एक व्हिडीओ कॉल आणि बँक खाते रिकामे झाल्यावर व्हाल बेहाल …
एक व्हिडीओ कॉल आणि बँक खाते रिकामे झाल्यावर
व्हाल बेहाल …
दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी मोठया
प्रमाणत वाढत आहे. सायबर सेलच्या आवाक्याबाहेर सायबर गुन्हेगारी जाईल की काय अशी भिती
वाटत आहे. जसं आयटी क्षेत्रात दररोज विविध शोध लागत आहेत व आयटी क्षेत्रामुळे मानवाच्या
दैनंदिन जीवनात क्रांती झाली तसंच सायबर गुन्हेगारी क्षेत्रातही आयटी क्षेत्राप्रमाणेच
नवनवीन तंत्राज्ञानाचा वापर करुन जणू सायबर गुन्हेगारी प्रगतीपथावरच आहे असं वाटत आहे.
सायबर गुन्हेगारांनी मात्र नेहमीच अटकेपार झेंडे लावून सर्वसामान्यांची आर्थिक लूट
आजवर केली आहे. कधी बँक खाते रिकामे करतात, तर कधी फोन करुन एटीएम क्रमांक मागून ओटीपीद्वारे
बँक खात्यामधील पैसे गायब करतात, तर कधी क्रेटीड कार्डवरुन शॉपींग करतात, तर कधी मॉलध्ये
जाऊन डेबीड कार्डवरुन शॉपींग करतात, तर कधी युपीआय ॲपच्यामाध्यमातून कोड स्कॅनर पाठवून
आर्थिक लुट करतात, तर कधी गुगल पे, फोन पे किंवा इतर वॉलेटवर रिक्वेस्ट पाठवून डल्ला
मारतांनाचे प्रकार आपण नेहमीच पाहिले आहेत. आता हे सर्व चोरीचे प्रकार आपण आपल्या दैनंदिन
जीवनशैली मध्ये ॲडजस्ट केले आहे आणि आपण दुसरं करु तरी काय शकतो. असं असतांनाच आणखी
एक चोरीचा व फसवणुकीचा प्रकार सायबर गुन्हेगार तर करतच आहे शिवाय काही स्मार्टफोन वापरणारे
भुरटे चोर सुध्दा अशा प्रकारच्या किरकोळ चोऱ्या करु लागले आहेत. हल्ली अनेक व्यापाऱ्यांनी
ग्राहकांच्या सोयीसाठी दुकानाबाहेर, चहाच्या टपरीवर, किराणा दुकानं, शॉपींग मॉल्स,
दारुची दुकानं, मेडीकल दुकान वगैरे वगैरे दुकानाच्या बाहेर विविध पेमेंट स्विकारणाऱ्या
कंपन्यांची स्कॅनर कोड लावलेले आहेत. त्यास्कॅनरच्या बदल्यात नकळत दिशाभूल करुन काही
चोरटे आपले स्कॅनर स्टिक करुन अनेकांची आर्थिक लुट करत असल्याचे समोर आले आहे. त्यातच
काहीजणांकडे तर पेमेंट सक्सेस झाल्याचे बनावट ॲप सुध्दा असल्याचे अनेक सीसीटीव्ही व
व्हिडीओद्वारे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारामुळे सर्वांच्याच नाकात दम या सायबर गुन्हेगारांनी
करुन ठेवला आहे. त्यात आणिखी एका या सर्व प्रकारांहूनही भयानक आर्थिक लुट करणारा घणेरडा
प्रकाराचा उदय झाला आहे. व्हिडीओ कॉलींगचा आपण सर्रास वापर करतो, त्यामध्ये आपण व्हिडीओ
कॉलींग करण्यासाठी व्हॉटसॲप, टेलीग्राम, गुगल डिओ, फेसबुक किंवा इतर तत्सम मोबाईलचा
बिनधास्तपणे वापर करतो. आपल्याला आपल्या परिवारापैकी किंवा मित्र मैत्रिणींपैकी व नातेवाईक
यांच्यापैकीच व्हिडीओ कॉल करतात व आपण ते रिसीव्ह करतो देखील शिवाय आपल्याकडे जेजे
आपल्याला व्हिडीओ कॉल करतात त्यांचे संपर्क क्रमांक मोबाईमध्ये सेव्ह असतातच की. पण
याउलट सायबर गुन्हेगार हे आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या व्हिडीओ कॉलींग ॲपवर व्हीडीओ
कॉल करतात व आपला व्हिडीओ कॉल जशास तसा रेकॉर्ड करतात. त्यामध्ये एक विचित्रपणा व घाणेरडेपणा
