चला पत्रकारितेवर बोलू काही ! ...
चला पत्रकारितेवर बोलू काही ! ... रात्रीचा दिवस करून समाज हितासाठी जनतेची सेवा करण्यासाठी, एक पाऊल जनतेच्या हितासाठी, आपल्या धारदार लेखणीने प्रहार करून अन्यायाला वाचा ङ्गोडणारा झुंजार पत्रकार, निर्भिड पत्रकार, खरतर पत्रकारितेची व्याख्या काही वेगळीच आहे १००% पारदर्शक स्वच्छ पाण्याप्रमाणे त्याचा स्वभाव, प्रत्येक घटकाला समान न्याय आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आरशाप्रमाणे सर्व बाजूंनी कायद्याच्या चौकटीत राहून तारेवरच्या कसरती प्रमाणे काम करावे लागते. पत्रकार हा दिवस पहात नाही, रात्र पाहत नाही, काट्याकुट्यांचा रस्ता पाहत नाही, संकटांना तोंड देत देत समाजाला न्याय देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य देऊन समाजासमोर सत्य ठेवतो. या सत्यासाठी या पत्रकाराला कसा संघर्ष करावा लागतो याचा विचार कोणीच करत नाही ? पत्रकारांचा संघर्ष म्हणजे वंचित घटकांसाठी, समाजात होणार्या अन्यायाला वाचा ङ्गोडण्यासाठी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राजकारणातील, समाजकारणातील दोन्ही बाजू जनतेचे प्रश्न त्यांच्यापुढे ठेवण्यासाठी अथक संघर्ष करावा लागतो. पत्रकार बांधवांना काय सम...