लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !
शब्दांनी करतो प्रहार, धाडसी झुंजार, समाजसुधारणा निर्धार, विचारांत बळ शब्दांना धार, सुरक्षित समाजाचा शिल्पकार, झेप गरुडाची नजर सभोवार, असत्याचा करतो संहार, हाती लेखाणी तलवार. अशा या शब्दअलंकाराने लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची म्हणजेच पत्रकार या व्यक्तीमत्वाची व्याख्या तोंड भरुण केली तरी कमीच आहे असं मी नक्कीच म्हणणे. समाजासाठी हा सत्याचा आरसा समजला जातो. लोकांचा प्रचंड विश्वास असणारं प्रतिभावंत व प्रामाणिक उदाहरण म्हणून पत्रकारीतेकडं पाहिलं जातं. वृत्तपत्रविदया अवगत करण्यासाठी लेखणी तलावार व शब्दांची ढाल करुन अन्यायाच्या विरोधत लढण्यासाठी सज्ज असलेला पत्रकार. भल्याभल्यांना आपल्या शब्दांनी व परखड लेखणीच्या माध्यमातून चारीमुंडयाचित करणारा पत्रकार. पण हल्ली पत्रकरीता क्षेत्रामध्ये काही उणीवा जाणवू लागल्या आहेत. पत्रकारीतेला एक वेगळंच वळण लागलेलं पहावयास मिळत आहे. जनतेच्या मनात पत्रकारीतेबद्दल ज्या भावना होत्या त्या भावना बदलल्याचं कुठंतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जाणवत आहे. गेल्या काही वर्षापूर्वी पत्रकाराची जी छाप होती ती आज राहिली नसल्याचे भासू लागले आहे. पत्रकरीता क्षेत्राला एक वेगळेच वळण लागले असून जनतेचा विश्वास हळूहळू कमी होईल की काय अशी भिती वाटू लागली आहे. दैनंदिन जीवनातध्ये वृत्तपत्र ही एक गरज असल्यामुळे सकाळच्या चहाबरोबर नियमित वृत्तपत्र हाताळणारा प्रत्येक नागरीक हा वृत्तपत्रक्षेत्राकडे वेगळयाच नजरेने पाहण्याचा प्रयत्न तर करत नाही ना असे भय निर्माण होऊ लागले आहे. त्याची बरीच कारणे आहेत. हा एवढा तेवढा अभ्यास नसून खूप खोलवर जावून अभ्यास केल्यास असे का बरे होत आहे हे नक्कीच जाणवेल. पत्रकरीतेला राजकिय व्यसन लागल्यामुळे किंवा राजकिय क्षेत्रातली किड ही पत्रकारीतेमध्ये आल्यामुळे लोकशाहीचा चौथ्या आधारस्तंभ जणू हरवत चालल्याचे चित्र दिसू लागले आहे. राजकिय पुढाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालेल्या काही पत्रकरांमुळे सर्वच पत्रकारीताक्षेत्राला मर्यादेची एक चौकट तयार झाली असून  जणू कायद्याच्या चौकटीप्रमाणे त्या चौकटीच्या बाहेर जावून आपले लेखणीरुपी धारदार असणारे शस्त्र बोथट झाल्याचे जाणवते. हे एक कारण पुरेसे नव्हे. पत्रकारीता क्षेत्रामध्ये काम करत असतांना कशाचीही तमा न बाळगता, उपाशी पोटी, वृत्तासंकलनासाठी शरीरप्रकृतीकडे न लक्ष देता काही पत्रकार बांधव या जीवघेण्या स्पर्धेमध्येही आपले अस्तित्व टिकवून आहेतच. पण हाताची पाच बोटे सारखी नसतात याप्रमाणे पत्रकारीता क्षेत्राला डाग लावणारे, पत्रकारीता क्षेत्रामध्ये बाधा आणणारे काही पत्रकार रुपी कंठक निर्माण झाले आहेत. त्यांना आपण राजकिय पुढाऱ्यांचे चेले म्हणू हवं तर. या चेल्यांमुळे प्रामाणिक काम करणाऱ्यांनच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊन त्यांच्या लेखणीला बोथट करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. सर्वकाही पैशाने विकत घेता येणाऱ्या गोष्टींपैकी एक पत्रकारीता ही विकली जाऊ लागल्याने आधारस्तंभ हा कमकुवत बनला आहे. एका एका तालुक्यात जवळपास शंभरीच्या आसपास पत्रकारांची संख्या असते. पैकी सक्रिय हे आठ ते दहाच असे एका संशोधनादरम्यान लक्षात आलेली बाब आहे. मग हे बाकीचे काय बरं करत असतील ? तर जवळपास