Posts

आणखी किती करावा संघर्ष …

Image
आणखी किती करावा संघर्ष … समुद्रात एखादा व्यक्ती पडला तर त्याला किनाऱ्यावर येण्यासाठी जीवाचा आटापीटा करुन आकांताने समुद्र किनाऱ्यावर पोहचण्यासाठी जसा संघर्ष करावा लागतो तसा संघर्ष महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला एखादी हक्काची बाबत मिळवण्यासाठी करावा लागतोय . महाराष्ट्रातील राजकारण भलीतकडेच जात असल्याने त्याने उग्र रुप धारण केले आहे . जिथं तिथं चौकटी तयार झाल्या आहेत . त्यात जातीपातीच्या चौकटीबाबत तर बोलायलाच नको . एखादया व्यक्तीची ओळख करण्यापासून ते तो मरेपर्यंत आयुष्यात प्रत्येक क्षणाक्षणाला त्याची जात काही जाता जात नसल्यामुळे हया संघर्षमय जीवनाची वाटचाल हा माणूस प्राणी करत आहे . प्रत्येकाला आरक्षण हवंय , प्रत्येकाला आरक्षण कोठयातून नौकरी हवी आहे , प्रत्येकाला शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ हा जातीच्या आरक्षणातून हवाय . मात्र या सर्व गोष्टींपासून एखादा समाज का वंचित राहतो याचा खरंच विचार करावा ? हा विचार नक्कीच नैतीक जबाबदारीने करावा लागेल . भारतीय राज्यघटनेप्रमाणे प्रत्...

तुमचं समदं खरं हाय ! पण माझं काय ?

Image
तुमचं समदं खरं हाय ! पण माझं काय ? माननीय महोदय तुमचं सारं काही खरं झालं, माझा महाराष्ट्र, माझा देश हा विकासाच्या उंबरठ्यावर आहे. असं तुम्ही जाहिरातींमधून आम्हा शेतकऱ्यांना सांगता. पण, मला या विकास जो काय असतो त्याबाबत थोडं मन मोकळं करायचं आहे. माझं काहीच भांडण नाही तुमच्याशी. पण, तुम्ही म्हणता शेतकऱ्यांचा विकास झाला, तुम्हाला कुठे दिसला हो शेतकऱ्याचा विकास ? तुम्ही साधी कर्जमाफी करायला, अभ्यास करत बसला होता ! खरंच अभ्यास करण्याने कर्जमाफीचा गुंता सुटला का हो  ? तुम्ही बुलेट ट्रेन, विमानसेवा, रेल्वे सेवा, रस्ते, उड्डाणपूलं वगैरे वगैरे, विकासाच्या बाता करता. पण, माझ्या अंगावरचे मळकटलेले कपडे मात्र अजूनही बदलले नाहीत. याला आपण खरंच विकास म्हणणार का हो ? मला एक सांगा !  शेतीमालाला भाव देण्यासाठी मला प्रतिवर्षी संघर्ष करावा लागतो. त्याचा तिढा आजपर्यंत एकही प्रतिनिधी सोडवू शकला नाही. खत बियाणे घ्यायचं म्हटलं की, दरवर्षी मला पहिल्या वर्षांपेक्षा जास्त दराने मिळतात. याचा गंभीर्याने विचार तुम्ही कधी केलाय का ? महोदय, आम्हा शेतकऱ्यांना शेतीव्यतिरिक्त इतर काहीही उत्पन्न नाही,...

खेडयातही माणसंच राहतात ...

खेडयातही माणसंच राहतात ... शहरांपेक्षा खेडयांमध्ये आजही खेडयातील लोक समस्येच्या विळख्यात पार अडकलेले पहावयास मिळतात व शासकीय लाभपासून प्रत्येक व्यक्ती हा तितकाच तहानलेला असतो हे मान्य करावेच लागेल . देश स्वतंत्र झाल्यापासूनचा आजपर्यंतचा अभ्यास केला असता . शहरांचा विकास अतिशय तेजीत होतोय परंतू खेडयांमध्ये आजही अन्न , वस्त्र निवारा व इतर मुलभूत हक्कांपासून खेडयातील माणसं आजही वंचीत आहेत . आजही बऱ्याच खेडेगावात पिण्यासाठी मुबलक पाणी नाही , रस्ते नाहीत , विज नाही , बऱ्याच नागरीकांना स्वत : ची पक्की घरं नाहीत . बरेच मजुर हे कामापासून वंचीत आहेत पत्येकाच्या हाताला काम हे वाक्य सुध्दा आता अपुरी पडत आहेत अपुरी नाही तर हे म्हणणे लागूच होत नाही . हे वाक्य सत्ताधाऱ्यांनी जाहिरातीत वापरंलेलं आहे आत्ताचे सत्ताधारी असोत किंवा यापूर्वी होवून गेलेले आत्ताचे विरोधक . मात्र प्रत्येकाच्या हाताला काम कोणीच देवू शकलं नाही ही या महान अशा महाराष्ट्र राज्याची शोकांतीका आहे . राज्यात कित्येक त...