जोडप्यांचे वाद ...
जोडप्यांचे वाद ...
हल्ली विवाह प्रेमसंबंधातूनच जास्त होत आहेत. अरेंज मॅरेजला फ ाटा देत आता लव्ह मॅरेज करण्याकडे अनेक तरुण तरुणींची पसंदी असल्याचे समोर आले आहे. शाळा, कॉलेज जीवनापासूनच एकमेंकांविषयी असलेले आकर्षण हे जीवनातील जोडीदारात रुपांतर केंव्हा होते हे त्यांचं त्यांना सुध्दा कळत नाही. परंतू या सर्व प्रवसात संकटं मात्र लाखोंमध्ये भेटतात. त्यांना सामोरे जावून जावून विजयाचा कंदील लागतो. कधी वय, जात, तरुणाकडील कुटूंब तर कधी तरुणीकडील कुटूंब यांच्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. कधी आत्महत्येचाही मार्ग अवलंबला जातो. तर कधी पळून जावून आपला संसार थाटला जातो. पण हल्ली प्रेमसंंधातून वा अरेंजमॅरेज मधून झालेल्या विवाह संसारामध्ये पती पत्नी वाद हा मोठयाप्रमाणात पहावयास मिळतो. स्त्रीयांच्या मनात आणि पुरूषांच्या मनात काय आहे हे एकमेकांना समजायला वेळेअभावी व आपसांत विचारांच्या देवाणघेवाणीचा अभाव या कारणाने जोडप्यांतील वाद हा गगनाला भिडला आहे. हेवे देवे, आवडी निवडी, एकमेकांना समजून न घेणे यांमुळे दोघांनाही वाद या वादग्रस्त व्युहाला सामोरे जावे लागते. काही वेळांमध्ये वाद मिटतोही कारण सांसराचा गाडा हा दोघांनाही पुढे न्यायचा असतो. चिमुकल्यांच्या हसऱ्या चेहऱ्याकडं पाहिलं की दोघांनाही प्रत्येकाचा आपापला राग गिळून पुढील दिवस व चिमुकल्यांच भाविष्याचा विचार करुन एकमेकांना समजून घ्यावे लागते. पण हे होणारे वाद कधी कधी रागाच्या भरात एकमेकांचा जीव घेवू शकते, किंवा राग अनावर झाल्यास आत्महत्या होण्याची दाट शक्ता असते. त्यासाठी काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. वाद होत असल्यास काही क्षणी एकमेकांनी स्वत:च्या रागाला वेळीच आवर घातलेला बरा. कारण राग शांत झाल्यास एकमेकांना आयुष्यभर सोबत रहायचं आहे हे लक्षात असलेलं बरं. तुझं शिक्षण कमी, तुझ्या बापांनी हे दिलं नाही, तुझी आई अशीच बोलते, तुझा भाउ असाच करतो अशी विधानं घरात पुरुषांनी टाळलेलीच बरी, घरात जेष्ठ व्यक्ती रहात असतील तर उत्तमच, पण नसतील तर स्त्रीयांनी सुध्दा पुरूषांना उलट उत्तरे न दिलेलीच बरी, चुक असो अथवा नसो दोघांनीही एकमेकांना समजून घेवून पुढे चाललेले अनेकदा वाद न होण्यास मदत होते. प्रत्येक कुटूंबात जोडप्यांतील वाद हे होतच असतात. पण प्रमाण कमी झाले की, संसाराचा गाढा अगदी सुखी संसार होवून आनंदमय होतो. नक्कीच जोडप्यांनी या दिवाळीला असा संकल्प नक्की कराच.
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment