पत्रकार जनतेच्या सदैव पाठीशी पण जनता ?
पत्रकार जनतेच्या सदैव पाठीशी पण जनता ? सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जनतेची सेवा करण्यार् या , जनतेसाठी नेहमी आपली लेखणी सढळ ठेवणारा , जनतेसाठी अहोरात्र आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय व हक्कासाठी लढणारा पत्रकार , लोकशाहीचा चौथा स्तंभ , लोकशाहीचा आरसा आज एकटा पडलाय . सदैव जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा त्याच्यापाठीशी आता कोणीच नाही , जणू तो आज घडीला पोरकाच झाला आहे . जनतेने मोर्चा काढला कर बातमी , उपोषणास बसलात कर बातमी , जाळपोळ केली कर बातमी , चक्काचाम केला कर बातमी , बस फ ोडल्या कर बातमी , आरक्षण मोहिम असली की कर बातमी , मंत्री आला कर बातमी , पत्रकार परिषद घेतली कर बातमी , दंगा झाला कर बातमी , पक्ष प्रवेश केला कर बातमी , निवेदन दिलं कर बातमी , कोणाच्या नळाला पाणी नाही आलं कर बातमी , पालिकेनं कचरा नाही उचलला कर बातमी , राशन दुकानदार , रॉकेलवाला मापात पाप करतोय की , लगेच कर बातमी , कोणी आत्महत्या केली सर्व कामं सोड व कर बातमी , खून झाला घटनास्थळा...