माणुसकी हरवलेला माणुस ...


माणुसकी हरवलेला माणुस ...

माणसाच्या शरीराचा विचार केल्यास त्याच्या शरीराला चालना देणारा मेंदू हा सर्व प्रक्रियांना जबाबदार असतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची नियंत्रण व्यवस्था ही मेंदूद्वारे चालते. समाजामध्ये वावरत असतांना या मेंदूचा कोणत्या ना कोणत्या घटकाची संबंध येतोच. या मेंदूचे लक्ष सकारात्मक नकारात्मक आहे हे कळते. काहीसं माणुसकीचा माणुसकीच्या शब्दांमध्ये बेरीज-वजाबाकी होतेच, परंतु माणूस या मेंदूचा उपयोग निगेटिव चालना देण्यासाठी जास्त वापरतो. या निगेटिव पावरचा समाजामध्ये विपरीत परिणाम होणारच. स्वतःचे अस्तित्व टिकवायचं की घालवायचं हे या मेंदूवर अवलंबून असते. आपल्याकडे या मेंदूचाच फारसा प्रमाणामध्ये दूरुपयोग होताना दिसतोय. आपल्या देशाची संरक्षण व्यवस्था ही काही प्रमाणात या मेंदूसारखे काम करत असते. अर्थात पोलिस यंत्रणा. मला पोलिस यंत्रणेच्या चांगल्या कामाबद्दल बोलायचे असल्यास नक्की अभिमान वाटेल पण नकारात्मक गोष्टींचा लेखाजोखा जर पाहिला तर शरमेनं मान खाली जायला अगदी तयार होते पोलीस व्यवस्था ही सदरक्षणाय खलनिग्रहणाय या उक्तीप्रमाणे काम करेल अशी भावना समाजामध्ये असते. परंतु ही पोलिस यंत्रणा या उक्तीप्रमाणे 100% चालते का हो ! हा प्रश्न प्रत्येकाच्या मनी दडलेला आहे. एखाद्या गोष्टीची भीती मनामध्ये निर्माण झालेली असते. त्या भीतीचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. या भीती व्यवस्थेबाबत जास्त भावनिक शब्दप्रपंच येथे करणार नाही,  कारण या विषयाचा तो प्रांत नाही. काही दिवसांपूर्वी एक अमाणुष प्रकाराची बातमी माझ्या कानावर आली, अमुक अमुक संशयिताला मारहाण केली त्यातच त्याचा अंत झाला. तेही पोलिस स्थानकामध्ये, संशयित असल्याच्या कारणावरून त्याला अमानुष मारहाण करून त्याचा मृतदेह जाळण्याचा कट याच पोलिस यंत्रणेने केला, एका निर्दोषाचा बळी गेला. म्हणूनच मी म्हणतोय माणुसकी हरवलेला माणुस अशा प्रकारे कसा काय असु शकतो ? खाकी वर्दीतला माणुस एवढी माणुसकी कशी काय सोडू शकतो ? खाकी वर्दीतला माणूस एवढ्या खालच्या पातळीला कसा काय जाऊ शकतो ? त्याचे त्याच्या मेंदूवर नियंत्रण नसेल का ? हा प्रश्न त्या माणुसकी नसलेल्या माणसाच्या डोक्यामध्ये का आला नसेल बरे ? आपण फक्त हळहळ व्यक्त करणार आणि पुढे चालत राहणार, पण या संवेदनशील विषयावर आपण काहीही बोलायला अजिबात तयार होत नाहीत. कारण आपल्यातही माणुसकी शिल्लकच नाही.  जर आपल्या मध्ये माणुसकी असते तर आपण या विषयाचा या गंभीर समस्येकडे या माणुसकी नसलेल्या अमानुष प्रकाराकडे लक्ष घातले असते. तर असे प्रकार दुर्मिळ झाले असते. या विषयावर आपण ढुंकूनही पाहायला तयार नाहीत त्यामुळे वर्दीतला पोलिस अशा प्रकारचे पाऊल उचलत आहे. पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजामध्ये बदलत चाललाय, पोलिसांनी कितीही प्रकारच्या समानतेच्या, एकात्मतेचया, शांततेच्या मोहिमा काढल्या तरी त्याचा फारसा काही उपयोग या घटनेकडे पाहता लक्षात येत नाही दिसूनही येत नाही. मला पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढायचे नाहीत किंवा चांगले काम करणाऱ्या पोलिसांना अजिबात दुखवायचे नाही. परंतु हा प्रकार घडला तो सर्वज्ञात आहे. आपल्या कानांना, डोळ्यांना मेंदूला पचवायला जडच. या प्रकाराकडे जर वेळीच लक्ष गेले असते माणुसकी मधला माणूस मारला नसता तर हा प्रकार घडला नसता. जेव्हा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा असे प्रकार घडणारच. आपण फक्त तीव्र संताप व्यक्त करू शकतो. हा आपला धर्म आहे. असे ऐकेले की फार वाईट वाटते. आपण धर्म धर्म म्हणतो तो धर्म हाच का हो ! हा वर्दीतला नसून हा गर्दीलाच माणूस आहे या गर्दीतल्या माणसाला अजिबात माणुसकी शिल्लक राहिली नाही. जर या माणसाला माणुसकी असते माणूस माणसांवर हात उचलायचा सुध्दा साधा डोक्यात विचार आला नसता. आपण स्वतः आत्मा आहोत आपल्याकडेही अशाच प्रकारचे एक शरीर आहे. किमान त्या शरीराचा विचार केला आपल्यावर ही वेळ आली तर आपले काय होईल ? याचा विचारही आपण करणार नाही. एखाद्या बद्दल विरोधात बोलणे, हळहळ व्यक्त करणे तिथेच सोडून देणे हा प्रकार माणुसकीला शोभणारा अजिबात नाहीच. अशा घटना घडतात तेव्हा तेव्हा या माणुसकीला शब्दांचा मार दिला पाहिजे. या बाबतीतले साक्षरतेचे धडे सर्वांना शिकवले पाहिजे. तरच व्यवस्था सुरळीत चालू शकते.  एखाद्या संशयिताला पकडणे त्याची कोणत्याही शब्दकोशामध्ये नसलेले शब्द वापरून चौकशी करणे हे माणुसकीला कितपत शोभणारा आहे. मला तर असे वाटत आहे या जगा मध्ये माणुसकी नष्ट होत चालली आहेच. ती नष्ट होत आहे त्याचं कारण त्याला जबाबदार आपण स्वतः माणुसच आहोत. माणुसकी खूप आहे माणुसकी मलाच कळते हे म्हणणारेच जास्त प्रमाणात जबाबदार आहेत एखाद्यावर वाईट प्रसंग येतो तेव्हा तेव्हा त्यालाच माणुसकी ची किंमत कळायला सुरुवात होत,  जो जळतो त्यालाच विस्तव कळतो हे खरं आहे. या देशामध्ये पोलिसांनी स्वतःला बदलायला पाहिजे. माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाला मायेचा हात फिरवून त्याच्याकडून माहिती मिळवायला पाहिजे, त्यांना हवं ते मिळवता आलं पाहिजे. तेही माणुकीचं दर्शन घडवून.  हे प्रथम तपासायला पाहिजे शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी कायदयाप्रमाणेच वागायला पाहिजे. तुच्छ भाषेमध्ये शब्दप्रयोग करणे हे आपल्या घटनेमध्ये दिलेले नाही, तेव्हा कायद्याचा दुरुपयोग कोण करतो हे आता तुम्हीच पाहा !  पोलिसांबद्दल भीती असावी फक्त  आदरयुक्त असायला हवी. तेव्हा खरंच वर्दीमध्ये माणुसकी आहे आणि हो हे जेंव्हा होईल तेव्हाच सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे साध्य होईल.

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422,
hr.shankarchavan@gmail.com

Comments

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..