फडणवीसांचे ‘राज’कारण, अन् विसरुन गेले कोपर्डी प्रकरण ?


फडणवीसांचे ‘राज’कारण, अन् विसरुन गेले कोपर्डी प्रकरण ?
कोपर्डी प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्रच नव्हे तर अख्खं जग आजही हळहळ व्यक्त करत आहे. जे झाले ते फार फार चुकीचे, विकृत, अमानुष, अपनेक्षित घडले. आरोपी पप्पू शिंदे या निर्लज्ज, लिंगपिसाट, कलंकीत, विकृत बुध्दीच्या नालायकाने हे अघोरी कृत्य करुन या लोकशाहीचा डंका वाजवणाऱ्या देशाला पुन्हा एकदा सांगून दिलंय कि बाबानों या देशात स्त्री ही सुरक्षित नाहीच. आज चार महिने उलटून गेले मात्र अरोपी पप्पू शिंदेला ना न्यायालय कठोर शिक्षा देऊ शकले, ना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस याबाबत निर्णय घेऊ शकले. मोदी लाटेमध्ये अनावधानाने निवडणुन व अनपेक्षित सत्ता मिळालेल्या या सरकारला चार महिने जाऊनही बलात्कार करुन निघृण खुन करणाऱ्यांना आरोपींना शिक्षा देण्यासाठी आदेश काढायला किंवा त्या विषयाकडं ढुंकूनही पहायला वेळ नाही. अन् कोण कुठला तो ‘करण जोहर’ पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमा बनवतो, आपल्या राज्याचे जबाबदार मुख्यमंत्री व आश्वासनांचा पाऊस पाडणारे नेतेमंडळींना बरोबर घेऊन एका वाडयावर घेऊन ‘सेटलमेंट’ करतात ? जणू काही मानवाच्या मुलभूत गरजांची पूर्तताच होणं बंद झालं. अशा वायफळ गोष्टींना मध्यस्थी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस महोदयांना वेळच वेळ आहे. मात्र इकडं शेतकरी आत्महत्या बाबत किंवा कोपर्डीसारख्या माणूसकीला काळीमा असणाऱ्या भयाण प्रकरणाबाबत निर्णय घेण्यासाठी अजिबात वेळच नाही किंवा एखादया गोष्टीचा विसर पडावा अशी गत झाल्यासारखं वागत आहेत. का मुख्यमंत्री बलात्कार होऊन एका चिमुकलीचा अमानुष खुण करण्यात आला ही बाब. विसरले की काय ? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. अहमदनगर जिल्हयातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात निर्भयावर बलात्कार झाला व तिचा खुण करण्यात आला या प्रकरणातील मुख्य आरोपींसह इतरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मराठा समाजासह इतर समाजाने सुध्दा संपूर्ण राज्याभरात ऐतिहासिक मोर्चे काढले तरीही भाजप सरकारला जाग का येत नसावी ? जणू झोपेचं सोंग भाजप सरकारने घेतले असून आरोंपीवर तात्काळ कारवाई करुन त्यांना जनतेच्या मागणीप्रमाणे कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नशिल न राहता भलतीकडेच जनतेच्या कामासाठी असलेला अमुल्य वेळ वायफळ हिंदी चित्रपटा मधल्या मामूली गोष्टींकडे वेळ का दिला जातो. तेही कोणाच्याही सांगण्यावरुन !  एक कर्तव्यदक्ष व जबाबदार व्यक्तीमत्व म्हणून इतर मंत्र्यांव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे, निर्णयाकडे पाहिलं जातं. मग हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाचे व त्या मुलीवर झालेल्या अन्यायाला गंभीरतेने का बरं घेत नसावेत ? महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात असे हे पहिलेच सरकार म्हणावे लागेल की जनतेने यांना काही गोष्टी दाखवून दयाव्या लागत आहेत की हे प्रकरण किती गंभर आहे. मंत्र्यांना उद्घाटन, लग्न, मुंज, पुरस्कार वितरण, स्पर्धा जातीय मोर्चे इत्यादी कार्यक्रमांना जायला वेळ मिळतो. पण अशा क्रुर घटनेच्या कुटूंबियांना भेट देण्यासाठी काही जबाबदार जातीवाद करणाऱ्या व सभागृहामध्ये एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करुन जनतेची दिशाभुल करणाऱ्या मंत्र्यांना वेळ नाही. हे एक नवल व आश्चर्यच आहे. अशाने जनता संभ्रमात पडत आहे की, या सरकारच्या कामकाजाचा, निर्णयाचा, व इतर गोष्टी प्ले करण्याचा रिमोट दुसरीकडेच कुठंतरी असावा ? लाखो युवकांनी, प्रौढ, अपंग, युवती, महिलांनी राज्यभरातून आपली सर्व कामं, शाळा, कॉलेजं, व्यवसाय, नौकरीत असणाऱ्यांनी रजा घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले. का ? तर कोपर्डीमध्ये अमानुष घडलेल्या प्रकरणतील आरोपींना कठोरात कठोर व फाशीची शिक्षा देण्यात यावी. मात्र आज चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटुन गेला आहे.  मात्र अद्याप कसल्याही प्रकरची हालचाल दिसत नाही आणि अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आज महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे मोर्च काढण्यात आले तेवढे मोर्च लोकशाही मार्गाने काढण्यात आले आहेत. या मोर्चा दरम्यान कोणत्याही पोलीस प्रशासनाला पोलीस बंदोबस्तासाठी तीळभर कष्ट घ्यावे लागले नाही. अशा शिस्तप्रिय व लोकशाही मार्गाने काढण्यात येणाऱ्या मोर्चांचा सुध्दा विचार फडवीस सरकार करणार नसेल तर यापुढे युवा-युवतींसह राज्यसरकारवर चिड असणाऱ्या जनतेचा अंत या सरकारने पाहू नये अन्यथा यापुढे मोर्च लोकशाही मार्गाने न कढता ‘ईट क जवाब पथर से’ देण्याचा इशारा दिल्यागत युवा वर्गामध्ये संतापाची लाट पसरली आहे. निर्णयक्षमता नसलेल्या फडणवीस सरकारच्या हातात निर्णय घेण्यासाठी वेळ नसेल तर या देशाच्या युवा पिढीचा राजकारणावर व लोकशाहीवर विश्वास अजिबात राहणार नाही हे मात्र निश्चित.

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422
hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?