शंभरपैकी आठ ते दहा आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेले पत्रकार पैकी उरलेले नव्वद लोक हे राजकिय पुढाऱ्यांची लाळ पुसण्याचे, नंदी बैलासारखे मान हलवणारे. पुढाऱ्यांच्या काहीही नकारात्मक गोष्टी आपल्या लेखणीचा दुरूपयोग करुन सकारात्मक करुन लोकांसमोर मांडण्याचे काम करतात. तुटपुंज्या पैशांसाठी हे लोक असे घाणेरडया प्रकारचे कृत्य करत असल्याचे जनतेच्याच निदर्शनास आले आहे. आपल्या मनाला वाटेल ते लिहायचे, ब्लॅकमेलींग करुन पैसे उकळण्याचा अनेक प्रकरणे समोर येतील. एखादच्या विरोधात मुद्दाम काहीतरी उलटसुलट लिहायचे व त्याला खंडणीस्वरुपात पैशांची मागणी करुन प्रकरण मिटवून टाकण्याचे अनेक प्रकारही आजवर पाहिले आहेतच. पत्राकरीतेमध्ये गटबाजी करुन एकमेकांच्या कामात कसा अडथळा निर्माण करता येईल अशाही प्रकारचे राजकारण रिकामटेकडे पत्रकार करतांना पहावयास मिळतील. स्वत:ला निर्भिड निप:क्ष शी ब्रिदवाक्य घेऊन वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनीच स्वतच्या घराच्या छताला अशा प्रकारची भोकं पाडली तर लोकशाही कशी बरं टिकून राहिल. राजकिय पुढाऱ्यांच्या पार्ट्यां मिळतात, खायला मिळतं म्हणून काही पत्रकारीता क्षेत्रामध्ये काम करता असतांत. एखादे वृत्त लिहायला सांगितले तर ते नाही जमणार व मी या अमूक अमूक दैनिकाचा पत्रकार आहे अशा एखादयाला धाक दाखवायलही मागे पुढे न पाहणाऱ्या पत्रकारांमुळे प्रामाणिक असणाऱ्यांची प्रतिमा मलीन होत चालली आहे. व अशा याच गोष्टींमुळे पत्रकरीता क्षेत्राला राजकिय क्षेत्राप्रमाणेच किड लागली आहे. एका एका ठिकाणी एका पेक्षा जास्त प्रमाणात पत्रकारांचे संघ, संघटना, परिषदा निर्माण करुन एकमेकांमध्येच फुट निर्माण करण्याचे कुटील कारस्थानही काही लोक करतांना निदर्शनास आले आहे. वृत्तत्रपत्र उघडलं की फक्त राजकिय वार्ताच नव्वद टक्के वाचावयास मिळतात. वाचकांचा जेवढा विश्वास हा स्वत:च्या डोळयावर नसतो तेवढा विश्वास हा वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीवर असतो. लेखणीच्या धारदार शस्त्राने परखड लिखान करुन अन्यायविरुध्द लढा दिला पाहिजे मात्र असे क्वचितच होतांना दिसत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आजवर जे झाले ते झाले. यापुढे चांगल्यासोबत चांगलंच आणि वाईटासोबत वाईटच जसे गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे तसंच अन्याय करणऱ्यांना शिक्षा होऊन न्याय मिळालच पाहिजे ही वृत्ती ठेवली तर पत्रकरांवर हल्लाच काय नजर वाकडी करण्याचीही कोणाची हिम्मत होणार नाही. जर असेच चालू राहिले तर लोकशाहीचा चौथा अधारस्तंभ लयास जावून हरवण्याची शक्यता नाकारता येत नाही व प्रामाणिक पत्रकारीतेचे ते दिवस पहावयास मिळणार नाहीत हे मात्र जरुर लक्षात असू दया. या आधारस्तंभाचा तडा जाण्यापासून या आपण सर्वांनी मिळून वाचवूया ! व जो वाकडी नजर करुन पाहिल त्याला त्याची जागा लेखणीच्या धारदार शस्त्रातून दाखवूया !

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422
hr.shankarchavan@gmail.com

Comments

  1. सर, मराठवाडय़ातील भ्रष्ट वृत्तपत्रांचिपण नावांसहित उजळणी घेतली असतीत तर बरं झालं असतं.

    ReplyDelete

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

‘व्यसन एक फॅशन’

अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय …

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !