पत्रकार जनतेच्या सदैव पाठीशी पण जनता ?
पत्रकार जनतेच्या सदैव पाठीशी पण जनता
?
सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जनतेची सेवा करण्यार्या, जनतेसाठी नेहमी आपली लेखणी सढळ ठेवणारा, जनतेसाठी अहोरात्र आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय व हक्कासाठी लढणारा पत्रकार, लोकशाहीचा चौथा स्तंभ, लोकशाहीचा आरसा आज एकटा पडलाय. सदैव जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा त्याच्यापाठीशी आता कोणीच नाही, जणू तो आज घडीला पोरकाच झाला आहे. जनतेने मोर्चा काढला कर बातमी, उपोषणास बसलात कर बातमी, जाळपोळ केली कर बातमी, चक्काचाम केला कर बातमी, बस फ ोडल्या कर बातमी, आरक्षण मोहिम असली की कर बातमी, मंत्री आला कर बातमी, पत्रकार परिषद घेतली कर बातमी, दंगा झाला कर बातमी, पक्ष प्रवेश केला कर बातमी, निवेदन दिलं कर बातमी, कोणाच्या नळाला पाणी नाही आलं कर बातमी, पालिकेनं कचरा नाही उचलला कर बातमी, राशन दुकानदार, रॉकेलवाला मापात पाप करतोय की, लगेच कर बातमी, कोणी आत्महत्या केली सर्व कामं सोड व कर बातमी, खून झाला घटनास्थळाकडे पळ व कर बातमी ही कामं पत्रकार नित्यनियमानं आजवर करत आला आहे. हे त्याचं कर्तव्य तर आहेच शिवाय नैतीक जबाबदारी सुध्दा. परवाचा एक किस्सा सांगतो, एक पत्रकार लोकशाहीचा आरसा पैसे काढण्यासाठी एटीएम (पैसे काढण्याची मशीन) मध्ये गेला होतो. चार पाच शहरातील एटीएम पालथे घातले पण पैसे कोठेही मिळाले नाहीत. मग एका ठिकाणी शेवटी पैसे मिळाले. पैसे काढले व घरी दुपारच्या जेवणासाठी निघाला. दुपारच्या किरर्र उन्हात. वेळ 3.15 ची असेल. दरवाजा उघडून परत निघाला व पाठीमागून आवाज आला. सर मला एटीएम कार्ड नवीन आले आहेे. त्याचा पिनकोड बदलून द्या व 1000 रुपये काढून द्या. पत्रकार तसा उच्चशिक्षीत असल्यामुळे एटीएमची बर्यापैकी माहिती असल्यामुळे त्या चाळीशीतल्या व्यक्तीला होकार देत म्हणाला पाहू इकडे एटीएम. त्या युवकाच्या चेहर्यावर आनंद झळकत होता. त्याने स्मित हास्य केले व म्हणाला लई उपकार झाले सर तुमचे मघापासून चार पाच जणांना म्हणालो पण मला कोणीच पिन बदलून पैसे काढून दिले नाहीत. पत्रकार हसला व म्हणाला जाउद्या हो मी देतो तुम्हाला पैसे काढून त्यात काय एवढं. त्याने स्मित हास्य केले व पटापट एटीएम कार्डचा पिन तयार करुन पैसे 1000 रक्कम काढण्यासाठी प्रक्रिया केली. पुढे जो काही प्रकार झाला त्यावरुन लक्षात येईल की आपल्या देशातील सिस्टीम किती बेजबाबदार आहे. पुढे काय झाले ते थोडक्यात स्पष्टच. 1000 रुपये कढण्याची कमांड दिली असता 1500 रुपये बाहेर आले. पत्रकार व ती व्यक्तीही एकाकी आश्चर्यचकीत झाले. बाहेर आलेली रक्कम ही वाकडया तिकड्या नोटा पाहून एकूणच मशीन खराब असल्यामुळे व मशीन बिघाड झाल्यामुळे हा प्रकार झाला आहे याची खात्री झाली. पुढे पत्रकाराने पैसे घेतले व त्या व्यक्तीला सांगितले की, अगाउचे 500 रुपये बँकेत परत कर. तेवढयात पाठीमागून एक तरुण धावत दुचाकीवर आला व घाई घाई मध्येही त्याने 