एवढ्यात हार मानू नका; देश पुन्हा नव्यानं उभा करु ! एकमेकांना मदत करा, आपली माणसं ओळखायला शिका; नाहीतर भविष्यात मागाल भिका !
एवढ्यात हार मानू नका; देश
पुन्हा नव्यानं उभा करु !
एकमेकांना मदत करा, आपली
माणसं ओळखायला शिका; नाहीतर भविष्यात मागाल भिका !
देशाची लोकसंख्या पाहता देशात गरीबीचे सावट आहेच, शिवाय दिवसेंदिवस
गोरगरीब, मध्यमवर्गीय नेहमीच कोणात्या ना कोणात्या संकटाशी सामना करत असतो, त्यांचा
संघर्षही तेवढाच. गेल्या महिनाभरा पासून कोरोनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
अनेकांचे भूकबळी गेले आहेत. यावर मात करत प्रत्येकजण येईल तो दिवस कसाबसा पुढे ढकलून
उद्याचा दिवस नक्कीच सखुदायक होईल अशी आशा ठेवून जगत आहे. शासन देशापातळीवर, राज्यपातळीवर
जिल्हा पातळीवर, तालुकापातळीवर व गावपातळीवर कोणीही उपाशी राहू नये याासठी विविध उपाययोजना
करत आहे. अन्नधान्य पुरवठा करत आहे. शिवाय दानशुर व्यक्ती, विविध सामाजिक, सेवाभावी
संस्था, वैयक्तिक, व्यापारी व इतर निस्वार्थपणे गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा
करत आहेत. गेल्या महिनाभरापासून देशातील जनतेनं देशासाठी दिलेलं योगदान खरंच खूप मोठं आहे. जनतेनं पुकारलेल्या
एक दिवसीय बंद मुळे देशातील लॉकडाउन आजपर्यंत यशस्वी झाले व होत आहे. भाविष्यात रुग्णांची
संख्या नक्कीच कमी होईल व सर्व सुरळीत होईल अशी आपण सर्वजण आशा व्यक्त करु शकतो. इथं
प्रत्येकानं देशाला सहकार्य केलं आहे. सर्व नियमांचं पालन केलं आहे. त्यामुळे नक्कीच
देशातील रुग्णांच्या वाढत्या संख्येला ब्रेक बसला यात शंक्काच नाही. असं झालं नसतं
तर नक्कीच मोठा अनर्थ झाला असता अशी शक्यता नाकारता येत नव्हती. भाविष्यात प्रत्येकावर
आर्थिक संकटाचा बोजा वाढणार आहेच. कर्जाचे हप्ते, देणं, रखडलेली कामं इ. सर्वांचे बरडण
प्रत्येकावर येणार आहे. त्यामुळे आधीच मनाची तयार करुन पुढे आलेल्या संकटावर मात करु.
जसं आज सर्वजण एकसाथीने देशाला सहकार्य करत आहोत. आजपर्यंत ज्या चुका केल्या, झाल्या,
त्यावर प्रकाशझोत टाका, हीच वेळ आहे जीवनाची नवीन
सुरुवात करण्याची. जिथं सर्वकाही संपलंय असं वाटत असतं तिच खरी वेळ असते नवीन
काही तरी करण्याची, नवीन आयुष्य सुरु करण्याची त्यामुळे सज्ज व्हा. एवढ्यात हार मानू
नका, देश पुन्हा नव्यानं उभा करु, एकमेकांना मदत करा, आपली माणसं ओळखायला शिका, नाही
तर भविष्यात मागाल भिका. असं जर झालं तर याला कोणीही थांबवू शकणार नाही. आयुष्य सुंदर
आहे, ते सुंदरतेनं जगलं पाहिजे, रुसवे फु गवे सोडा, भाउ बहिणीं सोबतचे, शोजार्यां
सोबतचे वैर, शेतातील भांडणं आजच इथेच सोडा, कोर्टकचेर्या कशा थांबतील ते पहा, वाईट
मार्गाणे पैसा कमवू नका, कोणाच्या जीवाशी खेळू नका, येणार्या काळात देश पुन्हा नव्यानं
स्वच्छ, मजबूत, व सुजलाम सुफलाम कसा करता येईल यासाठी प्रयत्न करुया. वेळ कोणासाठी
थांबत नाही. त्यामुळे आत्मपरिक्षण करणे हे स्वतःच्या प्रगतीचे लक्षण आहे व भविष्य सुंदर
होण्याचे संकेत आहेत. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व द्या. राजकारणामुळे वैर निर्माण
होतं व समाजकार्यामुळे हितसंबंध जोपासतात ज्याचे कुठेही मोल होत नाही.
- शंकर शेषेराव चव्हाण, अंबाजोगाई (संपर्क : 9921042422)
Comments
Post a Comment