फडणवीसांचे ‘राज’कारण, अन् विसरुन गेले कोपर्डी प्रकरण ?
फडणवीसांचे ‘राज’कारण, अन् विसरुन गेले कोपर्डी प्रकरण ? कोपर्डी प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्रच नव्हे तर अख्खं जग आजही हळहळ व्यक्त करत आहे. जे झाले ते फार फार चुकीचे, विकृत, अमानुष, अपनेक्षित घडले. आरोपी पप्पू शिंदे या निर्लज्ज, लिंगपिसाट, कलंकीत, विकृत बुध्दीच्या नालायकाने हे अघोरी कृत्य करुन या लोकशाहीचा डंका वाजवणाऱ्या देशाला पुन्हा एकदा सांगून दिलंय कि बाबानों या देशात स्त्री ही सुरक्षित नाहीच. आज चार महिने उलटून गेले मात्र अरोपी पप्पू शिंदेला ना न्यायालय कठोर शिक्षा देऊ शकले, ना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस याबाबत निर्णय घेऊ शकले. मोदी लाटेमध्ये अनावधानाने निवडणुन व अनपेक्षित सत्ता मिळालेल्या या सरकारला चार महिने जाऊनही बलात्कार करुन निघृण खुन करणाऱ्यांना आरोपींना शिक्षा देण्यासाठी आदेश काढायला किंवा त्या विषयाकडं ढुंकूनही पहायला वेळ नाही. अन् कोण कुठला तो ‘करण जोहर’ पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमा बनवतो, आपल्या राज्याचे जबाबदार मुख्यमंत्री व आश्वासनांचा पाऊस पाडणारे नेतेमंडळींना बरोबर घेऊन एका वाडयावर घेऊन ‘सेटलमेंट’ करतात ? जणू काही मानवाच्या मुलभूत गरजांची पूर्तताच होणं ...