Posts

Showing posts from 2019

गुदमरलेला तो आवाज …

गुदमरलेला तो आवाज आवाज येत होता, आवाज येतच होता, आतलाच आवाज येत होता, तो सांगत होता, तो सांगतच होता, आवाज तो आतलाच होता आवाज तो आतलाच होता वाटलं खोटं सांगतोय तो, खोटं सांगतोय तो … पण तो थोडासा गुदमरलेला होता पण तो थोडासा गुदमरलेलाच होता … त्याला मदतीचा हात मिळत नव्हता, त्याला मदतीचा हात मिळतच नव्हता, जगणं सोपं असतं ? मरणं अवघड असतं ! मग दोन्ही वाक्यात तो फरकच काय ? मेल्यावर मिळते मदत हा देश कसला ? मेल्यावरच मिळते मदत हा देश माझा ! जीवंत पणाची किंमत शून्य मरणोत्तर भारतरत्न ? गादीसाठी रक्त सांडीले पैशांसाठी घरे फोडीले खरंच मी गुदमरलेला आवाज … खरंच मी गुदमरलेलाच आवाज … -     शंकर चव्हाण, अंबाजोगाई,  9921042422

फक्त तू ...

फक्त तू तू माझी मी तुझा अजबच नियम प्रेमाचा आठवणीत फक्त मी तुझ्या वाहून गेलो प्रेमात तुझ्या जग सारे पायास माझ्या संसार हृदयात तुझ्या साथी आहेस तू माझी प्राण आहेस तू माझी चुकलं कधी माफ कर स्वप्न तुझे तू साकार कर जगातलं आठवं आश्चर्य तू हृदयाचे ठोके आहेस तू प्रेमात सर्व काही माफ कर तू दुर्गुणांचा साफ आहेस तू दुर्गा, आहेस तू  जाणकार एकटाच होतो मी, दूर केलास तू अंधकार माझा आहेस जीव तू माझा श्वास तू माझं काळीज तू माझा विश्वास तू माझ्या शिवाय अर्ध तू माझा आहेस अर्थ तू तुझ्या विना मी शून्य  माझं विश्व आहेस तू प्रेम म्हणजे फक्त तू दिवस तू, रात्र तू तुझ्यामुळेच कवी झालोय मी पहिल्या भेटीचा क्षण आठवतोय मी अगं माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर अन तुझं माझ्यावर जीवन फक्त तू प्राण फक्त तू श्वास फक्त तू आवाज फक्त तू फक्त तू, फक्त तू बस फक्त तूच - शंकर चव्हाण, अंबाजोगाई,  ...

मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव …

मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव … जवा दुकानतल्या बियाण्याला असतुया भाव अन पिकवीलेल्या पिकाचा घसरतो भाव तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव नका काढू राव त्या पावसाचे नाव त्याच्या अंगात आता नुसताच भरलाय बाव जवा उन्हाळयागत रक रक करतंय गाव असं गांव जवा डोळयानं बघवत   नाय राव तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव पाऊस का पडना राव, ते कुणास तरी हाय का ठाव ? पावसाळा संपला तरी,   त्याचा काई ठिकाणाच न्हाई राव तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव मला वाटलं त्यानं बी पक्ष बदलला की काय ? पडतोय तिकडंच पडतोय गावोगाव, अन, आमचं मात्र करतोय दुष्काळगाव … तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव ढगामंदी तवा इमाईन आलं होतं राव पैसं बी खर्चीले तवा, पर साधला नाही डाव तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव आता तरी पड की बाबा,   जीव घेतो का काय ? तुला देईन म्या पैसं, ते आता खोटं व्हनार न्हाय मी पावसाला ईचारलं, तु असा कसा आगावैस राव त्यो मला मनला, आधी तू रोपटं लाव अन, मला ते झाड झालेलं दाव पुन्हयांदा म्हणू नको मला आता मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव मन अस्वस्...

