‘मनसे’चं आंदोलन योग्यच !
‘मनसे’चं आंदोलन योग्यच !
जेंव्हा देशहिताचा प्रश्न ऐरणीवर येतो तेंव्हा याच्याशी आपले काही देणे
घेणे नाही असा मनोमनी निश्चय करणारे भारतीय आपण. देशाच्या सरहदीवर लढता लढता जवान शहीद
होतो तेंव्हा एक दिवस टी.व्ही. चॅनल पहात पहात हातातल्या रिमोटने हळहळ व्यक्त करत चॅनल
बदलणारे आपण. अरे, खुप वाईट झालं ! असा डायलॉग चिकटवून काहीच दु:ख न वाटता किंवा त्यासाठी
काही उपयायोजना न करणारे सत्ता हातात असून (सत्तेवर कोणीही असो) हतबल झाल्यासारखे षंढ.
स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशीच देशहिताचा पुळका असल्याचं ढोंग करणारे
आपण. त्या दिवशी देशभक्तीपर गीतं ऐकुन दिवसभर स्वत:, इतर व ऐमेकांना देशासाठी बलीदान
दिलेल्या क्रांतीकारकांची चढाओढीनं भाषणं देणारे, ऐकणारे आपण. महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेसारख्या अल्पावधीतच मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करणारा देश हिताच्या दृष्टीने
विचार कराणारा (राजकारणाचा यात काहीही संबंध नाही) पक्ष. जेव्हा देशपातळीवर देशातील
वाद चालू असतांना तो कोण ‘करण जोहर’ त्याला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका येतो. भारतातील
कलाकारांना मिळणाऱ्या संधी वर्षानुवर्ष कुकर्मी पाकिस्तानातील व वेळोवेळी भारताविरोधी
चाल करुन येणारा पाकडया कलाकरांना सिनेमात काम देतो. तेव्हा मराठी माणूसच काय तर देशातील
नगरीक हा पेटून उठणे सहाजिकच आहे. पण पुढाकार घेणार कोण ? महाराष्ट्रासारख्या महान
राष्ट्रातून एखादा पक्ष किंवा घटक अशा घटनेला विरोध करतो तर त्याचं काय चुकलं ? आणि
आपल्या भारत देशात लोकशाही नावाचा किडा असला तरी लोकशाही मार्गाने काही आंदोलन केले
तरी त्याचा फारसा काही उपयोग होतांना दिसत नाही. त्यामुळे अशा तरुण रक्त असणाऱ्या पक्षातील
आपला उदयाचा भारत असणारा तरुण वर्ग अशा प्रकारची सिनेमे प्रसारीत होऊ देत नाही. याला
तीव्र विरोध करतो. यात असं चुकीचं वेगळं काय आहे ? पोलीस प्रशासनाने या तरुणांना मारहान
करुन कोठडीत डांबून ठेवण्याचं जणू महान कार्यच करत आहेत. सेन्सॉर बोर्डाने तर बोल्ड
सिन असणाऱ्या व स्त्रीशक्तीच्या अब्रुचे धिंडवडे उडवणाऱ्या फिल्म निर्मात्यांना तर
सेन्सॉर बोर्डाच्या परवानग्या आंदनच देऊन टाकल्या असल्यामुळे भारतीय संस्कृतीवर व उद्याच्या
भारत असणाऱ्या युवा पिढीवर याचा विकृत परिणाम होतोय याचे काही देणे घेणे नसल्यासारखे
कोठडीत बळजबरीने डांबून ठेवलेल्या आरोपीसारखी भूमिका बजावत आहे. कसल्याही प्रकारचे
बोल्ड सिन असलेल्या बॉलीवूड तसेच इतर सिनेमांना चक्क पैशाच्या जोरावर फटाफट प्रमाणपत्र
वितरण करण्याचे काम करत आहे. यावर तात्काळ बंदी आणून सुजाण भारतीय नागरीकांनी जागे
व्हावे. या नंतर कोणताही निर्माता देशाचा विरोधक असणाऱ्या, देशाचा शत्रु असणाऱ्या पाकिस्तानासारख्या
कुरापती करणाऱ्या देशातील कलाकरांनाच काय त्यांच्याशी कसल्याही प्रकारचा संबंध ठेवणे
चुकीचे आहे असे वागेल. यावर बंदी आणून बंड पुकारणे योग्यच आणि ‘करण जोहरसारख्या’ निर्मात्यांना
जर पाकिस्तानी कलाकरांचा एवढाच पुळका येत असेल तर पाकिस्तनात जाऊन आपले बस्तान बसवावे
व तिथं जाऊन सिनेमा प्रदर्शित करावा. मनसेने केल्याल्या देशहिताच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील
युवा पिढी जरुर पाठींबा देईल व मनसेने केलेले चित्रपट प्रदर्शिन न होऊ देण्याचे हे
आंदोलन नक्कीच योग्य आहे असे मला वाटते.
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422,
hr.shankarchavan@gmail.com
hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment