पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...
पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ... हल्ली पुढारी, नेते मंडळी, मंत्री-संत्री ह्या कोणत्याही शुभकार्यासाठी, उदघाटन समारंभासाठी, लग्न, मुंज वा इतर कोणात्याही कार्यक्रमासाठी बोलावण्याची प्रथा पुरोगामी महाराष्ट्रात आजवर चालत आली व चालवली आपणच, गर्दी असल्याशिवाय कार्यक्रम शोभून दिसत नाही. त्यासाठी पुढारी असल्याशिवाय गर्दी जमत नाही हे समिकरण यशस्वी झाल्यामुळे जवळपास प्रत्येकजण कार्यक्रम वा समारंभासाठी आषर्कण म्हणून शक्यतो नावाजलेला, गाजलेला थोडकयात इंप्रेशन पाडणारा पुढारीच बोलावतो. ही नेते मंडळी, मंत्री यांना जनतेने ज्या कामासाठी निवडुन दिलेलं असतं, ती कामं प्रत्येकजण बाजूला सारुन त्याला वेळ न देता प्रसिध्दीच्या हावेपोटी अशा कामांना वेळ जास्तीचा देतात. त्यामुळे विकासाच्या कामांना आपोआप पूर्णविराम मिळतोच. शिवाय जनतेनी त्यांच्या मागंपुढं करावं असा ङ्कपणङ्ख त्यांनी केलेलाच असतो. असंच काही एका अमूक अमूक गावात एका अमूक अमूक इमारतीचं उदघाटन करायचं होतं. गण्या आता त्या गावचा जणू म्होरक्याच समाजा, हया म्होरक्याच्या गावात एक इमारत कईक महिन्यांपासून लोकापर्णन करायचं काय ते पेंन्डींग ऱ्हायलं हुतं. त्या...