स्वत:ला आवडले तसं जगा, कारण आयुष्यात वन्समोर नाही !

 


स्वत:ला आवडले तसं जगा, कारण आयुष्यात वन्समोर नाही !

तुम्ही स्वत:शी प्रामाणिक राहीलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल यात शंक्काच नाही. स्वत:साठी आयुष्य जगायला कसलीही हरकत नाही. अतियश स्वत:चसाठी जगलात तर त्यात तुम्ही कसल्याही प्रकारचे दोषी नसाल किंवा त्याची खंत अजिबात करत बसण्याची आवश्यकता नाही. स्वत:ला आवडेल तसंच जगायला पाहिजे. जन्म मृत्यूच्या साखळीप्रमाणे जन्म तिथे मृत्यू आहेच. मृत्यू हा लॉस नसून तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदपूर्ण आयुष्य जगला नाहीत, मानासारखं जगला नाहीत तर तुम्ही आयुष्यच जगला नाहीत याचा अर्थ जवळजवळ असाच होतो. आयुष्य जगण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर सदासुख, हसतमुखपणा किती आहे त्यावर ठरतं की तुम्ही तुमचं आयुष्य किती आनंदी व सुखमय जगता. मरावे परि किर्तीरुपी उरावे असं म्हणतात हे पण तितकंच खरं आहे, परंतू स्वत:च्या आयुष्याची माती करुन नव्हे. सोशल मिडीयावर दररोज खुप सुविचार पोस्ट होत असतात, परंतू त्याचा वापर कुठे व केव्हा व्हावा असं ज्याला कळलं त्यालाच आयुष्य कळलं. आपण स्वत: व आपला परिवार अगोदर व नंतर बाकी समाज असा विचार हा मर्यादीत असून तुटपुंजा वाटत असला किंवा मतलबी वाटत असला तरी हे सत्य आहे. हल्ली कोणावर कितीही प्रेम करा, कितीही जीव लावा माणूस दगा देतोच आहे. प्रत्येकजण पैशांच्या अवतीभोवती घोंगावतोय, पैशांच्या जोरावर प्रेम, माया तरंतगत आहे, पैशांच्या जोरावर नात्यांचे तोलमोल होत आहे, ज्याच्याकडे जास्त पैसा तो जास्त नातीगोती सांभाळतोय असं खोटं नाटं चित्र पहावयास मिळत आहे. तसं पाहिलं तर पैसा हेच सर्वस्व आहे असं कधी कधी वाटतं पण जेव्हा पैशांपुढं कोणीच श्रेष्ठ वाटत नाही, किंवा पैशांमुळं काहीच जीवनातलं पान हलत नाही, तेव्हा खरंच असं वाटतं की, पैसा हेच सर्वस्व आहे. पण अशा गोष्टींचा जास्त विचार करायचा नसतो. आपलं आयुष्य आनंदी जगण्यासाठी आपण जन्माला आलो आहोत याचा प्राथमिक अंदाज आला पाहिजे. त्याच गोष्टीलाप्राधान्य दया ज्या गोष्टींमुळे आपला परिवार दुखावला जाणार नाही किंवा आपल्या परिवाराला व स्वत:ला आपण घेतलेल्या निर्णयामुळे त्रास होणार नाही. धकाधकीच्या व स्पर्धेच्या जीवनात हल्ली आपण आपल्या आरोग्याकडं फारच दुर्लक्ष करतांना दिसत आहोत. मला त्या लोकांना एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल की, “सर सलामत तो पगडी पचास” हे एक छोटसं वाक्य जीवनाचा अर्थ सांगून जातं की, यातच आरोग्यसंपन्न जीवनाचं सार दडलंलं आहे. तुम्ही जीवनात आल्यानंतर गरीब म्हणून जन्माला आला तरी चालेल कारण त्यात तुमची कसल्याही प्रकारची चुक नाही परंतू तुम्ही गरीबीतच मेलात तर हीतुमची चुक आहे असं जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बील गेस्ट आपल्याला त्यांच्या अनेक भाषणांमधून सांगतात. हे मला खरं वाटलं व आवडलं सुध्दा पण प्रत्येकजण श्रीमंत होईलच असं तर नाही. पण इतक्या श्रीमंतीमध्ये आरोग्यच नसेल तर त्या पैशांचा काय उपयोग? त्यामुळं पैसा कमवा पण कामापुरता, मी तर म्हणेन पैसा असावा नेटका कारण रात्रीची झोप ज्याला शांत व समाधानी लागते त्यालाच जगातला सर्वात सुखी व्यक्तीमत्व मी मानलेलं आहे हे माझ वैयक्तिक मत आहे. तुम्ही तुमचं आयुष्य आरोग्यदायी, आनंदानं व आपल्या परिवाराला कसल्याहीप्रकारचं दु:ख न देता पूर्ण केलं असेल तर यासारखं समाधान जगात कुठेच नाही असंच मी म्हणेन. धकाधकीच्या जीवनात पैसा कमावन्याच्या मोहामध्ये तुम्ही स्वत:ला कधीच धोका होईल असं काम करु नका किंवा तुमच्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जातील असं कृत्य तुमच्या हातून घडू नये याची काळजी घ्या. मी तर म्हणेन तुम्ही महिन्यातला एक दिवस उनाड जगालात तरी चालेल, कारण इतर दिवसांपेक्षा एक दिवस स्तव:साठी जगलात किंवा उनाड जगलात तर आयुष्य पाच वर्षांनी वाढतं असं सशोधनातून समोर आलं आहे. जीवन सुखी जगा, सत्याच्या वाटेवरंच जगा, समाधानी रहा, इतरांना धोका दिला असेल तर ती चुक सुधारा, माफी मागायला कधीही कमी पणा समजू नका, मी पणामध्ये जगू नका, असं जगा की तुम्ही गेल्यानंतर जनावरांच्या सुध्दा डोळयातून अश्रू ओघळले पाहिजेत. यात जे समाधान आहे ते जगाच्या पाठीवर कुठेही पहायला मिळणार नाही हे लक्षात ठेवा. लोक काय म्हणतील याचा विचार जर करत बसाल तर स्वत:वर आत्यहत्या करण्याची वेळ येईल हे लक्षात ठेवा. नेहमी सत्याच्या वाटेवर चाला व निर्भिड रहा, ताठ मानेनं जगाल तर तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही आणि सर्वात महत्वाची गोष्टी म्हणजे दररोज वाचनासाठी किमान एक तास दया, खुप चांगली पुस्तंकं वाचा व आपल्या ज्ञानामध्ये भर टाका. स्पर्धेच्या युगात ज्ञान हेच तुमचं सामर्थ्य आहे हे विसरु नका, जीवनात सहवास अशा व्यक्तीसोबत ठेवा की, तुमच्या आयुष्याला त्या व्यक्तीमुळं वळण लागेल व कलाटणी मिळेल. कधीही आयुष्य खोटया समाधानासाठी जगू नका, कारण हा जगातला सर्वात मोठा स्वत:शीच केलेला घात आहे. आई वडीलांशी मरेपर्यंत इमानदारीने रहा, त्यांच्या मनाला चटका बसेल असं एकही वाक्य त्यांना बोलू नका. त्यांचा तुमच्यावरचा विश्वास हा त्यांचा श्वास असतो, लग्न झालेल्यांनी आपल्या पत्नीवर कधीही हात उचलू नका कारण तिचं आयुष्य हे पतीच्या आवतीभोवती असंत. तिचं जग हा त्या स्त्रीचा पतीच असतो. त्यामुळं तिला कधीही दु:खवू नका, नवरा बायकोएवढं प्रेमाचं व खरं नातं जगाच्या पाठीवर कोणतंच नाही हे अजिबात विसरु नका. कर्ज झालं म्हणून कधीही आत्महत्या करु नका, आयुष्य खुप अनमोल आहे. वाहन असं चालवा की आपली घरी कोणी तरी वाट पहात आहे याचं भान ठेवा किंवा आपल्यामुळं इतरांच्या परिवाराचं नुकसान हाईल याचंही भान ठेवा. ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. टेन्शन घेऊन कोणाचं भलं झालं नाही, चिंता करुन कोणतेही प्रश्न सुटत नाहीत, प्रश्न सुटतात ते फक्त सकारात्मक प्रयत्न केल्यानं. जीवनात संघर्ष प्रत्येकाच्या वाटयाला आहे, या जगात परफेक्ट असं कोणीच नसतं, प्रत्येकजण विदयार्थी आहे आयुष्यभर प्रत्येकाला आयुष्याच्या या शाळेत काही ना काही रोज नवनवीन शिकायचं असतं. इतरांची कदर करायला शिका, इतरांना सन्मान दयायला शिका कारण गिव्ह रिस्पेक्ट ॲण्ड टेक रिस्पेक्ट असं इंग्लिशध्ये म्हण आहे. रोज नवीन काही तरी शिका, त्यामुळं तुमच्या आयुष्याच्या आड येणारे सर्व संकटं पळून जातील व तुम्हाला यश मिळवण्यासाठी तुमचे रस्ते मोकळे होत जातील. मित्रांनो आयुष्य कसं जागावं यासाठी खुप काही लिहिण्याची गरज नाही फक्त एवढंच करा की, जगतल्या मनुष्य प्राण्याला व मुक्या प्राण्याला कसलाही त्रास न होता स्वत:ला आवडले तसं जगा, कारण आयुष्यात वन्समोर नाही !

-         -शंकर चव्हाण, 9921042422


Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

‘व्यसन एक फॅशन’

अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय …

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..