आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा


आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा


लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे वसंत मुंडे समाजासमोर एक आदर्श पत्रकार म्हणून उभे आहेत. सामाजिक जाणीव असणारे पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा म्हणजेच त्यांच्या पत्रकारीता क्षेत्रातील खडतर प्रवास त्यांचा भला अनुभव होय. पत्रकार वसंत मुंडे यांचे पूर्ण नाव वसंत माधवराव मुंडे असे आहे. लाडझरी (तालुका परळी) येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. माध्यमिक शिक्षण घाटनांदूर ता. अंबाजोगाई या गावी पूर्ण केले. बी.. बी.जे. (बॅचलर ऑफ जर्नालिझम) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठातून येथे पूर्ण झाले.. 2003 पासून दैनिक लोकसत्ताचे बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत. त्यापूर्वी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच दैनिक मराठवाडा साथी दैनिक लोकपत्र या दैनिकांसाठी बातमीदार म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली होती. हा त्यांचा अल्पसा परिचय. लहान असतांनाच त्यांच्या वडीलांचे  निधन झाले. वसंत मुंडे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांनी अतिशय हालाखिच्या परिस्थतीमधून कष्ट करुन वसंतु मुंडे यांच्यासह त्यांच्या भावंडाचा सांभाळ केला शिक्षणाची जबाबदारी पूर्ण केली. शाळेमध्ये असतांना गुरूजनांच्या मार्गदर्श्नानुसार त्यांचे शालेय जीवन सुरू असतांना गुरूजनांनी त्यांना कमवा शिका असे धडे दिल्यामुळे वसंत मुंडे हे शिक्षण शिकत तेलाच्या मिलमध्ये रात्रपाळीवर काम करत असत. वसंत मुंडे यांच्या जीवनामध्ये कलाटणी देण्याऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्या त्यांनी तशाच जाणीवेत जपून ठेवल्या आहेत. त्यातली एक म्हणजे अंबाजोगाईमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना वनविभागातील एका प्रकरणामध्ये लोकमतचे पत्रकार प्रा. मोटेगावकर सर यांच्याकडे ते गेले त्यांनी तो विषय मार्गी लावल्यानंतर त्यांचा प्रभाव वसंत मुंडेच्या कानावर पडला पत्रकार होण्याची इच्छा निर्माण झाली. दरम्यान ॲड सिध्दीकी यांच्या घरी पत्रकार मुस्ताक हुसेन विजय हमीने यांची ओळख करुन दिल्यानंतर दैनिक मराठवाडा साथी दैनिक लोकपत्र या दैनिकांसाठी बातमीदार म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. दरम्यान अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या आंदोलनाममध्ये पोलीसांकडून मारहाण झाली. एक हात मोडला गेल्याने इतर ठिकाणी काम करण्याचा मनामध्ये त्यांनी पक्का निश्चय केला. पदवीचे शिक्षण पूर्ण होत असतांना शेवटच्या वर्षामध्ये त्यांना दैनिक लोकपत्रचे संपादक सुनिल पाटील यांनी बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यावेळी अंबाजोगाई येथे वसंत मुंडे यांचे मित्र पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी जगदीश पिंगळे यांच्या हस्ते सत्कार केला या सत्काराची थाप पाठीवर पडताच वसंत मुंडे यांना प्रोत्साहन प्रेरणा मिळाली पत्रकारीता क्षेत्रामध्ये आदमीने काम करण्याची उर्जा प्राप्त झाली. पत्रकारीता क्षेत्रामध्ये काम करत असतांना त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक पुरस्कार वसंत मुंडे यांना प्राप्त झाले आहेत. उस्मानाबाद मराठी पत्रकार परिषदेचा शोध वार्ता गटातील प्रथम पुरस्कारचे मानकरी वसंत मुंडे हे ठरले. उपेक्षित दलित, उसतोडणी कामगारांच्या लिखानावरुन समर्थन सेवाभावी संस्थेकडून शिष्यवृत्ती वसंत मुंडे यांना मिळाली. .. 2007 मध्ये ग्रामीण भागाच्या विकासाच्या अंमलबजावणीचा कायदा असं एक विधेयक पंतप्रधान मनमोहन सिंग (रुरल डेव्हलंपमेंट इम्लीमेंटेशन ॲक्ट) असा कायदा आमलात आणण्याचा केंद्र सरकारचा विचार होतो. यासाठी त्यावेळी देशभरातून पन्नास पत्रकारांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातून दोघांची निवड झाली त्यामध्ये वसंत मुंडे यांची निवड झाली होती. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बरोबर लाईव्ह कार्यक्रममध्ये एनर्जी सेव्हींग हा विषय वसंत मुंडे यांना मिळाला होता. अशी निवड होणं म्हणजे बीड जिल्हयासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा इतिहास संशोधक जेष्ठ संपादक .मा.गर्गे यांच्या नावाने मागील दहा वर्षापासून राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराची योजना राबवतात. हा पुरस्कार म्हणजे नाट्यक्षेत्रातला भावे  पुरस्काराशी आहे त्याच मानाचा .मा. गर्गे पुरस्कार आहे. बीड जिल्हयाचा ऋनानुबंध राज्यातल्या पत्रकारीता क्षेत्रातल्या दिग्गजांबरोबर व्हावा त्यांच्या कार्याचा बीड जिल्हयातून गौरव व्हावा यासाठी या योजना हेतू आहे. तसेच समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थाना वसंत मुंडे नेहमी पाठबळ सहकार्य करत आले आहेत. वसंत मुंडे सध्या दैनिक लोकसत्ता बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करता आहेत. महाराष्ट्र शासन विभागीय पत्रकार अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष म्हणून ते काम पहात आहेत. बीड जिल्हा पत्रकार संघाचे ते अध्यक्ष असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ते प्रदेश कार्याध्यक्ष आहेत. वसंत मुंडे यांना आपले आदर्श वयक्तीमत्व कोणते का ? असा प्रश्न विचारल्यास ते सांगतात की, प्राचार्य भगवानराव सबनीस आणि लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमातील भाषणाचा वसंत मुंडे यांच्या कानावर प्रभाव पडला आणि तेच आदर्श ठरले. विभागीय अधिस्वीकृती समितीने पहिल्यांदाच थेट पत्रकारांबरोबर खुली चर्चा केली. त्यामुळे विभागीय तसेच जिल्हा तालुका स्तरावरील काम करणाऱ्या पत्रकारांना अधिस्विकृती पत्रीका मिळवून देण्यासाठी वसंत मुंडे यांची धडपड सुरूच आहे. वसंत मुंडे यांच्याकडं पाहिल्यास त्यांच्या जीवनाकार्याचा अभ्यास केल्यास आदर्श पत्रकारीतेची व्याख्या त्यांच्यातून दिसून येते. एवढेच नव्हे तर सर्व समाजातील तळागाळातील घटकांसोबत मनमिळावू वृत्तीने जीवंत पत्रकारीता करणे हा त्यांचा सहज स्वभाव असल्याचे जाणवते. वसंतु मुंडे यांच्या बद्दल्ल लिहिण्यास आणखी भरपूर आहे त्यांचे कार्य सामाजिक योगदान अत्यंत मोठे उल्लेखनीय आहे. केवळ परीक्षेत  मिळणाऱ्या गुणांसाठी अभ्यास करता मोठमोठया विचारवंतांची पुस्तके, साहित्य विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे. आपल्याअवतीभोवती खुप ज्ञानी चांगली माणसं असतात. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी नक्कीच घेतला पाहिजे. इतिहासाचे आवलोकन करुन वर्तमान आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा त्यातूनच जीवन सुंदर घडते असा संदेश वसंत मुंडे विद्यार्थ्यांना नेहमी देत असतात.  त्यांच्या या कार्यास सलाम पुढील कार्यास शुभेच्छा.
शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

‘व्यसन एक फॅशन’

अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय …

'यशाला' शॉर्टकट नाहीच !