पत्कारावे लागतील याचेही भान आपल्याला असायला
हवे. चायनामधील लोकं हे जीवावर बेतणारे संशोधन नेहमीच करत असतात. अनेकदा जागतिक पातळीवर
यांना अशा प्रकारची संशोधनं, प्रात्यक्षिकं करण्यासाठी जागतिक संघटनेच्या वतीने परवानग्या नाकारल्या जातात असे असून सुध्दा हे लोकं कोणच्या
बापाचं ऐकतील तर शप्पथ. शेवटी चोरीछुपे करायचं ते करतातच आणि त्याची फळं मात्र इतर
जगातील देशांना भोगावी लागतात.
आपण सोशल मिडीयावर
व्हिडीओ पाहतो की, चायना देशातील लोकांचे दैनंदिन खाद्य म्हणजे पशु, प्राणी, जलचर प्राणी.
हे पाहून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटणार यात शंक्काच नाही. यांचे हे असे विविध कुरापतीचे
सोशल मिडीयावर व्हायरल झालेले व्हिडीओ पाहून आपल्या देशातील पिढी केसांची हेअर स्टाईलचे
अनुकरण, विविध प्रात्यक्षिकं, स्टंटबाजी, पशुपक्षी, जलचर प्राणी यांना मारुन विविध प्रध्दतीने त्यावर प्रक्रीया
करुन खाण्याच्या नादी लागले आहेत. असे सर्वांच्या निदर्शनास आले आहे.
टिकटॉकच्या नादी लागून दिवसरात्र मोबाईल तोंडासमोर धरुन टिकटॉक
व्हीडीओ तयार करणे किंवा इतरांनी तयार केलेले मनोरंजनाच्या नावाखाली पहात बसणे असे
प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या माध्यमातून काहीजण जीवावर बेतणारे स्टंटदेखील करतात.
ढंगाळांग मचाळांग प्रकारचे काहीजण नाच करतात,
तसेच अश्लिल हावभाव व अश्लिल संवाद वगैरे वगैरे. पण एवढा साधा विचार आपल्या डोक्यात
येत नाही की, ज्या देशानं आपल्या सर्वांना जेरीस आणलं त्या चीनला धडा शिकवावा असं कोणालाच
का वाटलं नाही? ही खरोखरंच आश्चर्याचीच बाब आहे. तसेच आपण आपल्या मोबाईलमधील या देशाने तयार केलेल्या
सर्वच ॲप्सवर व इतर गोष्टींवर बहिष्कार टाकला पाहिजे व आपण काय आहोत हे त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.
सुरक्षित रहायचं असेल तर त्यांच्या प्रत्येक
गोष्टींवर बहिष्कार हाच सर्वोत्तम पर्याय.
म्हणूनच म्हणतोय की, चायना वाल्यांनी एवढी ‘जिरवली’, तरीबी टिकटॉकवर
चालूय ‘ढंगाळांग मचाळांग’.
आपण प्रत्येक पाऊल
उचलतांना विचारपूर्वक उचलले पाहिजे. आपल्या देशातही अनेक सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. त्या
सुध्दा अनेक चांगल्या प्रकारचे आपल्या सोईसाठी, मनोरंजनासाठी सॉफ्टवेअर्स व विविध फायदेशीर
ॲप्स तयार करतात. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या सोईसाठी अत्यंत दर्जेदार ॲप्स डेव्हलप करतात. आपल्या देशात तयार झालेल्या ॲप्लीकेशनचा आपण स्वत:च्या फायदृयासाठी व कामकाजासाठी वापर केला पाहिजे.
बहुतांश ॲप्स व सॉफ्टवेअर्स हे मोफतच असतात. काहीच ॲप्स पैसे देऊन विकत घ्यावे लागतात.
बऱ्याच गोष्टी भारतातही तयार होतात त्याचा आपण स्विकार केला पाहिजे व त्या विकत घेतल्या पाहिजेत.
त्यामुळे आपला पैसा हा आपल्या देशातच राहील व देशाची आर्थिक स्थिती सुधारेल.
आपल्या देशातील अनेक ज्ञानी तरुण-तरुणी जास्तीचा पैसा मिळावा
म्हणून विदेशात जातात, तिथे कंपन्या त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेऊन अनेक ॲप्स, सॉफ्टवेअर्स
व इतर प्रोजेक्ट, प्रॉडक्ट विकसीत करतात, (डेव्हलप करतात
) व आपल्याला चढया भावाने विक्री करतात. हे कुठं तरी थांबायला हवं असं नाही का वाटत
सर्वांना. कोरोना सारख्या व्हायरसने आधीच आपल्या सगळयांच्या जीवनाचं गणित बिघडवलं आहे.
जवळपास अनेकांच्या मोबाईमध्ये अजूनही चीन येथील कंपन्यांनी तयार केलेले ॲप्स वापरात
आहेत. चीनने आपल्या सर्वांचं खूप मोठया प्रमाणात नुकसान केलं आहे. असं असूनही आपण अगदी
मनोरंजनापासून ते इतर सोयींसाठी चायना मेड ॲप्स बिनधास्त व निष्काळीपणे हाताळत आहोत.
वैचारिक, शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान बाबत किंवा इतर चांगल्या शिवणीच्या दृष्टीकोनातून
तयार झालेले व्हिडीओ तयार करायला माझा बिलकुल विरोध नाही. विरोध फक्त विकृतीला. महत्वाचं
म्हणजे आपण आपला मौल्यवान वेळ का म्हणून वाया घालवायचा.
कोरोनाची (कोव्हीड – 19) ची सुरुवात चीन देशातुन झाली. या
एका देशातील या महाप्रलयंकारी व्हायरसमुळे संपूर्ण जग जागच्या जागी थांबायला मजबूर
झालं आहे. सर्व जगाला या एका देशातील व्हायरसमुळे घरात डांबून बसण्याची वेळ आली आहे.
या एकाटयामुळे संपूर्ण जग हैराण, कित्येक निष्पाप जीवांना आपला जीव विनाकारण गमवावा लागला,
जगातील अनेकांनी आपल्या नातलगाला, प्रेमाच्या जवळच्या नात्याला गमावले, संपूर्ण जग
दु:खच्या डोहात बुडाले आहे. चीन देश नेहमीच अशा उलटसुलट कुरापती करणाऱ्या गोष्टींमुळे
जगाच्या पाठीवर चर्चेत राहिला आहे. जागतिक स्तरावरील राजकारण यामुळे आजवर चीन हा स्वत:चा
फायदा करुन इतरांना संकटात टाकत आला आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान जरी चीन देशात जाऊन
मैत्रीसंबंध प्रस्थापित करुन आले असले तरी चीन हा प्रत्येक देशाच्या पाठीत खंजीर खुपसणारांपैकी
देश आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. उदा. जसं पाकिस्तान नेहमीच कुरापती करणारा देश
म्हणुन संपूर्ण जगात कुख्यात आहे.
संपूर्ण जगात (कोव्हीड - 19) कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती
अतिशय नाजुक झाली आहे. लाखो कोरोनाग्रस्त रुग्ण रुग्णालयामध्ये मृत्युशी झुंज देत आहेत.
आपल्या देशामध्ये कोरोना व्हारयसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांची काळजी करणं
व अशा गंभीर परिस्थितीवर मात करणं सर्व देशवासीयांची नैतिक जाबाबदारी आहे व ती जबाबदारी
आपल्या सर्वांना पार पाडायची आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. विनाकारण सोशल मिडीयावर
कोणत्याही पोस्ट शहनिशा न करता व्हायरल करु नका. पूर्ववत छायाचित्रे, चित्राफिती ज्याचा
कोरोना व्हायरसशी कसलाही संबंध नाही अशा पोस्ट पुन्हा पुन्हा त्याचा प्रसार व प्रचार
करुन नका. शासन स्तरावर कोरोना व्हायरस समुळ नष्ट करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न
सुरु आहेत. गोरगरीब जनतेचे बेहाल होतांना दिसत आहेत. त्यांना तीव्र मदतीची गरज आहे. आपल्या देशावरील संकट हटवण्यासाठी आपण स्वत: प्रयत्नशिल रहायला हवे. शिवाय आपण ही शासनाला
जमेल तेवढे सहकार्य, मदत करायला हवी. नियमांचे
काटेकोर पालन करायला हवे. या सर्व देशहिताच्या व जनहिताच्या म्हणजेच आपल्याच हिताच्या
गोष्टी आहेत. पुढचा काळ सर्वांसाठी सुखाचा असणार आहे. आपल्या देशामध्ये एकविस दिवसांचा
लॉकडाऊन करण्यात आला आहे. आपल्या देशाचे मा. पंतप्रधान व प्रत्येक राज्याचे मा. मुख्यमंत्री
व मंत्रीमंडळ आपल्या सर्वांच्या विविध माध्यमांतून संपर्कात आहेत. तसेच डॉक्टर, पोलीस,
नर्स, इतर देशसेवेसाठी सदैव तत्पर असणारे शासकीय
कर्मचारी आपण सर्वजण सुरक्षित रहावे यासाठी झुंज देत आहेत. सोशल मिडीयामुळे आपण प्रत्येकजण ऐकमोकांच्या संपर्कात आहोत. यापुढेही
राहू. याच लॉकडाऊनच्या काळात आपण सकारात्मक फायदा घ्यायाला हवा. आपल्या परिवारासोबत
वेळ घालवा, हितगुज साधा, घरातील काही कामं करायची बाकी असतील तर ती कामं सर्वजण मिळून
पूर्ण करा. घराच्या बाहेर कृपया पडू नका. उद्याचा दिवस सर्वांसाठी उज्जवल आहेच.
-
शंकर शेषेराव चव्हाण, अंबाजोगाई (संपर्क : 9921042422)
Photo Credit by Google
Photo Credit by Google
Comments
Post a Comment