खरंच भारत माझा देश आहे ?
खरंच भारत माझा देश आहे ?
प्रिय वाचकहो हा
विनोद नाही, हा अपमान नाही, हा देशद्रोह नाही किंवा हा मुद्दाम केलेला खोडसाळपणा नाही
कारण हा प्रश्न तरुणाईला खरंच सतावतोय. कारण भारत असा एकमेव देश आहे जिथं ‘आरक्षण’
हा भस्मासुर राहतोय. कोणाला आरक्षण असो वा नसो माझा त्या गोष्टीला अजिबात विरोध नाही
किंवा समर्थनही नाही. आरक्षणाच्या बळावर जे कुटील कारस्थान, राजकारण, पिळवणूक, फसवणूक,
शोषण, दादागिरी, माज या सर्व गोष्टीचा मात्र माझा तीव्र विरोध आहे. राजकारणात आरक्षणाला
विरोध केला किंवा आरक्षण रद्द करा असं म्हटलं की लगेच गुन्हा दाखल होतो, प्रतिकात्मक
पुतळा दहन करुन निषेध व्यक्त होतो, मोर्चे निघतात, उपोषणनं होतात, आरोप प्रत्यारोप
होता हे फक्त फक्त राजकारणतच लागू होणाऱ्या बाबी आहेत. हे चालायचंच, असो, पण मला या
सर्व विषयावर चर्चा न करता मुळ विषयावर प्रकाशझोत टाकायचा आहे. मी हा प्रश्न मुद्दाम
पोखरुन काढलाय. या स्पर्धेच्या युगात भारत देशाचे भवितव्य घडवणारी युवा पिढी आरक्षण
या भानगडीमुळे संभ्रमात व संकटात सापडली आहे. प्राथमिक शिक्षण ते उचच् शिक्षण घेत
असतांना जातीपातीमुळे शिक्षणावर होणारा खर्च हा सारखाच न होता आरक्षण असणाऱ्यांना कमी
व आरक्षण नसणारांना जास्त असतो. यामध्ये गरीब पालक भरडले जाऊ लागले आहेत. असे का ?
भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा आपण ज्यांच्याकडून म्हणून
घेतो त्यांच्यावरच आपण जूलूम किंवा त्यांचे खच्चीकरण किंवा शोषन करतो असे नाही वाटत
? असा भेदभाव का ? आरक्षण नसणाऱ्यांमध्ये सर्वच श्रीमंत किंवा त्यांची कुवत चांगली
असेलच असे नाही. आरक्षण नसणाऱ्या गोरगरीब कुटूंबातील मुलामुलींना शिक्षापासून किंवा
लाभ घेण्यापासून वंचित का ठेवले जाते ? स्पर्धा परिक्षा संदर्भातील एक महत्वाची गोष्ट
आढळून आली. भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या परिक्षा आयोगाच्या विभागाने आरक्षण
असणऱ्यांना अत्यंत कमी परिक्षा शुल्क व चौपट ते पाच सहा पटीने आरक्षण नसणाऱ्यांसाठी
शुल्क आकारले जाते. त्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे. की, आरक्षण नसणाऱ्या अत्यंत गरीब
कष्टकरी शेतकरी, मजुर कुटूंबाला याचा लाभ घेणे किंवा स्पर्धापरिक्षेसाठी पात्र असून
सुध्दा पैशांअभावी शक्य होत नाही. (हा अत्यंत महत्वाचा विषय आहे याचा सर्वांनी विचार
करावा) शिक्षणामध्ये नाही किंमान नौकरी मिळवितांना भेदभाव होऊ नये अशी युवा वर्गाची
मागणी असते आणि आहेच. पण असे होत नाही ही खुप मोठी या देशातील शोकांतिका आहे. जे युवा
स्पर्धक रात्रंदिवस अभ्यास करुन उत्तीर्ण होतात पण आरक्षण असणाऱ्यांना कमी गुण असून
सुध्दा त्या पदावर भरती होतात. मात्र एखादयाची हुशारी आरक्षणा अभावी धुळीस मिळते. मग
भेदभाव करणारा भारत देश माझा कसा काय होऊ शकतो.? आपण तर अभिमानाने म्हणतो भारत माझा
देश आहे. परंतू तरुणाईला तर हा खरंच भारत माझा देश आहे ? असा प्रश्न पडला तो फक्त भेदभाव
होत असल्यामुळेच. तरुण वर्गाची शासनाला जेंव्हा जाग येईल तेंव्हा येईल त्या वेळी फक्त
एकच निर्णय व्हावा की, किमान नौकरी मिळवण्यासाठी होणाऱ्या परिक्षांचे परिक्षा शुल्क
हे सर्वांना समान असावे. मग नक्कीच तरुणाईला अभिमान वाटेल कि खरंच भारत माझा देश आहे.
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment