चला पत्रकारितेवर बोलू काही ! ...



चला पत्रकारितेवर बोलू काही ! ...


रात्रीचा दिवस करून समाज हितासाठी जनतेची सेवा करण्यासाठी, एक पाऊल जनतेच्या हितासाठी, आपल्या धारदार लेखणीने प्रहार करून अन्यायाला वाचा ङ्गोडणारा झुंजार पत्रकार, निर्भिड पत्रकार, खरतर पत्रकारितेची व्याख्या काही वेगळीच आहे १००% पारदर्शक स्वच्छ पाण्याप्रमाणे त्याचा स्वभाव, प्रत्येक घटकाला समान न्याय आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आरशाप्रमाणे सर्व बाजूंनी कायद्याच्या चौकटीत राहून तारेवरच्या कसरती प्रमाणे काम करावे लागते. पत्रकार हा दिवस पहात नाही, रात्र पाहत नाही, काट्याकुट्यांचा रस्ता पाहत नाही, संकटांना तोंड देत देत समाजाला न्याय देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य देऊन समाजासमोर सत्य ठेवतो. या सत्यासाठी या पत्रकाराला कसा संघर्ष करावा लागतो याचा विचार कोणीच करत नाही ? पत्रकारांचा संघर्ष म्हणजे वंचित घटकांसाठी, समाजात होणार्‍या अन्यायाला वाचा ङ्गोडण्यासाठी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राजकारणातील, समाजकारणातील दोन्ही बाजू जनतेचे प्रश्‍न त्यांच्यापुढे ठेवण्यासाठी अथक संघर्ष करावा लागतो. पत्रकार बांधवांना काय समस्या आहेत, त्याचं काय दुखणं आहे हे समजून घेण्यासाठी जो पत्रकार ज्यांच्यासाठी अापलं आयुष्य समर्पित करतो त्यांना पत्रकारांच्या प्रश्‍नांकडे ढुंकूनही पाहायला अजिबात वेळ नाही. ही या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर वाईट वेळ आहे.  याची खंत तर वाटणारच. पण पत्रकार ज्या समाजासाठी काम करतो त्याच समाजाला पत्रकार बांधवांचा विसर पडावा ही या देशातील सर्वात मोठी शोकांतिका आहे . पत्रकार बांधवांचे घर कसे चालते, त्यांची उपजीविका, कुटुंबाचा उदरनिर्वाह कशा प्रकारे करतो याचे कुणालाच काही देणेघेणे नाही असे चित्र दिसते. लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून ओळख असणार्‍या या लोकशाहीचा मुकुट पांघरलेल्या देशांमध्ये पत्रकारांना काडीची किंमत उरली नाही. स्वतःची जबाबदारी पेलताना पत्रकारांना कोणत्या अडचणी येतात याची साधी विचारपूसही कोणी करत नाही, माहिती संकलनासाठी जो संघर्ष पत्रकार करतो तसा संघर्ष या पृथ्वीतलावर कोणीच करू शकणार नाही. त्याचा संघर्ष म्हणजे खरंच संघर्ष आहे हे समाजाला उमजले पाहिजे. लोकशाहीचा बुलंद आवाज, निर्भिड पत्रकार, सत्य म्हणजेच पत्रकार. परंतु हल्ली पत्रकारितेची व्याख्या काही वेगळीच आहे. समाज पत्रकारांचा ङ्गक्त आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेत आहे. त्यात भर म्हणजे काही नौटंकी पत्रकार यांच्यामुळे  पत्रकार समाज कलंकित झालाय. यांनी पत्रकारीतेत वेगवेगळ्या अवैध मार्गाने पैसा कमवून पत्रकारितेला कलंकित करण्याची मालिका सुरू केली त्याच्याच मूळे खर्‍या पत्रकारांना मोठ्या प्रमाणात आजही त्रास होतो हे मान्य करावेच लागेल. आजही सोशल मीडियाच्या जगात पत्रकारितेने आपली इमान कधीही विकली नाही, आपली जागा कधीही सोडली नाही, महत्त्वाचं म्हणजे विश्‍वासाहर्ता आजही १००% कायम टिकून आहे. समाजाला होणारा त्रास पाहावत नसलेल्या पत्रकार बांधवांना आज संघर्षमय जीवन जगावे लागत आहे , त्याच्यावर होणारे हल्ले पत्रकारांना गोळ्या झाडून मारल्याची अनेक उदाहरण आपण पाहिली व ऐकली असतील. जो समाजासाठी जे सत्य आहे ते समोर आणून ठेवतो म्हणून त्याची हत्या केली जाते. 

या देशामध्ये एखादं चांगलं काम करायचं म्हटलं की सर्वजण आडवे येतात. चांगल्या कामाला कोणीही पुढाकार घेऊ इच्छित नाही या दरम्यान पत्रकारांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची असते. कित्येक पत्रकार बांधव सत्य समाजा समोर ठेवून शहीद झाले ङ्गक्त त्यांना शरीराने मारले विचारांनी नाही, अजिबात नाहीच. केवळ विरोधात वृत्त लिहिल्याच्या कारणावरून अनेक पत्रकार बांधवांना निर्दोष असताना शारीरिक त्रास दिला जातो, त्यांना धमक्या दिल्या जातात, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून त्याच्या धारदार लेखणी बोथट करून लोकशाहीची मुस्कटदाबी करण्याचा अनेक समाज कंटक प्रयत्न करत असतात. पण त्यांचा हा डाव ङ्गक्त आणि ङ्गक्त पत्रकारच हाणून पाडू शकतो ही ताकद ङ्गक्त लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामध्ये आहे,  पण त्याच्या समस्या सोडवायला पाहिजे त्या समस्येकडे त्याला आधार देण्याच्या दृष्टीने समाज एकही पाऊल उचलत नाही, पत्रकारांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, याबाबत कोणीही विचारपूस करायला तयार नाही राजकारणी याच गोष्टीचा ङ्गायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधतात, पत्रकारांना अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक देतात, पत्रकारांची टिंगल करणे, त्यांना धमक्या देणे मारहाण करणे या गोष्टी लवकर सुचतील, पण पत्रकारांच्या बाजूने सकारात्मकता दाखवणे कोणाला जमणार नाही असे दिसते. या गोष्टीचा कुठेतरी विचार व्हावा पत्रकार बांधवांच्या जीवनावर विचारपूर्वक प्रकाशझोत टाकून त्यांच्या समस्या सोडविण्याकडे समाजाचाही हातभार आवश्यक आहे .पत्रकार बांधवांना बर्‍याच वर्तमानपत्राकडून कसल्याही प्रकारचे मानधन मिळत नाही, जाहिरात मिळवण्यासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवावे लागतात त्यांना मिळणारी वागणूक ही अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची असते, पत्रकारांच्या भावनेचा विचार करावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, खरंच या देशात माणूसकी शिल्लक असेल तर लोकशाहीचा आधारस्तंला आता जनतेच्या सहानुभूतीची गरज आहे, ज्यांच्यासाठी हा लढा चालू आहे त्यांनी पत्रकार बांधवांना आधार देण्याचं काम जर केला नक्कीच या देशांमध्ये खरे खुरे अच्छे दिन येणार यात तीळ मात्रही शंका नाही. समाजाने लोकशाहीच्या बुलंद आवाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे.

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422
hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..