स्वत:ला आवडले तसं जगा, कारण आयुष्यात वन्समोर नाही !
स्वत:ला आवडले तसं जगा, कारण आयुष्यात वन्समोर नाही ! तुम्ही स्वत:शी प्रामाणिक राहीलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल यात शंक्काच नाही. स्वत:साठी आयुष्य जगायला कसलीही हरकत नाही. अतियश स्वत:चसाठी जगलात तर त्यात तुम्ही कसल्याही प्रकारचे दोषी नसाल किंवा त्याची खंत अजिबात करत बसण्याची आवश्यकता नाही. स्वत:ला आवडेल तसंच जगायला पाहिजे. जन्म मृत्यूच्या साखळीप्रमाणे जन्म तिथे मृत्यू आहेच. मृत्यू हा लॉस नसून तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदपूर्ण आयुष्य जगला नाहीत, मानासारखं जगला नाहीत तर तुम्ही आयुष्यच जगला नाहीत याचा अर्थ जवळजवळ असाच होतो. आयुष्य जगण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर सदासुख, हसतमुखपणा किती आहे त्यावर ठरतं की तुम्ही तुमचं आयुष्य किती आनंदी व सुखमय जगता. मरावे परि किर्तीरुपी उरावे असं म्हणतात हे पण तितकंच खरं आहे, परंतू स्वत:च्या आयुष्याची माती करुन नव्हे. सोशल मिडीयावर दररोज खुप सुविचार पोस्ट होत असतात, परंतू त्याचा वापर कुठे व केव्हा व्हावा असं ज्याला कळलं त्यालाच आयुष्य कळलं. आपण स्वत: व आपला परिवार अगोदर व नंतर बाकी समाज असा विचार हा मर्यादीत असून तुटपुंजा वाटत ...