'यशाला' शॉर्टकट नाहीच !
'यशाला' शॉर्टकट नाहीच !
जीवनात यश मिळवण्यासाठी जो तो धडपड करत असतो, आपल्या जीवनाचं ध्येय गाठण्यासाठी, यशाची शिखरं गाठण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळी प्रगतीची मार्गं शोधून त्या माध्यमातून यश मिळवायचं असतं ते त्याला मिळतं सुधा. पण काही यश मिळवण्यासाठी एकाग्र बुध्दीमत्ता न वापरता, कष्ट न करता, आयतं मिळवं या अपेक्षेने कष्ट, मेहतन करत नाहीत व जीवनात नेहमी शॉर्टकटच्या शोधात असतात पण महापुरूष, संतांनी, साहित्यीकांनी एका ओळीत सांगितले आहे की, यश मिळवायचे असेल तर त्याला कष्टाशिवाय, मेहनतीशिवाय व एकाग्र बुध्दीमत्तेचा वापर करुन व्यवस्थापन केल्याशिवाय दुसरा तिसरा कोणताही पर्याय नाही. पण ते लोक ऐकायला मुळीच तयार होत नाहीत. शेवटी त्यांच्या पदरी राहतं ते अपयश. अशा निवडक लोकांच्या आयुष्यात त्यांना असं वाटतं की, आपल्या जीवनातील बदलासाठी एखादा चमत्कार घडावा व आपलं जीवनंच बदलून जावं, गरीबी ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते. माणसांच्या गरजेनुसार प्रत्येकाची गरीबी ठरलेली असते. पण ती बदलणे आपल्या हातात आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती संगणक क्षेत्रातील गॉड फ ादर बिल गेटस म्हणतात, जर तुम्ही गरीब म्हणुन जन्माला आलात तर ती तुमची चुक नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणुन मेलात तर ती तुमची चुक आहे ! या एका वाक्याचच अभ्यास केला आणि ही सुत्रं लक्षात घेवून जीवनाची वाटचाल केली तर यश तुमची वाट पहात असेल हे नक्कीच. आपल्याकडं असे न होता यशप्राप्ती न झाल्यास तत्वाच्या गोष्टी बोलल्या जातात. जींदगी एक सफ र है सुहाना, यहॉं कल क्या हो किसने जाना ! असं एक सुंदर गीत यशाच्या गुरूकिल्लीबद्दल बरंच काही सांगून जातं. ते ही बरोबर आहेच की, जीवन हा खुप सुंदर प्रवास आहे. तो सुंदर प्रध्दतीने, आनंदाने, मौज मजेने जगला पाहिजे. कदाचित उद्या काय होईल याची शाश्वती नसेलही. जीवनात आपण स्वत:शी व इतरांशी प्रामाणिक राहिल्यास, कष्ट, मेहनत, आपुलकी, सत्यता, पारदर्शकाता या मुल्यांचा आधार घेतला तर यश मिळते. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर यश प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नाही व तो शोधत बसून आपल्या सुंदर जीवनाचं वाटोळं होण्यापासून स्वत:ला सावध करा व वाचवा. बस एवढंच !
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422,
hr.shankarchavan@gmail.com
hr.shankarchavan@gmail.com
जिवनाच्या यशाचे रहस्याबद्दल आपण मांडलेले विचाराशी मी सहमत आहे.
ReplyDelete