अपघातांसाठी ...

अपघातांसाठी ...
ऍक्सीडेंट झाला, अपघातात मृत्यू, चिरडले, उडवले, जागीच ठार, असे वृत्त वर्तमानपत्राचे पान उघडले की एकापेक्षा अनेक बातम्या आपण रोज वाचतो, हळहळ व्यक्त करतो, विचार करतो, वाईट वाटून घेतो, अपघात कसा झाला असेल यावर चार पाच मिनिटे चर्चा होते, काय करावं ? असंही म्हणतो आणि वर्तमानपत्र ठेवून आपण पुढील कामाला निघून जातो. पण कोणी कधी अपघात होवू नये यासाठी कोणीच काहीच करत नाही. करत नाही म्हणजे करतच नाही, अपघात होवू नये यासाठी ठोस भूमिका घेणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, देशात लोकसंख्या एवढी अवाढव्य आहे की, रोज किडयामुंग्यांसारखी माणसं मरतांना आपणा पाहतो, पण हे थांबणार, कधी याला आळा बसणार असे विचार प्रत्येकाच्याच मनात आहे, पण हे सगळं आपण स्वत:च थांबवू शकतो ! प्रवासाला जातांना नेहमी आपला, आपल्या परिवाराचा व समोरच्या व्यक्तीसह त्याच्या परिवाराचा आपुलकीने विचार करायला हवा. प्रवास करतांना घाई करणे शक्यतो टाळावी, कितीही घाई केली तर ती संकटात नेणार आहेच त्यामुळे विचार पुर्वक पाउल उचलावे, मदयपादन करुन वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे हे माहित असून सुध्दा काही अतिउत्साही व अतिशय स्वत:ला शहाणे सारे असे प्रकार केल्याशिवाय रहातच नाहीत व स्वत:चा व दुसऱ्याचा अनमोल जीव गमावतात व घेतात. रात्रीच्या वेळी सुध्दा अनेकजण वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे स्वत:चा व दुसऱ्याचा जीव घेतात व गमावतात. त्यात प्रशासनाचाही मोठा सहभाग असतोच, रमजणस्त्यावरील खड्यांमुळेही अपघातांच्या प्रमाणाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे रस्ता दुरूस्ती किंवा नविन रस्ते शक्यतो महामर्गावरील दक्षतेने बुजवणे व नवीन तयार करणे ही काळजी संबंधीत प्रशासनाने नैतिक जबाबदारी म्हणून पार पडायला हवी जेणेकरुन निर्दोषांचे बळी जाणार नाहीत. प्रत्येकाने सकारात्मक विचार करुन आपला स्वत:चा, स्वत:च्या परिवाराचा विचार व समोरच्या वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचा सहानुभूतिपूर्वक विचार केल्यास अपघात कमी होण्यास नक्कीच आळा बसेल असा विश्वास वाटतो.अपघात टाळण्याचा विटा प्रत्येकानेच उचलावा अनेकांचे परिवार उध्वस्त होण्यापासून वाचवावेत, माणुसकीला माणुसकीचे दर्शन व्हावे यासाठीच हा शब्दप्रपंच, बरेच जण वाचतात, विचार करतात व आपला प्रांत नसल्याचे व्यक्त होवून हा विषय सोडून देतात. परंतू जेंव्हा स्वत:वर, स्वत:च्या परिवारावर वेळ येते तेव्हा डोळे उघडतात पण तेंव्हा वेळ निघून गेलेली असते, विचार करा, विचार आत्मसात करा व त्याची अंमलबजावणी करा ...

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422,
hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..