‘करण जोहरचा’ हा स्टंट तर नव्हता ना ?
‘करण जोहरचा’ हा स्टंट तर नव्हता
ना ?
हल्ली राजकारण कशातही आहे पण बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीतही ‘राज’कारण होऊ
लागल्याने राज्यातील तसेच देशातील सिनेमाच्या चाहत्यांना व सुजाण नागरीकांना ‘करण जोहरचा
हा स्टंट तर नव्हता ना ?’ हा प्रश्न का भेडसावू नये ? हल्ली एखाद्या गोष्टीचा बाऊ करण्यासाठी
किंवा एखादी सहज बाब बेडकाने फुगवविलेल्या पोटासारखी मोठी करुन दाखवण्याचा खेळ अनेक
जण करु पाहतात व करतातही. मग त्यात ‘राज’कारणी सवंगडयांचा पाठीवर हात किंवा मदत घेतली
जाते. हे सत्य आहे. मात्र ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याआधीच
महाराष्ट्र नवनिर्मान सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांना
दिलेल्या आदेशावरुन दोन दिवसाखाली पाकिस्तानी कलाकरांविरोधी आंदोलन झाले होते. इलेक्ट्रॉनिक
मिडीयाने हे प्रकरण तीव्र उचलून धरल्यामुळे का होईना याची चर्चा जगभर पहावयास मिळाली.
या प्रकरणाचे पडसाद देशपातळीवर जाऊन पोहोचले. पाकिस्तान व भारत या देशांमधील वैर वाढण्यात
ही भर काही कमी नाही. पण ‘राज’कारणात काय आणि युध्दात काय सर्वकाही माफ असतं, खरंतर
असंच म्हणाव लागेल. यापूर्वी ‘मनसेचं आंदोलन योग्यच !’ अशा प्रकारचा एक लेख माझ्या
ब्लॉगवर प्रसिध्द करण्यात आला होता. तोच लेख बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये व विविध सोशल
माध्यमांवर खुप वाचकांनी वाचला. पण आंदोलन योग्य असतांना व देशप्रेमी असणाऱ्या मनसेच्या
वतीने केलेल्या आंदोलनाला तरुण वर्गाचा पूर्णत: पाठींबा असतांना हा मध्येच क्लायमॅक्स
सुरू कसा काय झाला ? हे तरुण वर्गाला न उलगडलेले कोडे आहे. या गंभीर प्रकरणाविषयी विविध
प्रश्नांनी भेदरुन टाकलेल्या तरुणाईला नेमके काय उत्तर यातून शोधायचे आहे त्यासाठी
काही प्रश्नच मांडून त्यात काही उत्तर शोधता येईल का हे पाण्यासाठी हा प्रपंच. या आंदोलनामागे
राजकिय दृष्टया विचार केला तर राज ठाकरे यांचा नेमका काय उद्देश होता हे तरुणाईला समजले
नाही, दुसरे म्हणजे देशपातळीवर विचार करायचा झाल्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांनी हा वाद ‘वर्षा’ येथे बैठकीदरम्यान
मिटवल्याचे सांगितले व करण जोहर यांनी प्रत्येकी पाच कोटी रुपये आर्मी वेल्फेअरला देण्यात
यावे असे राज ठाकरे यांनी दणकावून सांगितल्याचे असेही काही वृत्तपत्रांमधून वाचावयास
मिळाले, करण जोहर या निर्मात्याने या सिनेमासाठी हा स्टंट तर केला नसेल ना व कशावरुन
केला नसेल ? असाही प्रश्न तरुणाईला पडला आहे याचे उत्तर शोधणे कठीण काम नसुन नेमका
या मागचा काय बोध तरुणाईने घ्यायचा हे सांगणे गरजेचे नाहीच असं मला वाटतं. मनसेसाठी
हे काही नविन प्रकरण नाही. सिनेमा प्रदर्शित करण्यावरुन मनसेच्या वतीने यापूर्वी वेगवेगळया
विषयावरुन अनेक वाद, आंदोलनं झाली. काही वाद मिटलेही. पण या प्रकरणामध्ये स्वत: मुख्यमंत्री
व उध्दव ठाकरे या राजकिय व्यक्तींच्या मदतीने वाद मिटवण्याचे चांगले कार्य झाले व या
प्रकरणाला जागतीक पातळीवर पाहिजे त्यापेक्षा (अनपेक्षीत विना प्रमोशन) प्रसिध्दी मिळाली
हे काही कमी नाही. यावरुन असे लक्षात येते की ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाचे निर्माते
दिग्दर्शक करण जोहर यांनी प्रसिध्दी पोटी स्टंट केला नाही कशावरुन याचे उत्तर व गुढ
कायम असुर उत्तर शोधण्याचे काम तरुणाई झिंगाट गतीने करत आहे असे एकंदरीत लक्षात आले.
शेवटी राज ठाकरे यांनी पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी असे ठाम बजावुन
सांगितल्याचेही वृत्त हाती आले आहे.
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422
hr.shankarchavan@gmail.com
hr.shankarchavan@gmail.com
khup chan
ReplyDelete