बलात्कारांचा कहरच कहर ...

आज दोन घटना समोर आल्या, एक मुंबईत बलात्कार झाला आणि दुसरीकडे पुण्यात अल्पवयीन मुलीवर दोन बलात्काराच्या घटना घडल्या या बालात्काराच्या घटना अतिशय भयंकर होत्या. सदर घटना माणुसकीला काळीमा फ ासणार्‍या आहेत. अमानुषपणे केले जाणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. पुण्यामध्ये एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केले या घटनेचा विसर पडला नाही तोवरच दुसरी बलात्काराची धक्कादायक घटना घडते. हे किती दुर्देव आहे. नराधमांनी सहा वर्षाच्य चिमुकलीवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना पुण्यामध्ये घडली. पुण्यात रेल्वे स्टेशनच्या फुटपाथवर झोपलेल्या आईच्या कुशीतून उचलून नेवून तिच्यावर सामुहीक अत्याचार झाला. मुंबईमध्ये तर याहीपेक्षा विचित्र व धक्कादायक प्रकार घडला. ही अतिशय निंदनीय घटना आहे. एका तीस वर्षीय पीडीतेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगामध्ये रॉड घुसवला. र्‍ह्दय पिळवटून टाकणारी अशी ही घटना साकीनाका परिसर मुंबई याठिकाणी घडली. राज्यात महिला तर सुरक्षित नाहीतच. बलात्कारांच्या वाढत्या घटनांमुळे राज्यात व देशात वासनांध व व्यसनांध झालेल्या नाराधमांकडून बलात्काांच्या अपराधाचे सत्र  कमी होतांना दिसून येत नाही. माणुसकीला काळीमा फासणार्‍या घटनांचा दिवसेेंदिवस आकडा वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस विकृत व विचित्र अशा घटना समोर येत आहेत. ही प्रचंड गंभीर बाबत झाली असून राज्यात व देशात कायदा व सुव्यवस्था पूर्णतः मोडखळीस झालेली दिसून येत आहे. ही देशासाठी व राज्यातील अकार्यक्षम व्यवस्थेसाठी अत्यंत निंदनीय व चिंतेची बाब आहे. कडक शासन नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचे बलात्कार करणारे नराधम तिनतेरा करुन मोकाट आहेत. तसेच त्यांना कायद्याचा मुळीच धाक नाही म्हणून अशा प्रकारच्या कृती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळत आहे. अशा नराधमांना कायद्यामध्ये बदल करुन कठोरात कठोर शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बलात्काराचा कहरच कहर होईल व बलात्कारांच्या घटनांचा आकडा असाच उच्चांक गाठत जाईल. घराच्या बाहेर स्त्रीयांना जोपर्यंत सुरक्षित वाटणार नाही तोपर्यंत ही अशीच परिस्थीती राहील. त्यामुळे अशा घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने पुन्हा अशा घटना होणार नाहीत यांसाठी खबरदारी घेवून तशा प्रकरची कार्यवाही तात्काळ करायला हवी. ज्या  कोमल जीवासोबत अशा प्रकारच्या वाईट कृत्याचे नराधम धाडस करतो हे किती मोठं दुर्देव. माणुसकी तर हरवलीच आहे व माणूस हा जनावर बनला आहे. मेंदू तर देवाने दिला पण त्याचा वापर पूर्णतः विकृत विचार करण्यासाठी होत असल्याचे यातून निष्पन्न होत आहे. ज्यांच्यासोबत अशा घटना घडतात त्यांच्या साठी आपण केवळ हळहळ व्यक्त करु शकतो फक्त, कारण देशात निष्क्रिय व्यवस्था काम करतेय.

- शंकर चव्हाण (महाराष्ट्र राज्य) 9921042422 

Write to : hr.shankarchavan@gmail.com

*****

Comments

  1. न्याय व्यवस्था व पोलीस यंत्रणा फक्त नावापूरत्याच आहेत सर !आणि अशी विकृतीला आळा बसला पाहिजे सर !
    आवाज् 🙏🏻🙏🏻🙏🏻

    ReplyDelete

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?