1000 रुपये काढण्यासाठी कमांड दिली. परंतू त्याच्यासोबतही तोच प्रकार घडला. तेवढ्यात त्या पत्रकाराने सांगितले की, सर तुम्ही सुध्दा अगाउचे 500 रुपये बँकेत जमा करा. त्या तरुणाने होकारार्थी मान हालवली व हो म्हणून ते तिथून पुढे निघून गेला. पत्रकारही तिथे थांबून सदर बँकेच्या शाखेत संपर्क करण्यासाठी मोबाईलवरुन क्रमांक डायल केला व संपर्क करु लागला 10-15 वेळेस संपर्क करुनही बँकेत मात्र कॉल एकदाही उचलला नाही. पत्रकार घरी गेला दुपारचे जेवण होईपर्यंत बँकेचा फोन लावण्याचा प्रयत्न करत होता मात्र तरीही रिस्पॉन्स मिळाला नाही. आता फोन लावण्याची संख्या 50 हून अधिक झाली होती. पत्रकार जेवण करुन बँकेकडे निघाला व बँकेत जाउन शाखा व्यस्थापकाला ही हकीगत सांगितली. मात्र सदर एटीएम मशीन आमच्या शाखेची नाही दुसर्या शाखेची आहे. असे उत्तर मिळाले. दुसर्या शाखेत जाउन पुन्हा पत्रकाराने हकीगत सांगितली. तेव्हा शिपायाने सदर ठिकाणी जाउन मशीनचे शटर लॉक केलेे. एवढी नैतीकता पत्रकाराच्या रक्तात असते. हे सिध्द झाले. पण पत्रकराने अन्यायाच्या विरोधात लढा दिला. एखाद्या प्रकाराबाबत बातमी प्रकाशित केली. त्याला त्याचा मोबदला म्हणून काय मिळते माहित आहे का? तर त्याचे घर जाळले जाते. त्याला मारहण केली जाते. त्याच्यावर हल्ला होतो. त्याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली जाते. वगैरे वगैरे प्रकार त्याच्यासोबत होतात. आजकाल नेमकं पत्रकार म्हणजे काय ? याची व्याख्या फार वेगळी आहे. राजकारण्यांच्या खिशातले, पाळलेले, त्यांच्या ताटाखालचं मांजर, हप्ते घेणारे, माहिती अधिकाराच्या आडून अधिकार्यांना दापदडप करुन पैसाउकळणारे हे सर्व वगळून नैतिक जबाबदारीनी जो लोकशाहीचा चौथा स्तंभ निखळ पत्रकारीता व आपलं कर्तव्य चोख बजावतो तोच खरा पत्रकार यापेक्षा वेगळं काहीच नाही. पण वर उल्लेख केलेल्या तोतयांमुळे प्रामाणिक असणार्यांचा गळा घोटला जात आहे. इतरांच्या वागण्याचा सत्याच्या बाजून चालणार्यांना सुध्दा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही अत्यंत दुर्दैवी शोकांतीका यासमाजात आहे. जेव्हा पत्रकाराचा खून होतो, त्याचं घर जाळलं जातं, त्याच्यावर हल्ला होतो, त्याच्या वर असे प्रसंग ओढावतात की ते कोणावरही ओढावू नये म्हणून तो संपूर्ण आयुष्य जनतेसाठी वेचतो. पत्रकार हा जनतेच्या सदैव पाठीशी पण जनता ? असा प्रश्न पत्रकार जनतेला विचार आहे. त्याचा गुन्हा काय ? तर तो प्रामाणिक आहे ? तो जनतेच्या हिताचा नेहमी विचार करतो ? ही बाब जनतेने लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यावर जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतील त्याला व त्याच्या कुटूंबाला जेंव्हा जेव्हा अशा संकटांचा सामना करावा लागेल तेव्हातेव्हा जनतेने सुध्दा पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे.
- शंकर शेषेराव चव्हाण, मोबाईल : 9921042422
ईमेल: hr.shankarchavan@gmail.com
This comment has been removed by the author.
ReplyDelete