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

Image
चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं ! महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्याविषयी काही समारात्मक व नकारात्मक गोष्टींचा आढावा आपण आज या संपूर्ण लेखामध्ये पाहणार आहोत. सोबतच चालक वाहक व प्रवाशांबाबतही थोडसं परखड भाष्य या ठिकाणी होणार असल्यामुळे काय अपेक्षीत बदल परिवहन मंडळाकडून व चालक वाहक व प्रवाशांकडून अपेक्षीत आहेत, त्याबाबत लोकभावनेची जोड प्रत्येकाच्या भावनेशी कशी जोडता येईल याबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र राज्य हे भावनिक माणणांची खान व सकारात्मक विचारांच्या हिऱ्यांची खान असेलेले राज्य म्हटले तर वावगे ठरु नये. कारण इथें माणूस सकारात्मकच विचार करणारा व वागणारा नक्कीच सापडेल. सर्वसामान्यांपासून ते असामान्यांपर्यंतचा माणूस हा बसने प्रवास नक्कीच करतो. प्रवास ही प्रत्येकाच्या आयुष्यातील निरंतर पक्रिया असल्यामुळे प्रत्येकाला याची गरज नक्कीच भासते. आपण आता मुळ मुद्याचं बोलूया ! महत्वाचं म्हणजे स्वत:चा व्यक्तीमत्व विकास जर साधायचा असेल तर नम्रता हे मूल्य प्रत्येकाच्या अंगी असणं फार महत्वाचं असतं. चालक, वाहक व प्रवाशी या  बाजूशिवाय परिवहन मंडळाचं ध्येय पूर्ती होवू शकत नाह...

तरुणाईचा संघर्ष

तरुणाईचा संघर्ष आयुष्यामध्ये तीन गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. जगण्यासाठी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी व ओळख टिकवण्यासाठी. पण हे सर्व होण्याआधी काहीतरी उदरनिर्वाह करण्याचे साधन असणे अत्यंत गरजेचे असते. जेणेकरुन हया तीन गोष्टींचा संघर्ष पूर्ण होऊ शकेल. ते म्हणजे नोकरी, व्यवसाय किंवा इतर अन्य माध्यम तरुणांकडे असायला हवे. ‍नोकरी मिळवण्यासाठी ती करण्यासाठी व टिकवण्यासाठी, आज देशामध्ये तरुणाईला अत्यंत तारेवरची कसरतच करावी लागत आहे, तिथं मग शासकीय असो किंवा खाजगी. अतिशय हालाखीच्या स्थितीमधून जावून संघर्ष करावा लागत आहे. लोकसेवा आयोग राज्यपातळीवर व देशपाळीवर स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अनेक रिक्त पादांच्या भरतीसाठी परीक्षा घेतं.  पण तिथं एवढी मोठी स्पर्धा असल्यामुळे सर्वांनाच नोकरी मिळेल असे नाही. पैकी दरवर्षी संघ लोकसेवा आयोगामार्फत हजाराच्या आसपासच अधिकारी म्हणून तरुण-तरुणींची निवड होत असते. तसेच महाराष्ट्र व अन्य राज्यांच्या राज्य आयोगांमार्फत रिक्त पादांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा व नंतर मुलाखत या प्रक्रियेद्वारे भरती करण्यात येते मात्र या भरतीची सरासरी...

अन् पुन्हा एकदा ‘ती’ नकोशी झाली …

Image
अन् पुन्हा एकदा ‘ती’ नकोशी झाली … ज्याच्याकडं आई नाही त्याच्याकडं काहीच नाही, ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर. एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आई हा शब्द जीवंत व्यक्तींच्या भावनाशी निगडीत असा शब्द आहे. त्यामुळे आईला जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते. ज्याच्याकडे आई नाही त्याला जाऊन विचारा आईची किंमत काय असते. मातृत्व ज्या स्त्रीला मिळाले तीला जाऊन विचारा मातृत्व स्विकारल्यानंतर त्यात तिला कसले समाधान वाटते. मराठीतील प्रसिद्ध कवी यशवंत यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची व्याख्या जगासमोर मांडली आहे, परंतू ही मातृत्वाची जाणीव एकीकडे व महाराष्ट्रातील बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. कारण, इथं मातृत्वाला काळीमा फासणारी या महिन्यातील दुसरी घटना घडली, चक्क आईने जिच्या विना जीवनाची सुरूवातच होत नाही, अशा एक वैरीणीने आपल्या दोन दिवसाच्या स्त्री अर्भकाला बाभळीच्या काटयाच्या आळयामध्ये टाकून दिले. अरे ! हे काय ऐकतोय ? असा प्रकार ऐकायला सुध्दा ...

सावधान ! तुमची फसवणुक तर होत नाही ना ?

Image
सावधान ! तुमची फसवणुक तर होत नाही ना ? सध्याच्या डिजीटल युगात जवळपास 99 टक्के आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन पध्दतीने केले जातात. भारत महासत्ता होण्यासाठी देशपातळीवर सर्वच शासकीय, खाजगी, शालेय व इतर जवळपास सर्वच अर्थिक व्यवहार हे ऑनलाईन पध्दतीनेच होतात. हा ऑनलाईन पध्दतीचा वापर केल्यामुळे वेळेची बचत तर   होतेच शिवाय सुलभ व सहजरित्या आर्थिक व्यवहार पूर्ण होतात. त्यामुळे तरुणाई सोबतच सर्वांचाच कल या ऑनलाईन पध्दतीच्या व्यवहारांकडे होत आहे. जसे फायदे आहेत तसेच याचा काही लोक गैरफायदाही घेऊन फसवणूक करतात. तसेच ऑनलाईन फिशिंग म्हण्जेच फसवणुकीचेही तितकेच प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. एक किस्सा असा आहे की, मी स्वत: आयटी क्षेत्रात गेली पंधराहून अधिक वर्षे झालं काम करतोय, मला स्वॉफ्टवेअर व हार्डवेअरमधील जवळपास बऱ्यापैकी ज्ञान आहेच शिवाय बेवसाईटबद़दल व कॉप्युटरचे तसेच मोबईलचे वेगवेगळे सॉप्टवेरबाबत माझा अभ्यास सुरू असतो. थोडक्यात काय तर मी जनरेशन प्रमाणे अपडेट असतोच.   त्या पंधदा वर्षामध्ये ऑनलाईन आर्थिक फसवणूक झालेले व फिशिंगच्या प्रकारात अडकलेले बळीचे बकरे अनेक आहेत, पैकी सात-आठ प्रकरणं...

अपघातावर बोलू काही !

Image
अपघातावर बोलू काही ! सध्या जगणं अवघड व मरणं सोपं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, किड्या मुंग्यांसारखं माणसं मारायला लागली आहेत. जीवाची किंमत कवडीमोल होत चालली असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत आहे, जणू जीवाची पर्वा कोणालाच नाही ! त्याचे महत्व काहीच शिल्लक नाही असे वाटायला लागले आहे. कारण आपण जीवाची किंमत वेळेला दिली आहे, आता माणसाच्या जीवापेक्षा, माणसाच्या शरीरापेक्षा वेळ अधिक मौल्यवान ठरत आहे. कित्येक उदाहरणं अशी आहेत की या वेळेपाई एखाद्या ठिकाणी वेळेत लवकर पोहोचण्याच्या नादात अनेकजण देवाघरी पोहचले, गतप्राण झाले. एवढी वेळ महत्वाची ? जीवाला काहीच किंमत नाही? टीव्ही लावला की अपघात झाल्याच्या बातम्या, पेपर उघडला की अपघात झाल्याच्या बातम्या, सोशल मीडियावर तर न पहावणारे, मन हेलकवणारे, काळजाचे ठोके वाढवणारे विचित्र अपघाताच्या फोटो, व्हिडिओ आपण पाहतो. जीव कासावीस होतो, निराश वाटते पण यावर उपाययोजना ? काहीच नाही ! वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तसतसे अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे, किडा-मुंग्यासारखं  निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. देशामध्ये सर्वात जास्त अपघाताने म...

ही वेळ पुन्हा येणे नाही !

ही वेळ पुन्हा येणे नाही ! वेळ ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये अमूल्य असते . या वेळेचा उपयोग जर योग्य पद्धतीने झाला त रजीवन अधिकच सुंदर होते , हे माहित असतांना सुद्धा आपण आपला अमूल्य वेळ बहुतेक वेळा वाया घालवतोच . माणसाला जीवनामध्ये संधी हीखूप कमी वेळा मिळते , ती संधी ओळखली पाहिजे , ती वेळ ओळखता आली पाहिजे , ज्याला ही वेळ ओळखता आली त्याला यशाची गुरुकिल्ली सापडली , कारण जीवनामध्ये एकदा गेलेली वेळ परत कधीच मिळत नाही हे जगाच्या पाठीवरील सत्य आहे . शालेय जीवना पासून किशोर अवस्थेपर्यंत संधीच सोनं ज्यांनी - ज्यांनी केलं , त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुवर्णक्षण मिळाले . म्हणूनच त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं . वेळ हा विषय प्रत्येकाच्या आयुष्या मध्ये प्रथम स्थानी आहे . योग्य नियोजन झाल्यास संधीसाधून त्याचा योग्य तो उपयोग केल्यास व्यवसायामध्ये सुद्धा सर्वात जास्त फायदा होतो .  स्पर्धा परीक्षा देणारे भावी अधिकारी होवू पाहणारे इच्छुक उमेदवार यांना वेळेची किंमतविचारा ते नक्कीच तुम्हाला वेळे...