असतो तो म्हणजे जर स्त्रियांच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल आला तर समोर विवस्त्र अवस्थेत
पुरुष असतो व पुरुषांच्या मोबाईलवर जर व्हिडीओ कॉल आला तर समोरच्या व्हिडीओ कॉलमध्ये
विवस्त्र अवस्थेत स्त्री आपल्याशी संवाद साध्यासाठी तयार असतात व आपण व्हिडीओ कॉलला
उत्तर दिल्यापासून आपण तो कॉल बंद करेपर्यंत हे सायबर गुन्हेगार आपला व्हिडीओ कॉल रेकॉर्ड
करण्यास कसल्याही प्रकारची कसूर करत नाहीत. हे मात्र लक्षात असू दया. त्यानंतर तोच
रेकॉर्ड केलेला व्हिडीओ कॉल आपल्याच मोबाईलवर पाठवून सदर रेकॉर्ड केलेला व्हिडीओ जर
तुम्ही आत्ताच्या आत्ता तात्काळ खात्यावर, युपीआय आयडीवर किंवा स्कॅनर स्कॅन करुन पैसे
पाठवले नाहीत तर हाच व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करणार असल्याबाबतच्या धमक्या दिल्या
जातात. अनेकजण आपली अब्रु वाचवण्यासाठी पैसे पाठवतात सुध्दा व अनेकजण त्या मोबाईल क्रमांकावर
गुन्हाही दाखल करतात. पण पैसे पाठवणारांची संख्या ही 99 टक्के आहे व हुशारीने वागणाऱ्यांची
संख्या फक्त 1 टक्का आहे. म्हणूनच देशातील 99
टकके लोकांची ही आर्थिक फसवणूक ही सायबर गुन्हेगारांपासून होते यामधून कोणीही
सुटू शकत नाही. त्यासाठी आपण वेळीच हुशारीने पाऊल उचलणे गरजेचे आहे. वेळीच सावधगिरीने
राहण्याची गरज आहे. थोडासाही निष्काळजीपणा व अनावधानाने झालेल्या गोष्टींबाबत शेवटी
पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही हे लक्षात असू दया. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्याला
जे जे लोक व्हिडीओ कॉल करतात त्यांचे मोबाईल क्रमांक आपल्याकडे सेव्ह असतात. म्हणून
अनोळखी व्यक्तीला महिला असो किंवा पुरुष असो व्हिडीओ कॉलला उत्तर अजिबात दयायचे नाही
किंवा अनोळखी व्हिडीओ कॉल किंवा अनोळखी मोबाईलवरुन आलेल्या मेसेलला कसल्याही प्रकारची
प्रतिक्रिया किंवा रिप्लाय करायचा नाही. अशा प्रकारामध्ये पुरुषांची मोठया प्रमाणात
अर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यासाठी मोबाईल वापरत असतांना अनोळखी व्हिडीओ
कॉल अजिबात उचलायचा नाही म्हणजे नाहीच. एवढं साधं सोपं गणित लक्षात आलं की मग झालं.
त्यानंतर कोणही अशा प्रकारापासून तुमची फसवणूक करणार नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे
ऑनलाईन घरी बसुन कमवा अशा प्रकारच्या जाहिरांती फसव्या असू शकतात, महिला वर्गाची या
माध्यमातून जास्त फसवणुक झाल्याचे गुन्हे मोठया प्रमाणार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे
विशेषत: महिलांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. घरी बसुन कमवा असल्या फसव्या जाहितीच्या
अमिषाला अजिबात बळी पडू नये यासाठी खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. सर्वच जाहिराती
फसव्या असतात असं नाही पण शंभरटक्के खात्री असल्याशिवाय आर्थिक व्यवहार करुन नका किंवा
आपली गोपनीय माहिती इतर अनोळखी व्यक्तींना अजिबात देऊ नका.
- शंकर चव्हाण, (महाराष्ट्र राज्य), 9921042422
Write to : hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment