सावधान ! तुमची फसवणुक तर होत नाही ना ?

सावधान ! तुमची फसवणुक तर होत नाही ना ?
सध्याच्या डिजीटल युगात जवळपास 99 टक्के आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन पध्दतीने केले जातात. भारत महासत्ता होण्यासाठी देशपातळीवर सर्वच शासकीय, खाजगी, शालेय व इतर जवळपास सर्वच अर्थिक व्यवहार हे ऑनलाईन पध्दतीनेच होतात. हा ऑनलाईन पध्दतीचा वापर केल्यामुळे वेळेची बचत तर  होतेच शिवाय सुलभ व सहजरित्या आर्थिक व्यवहार पूर्ण होतात. त्यामुळे तरुणाई सोबतच सर्वांचाच कल या ऑनलाईन पध्दतीच्या व्यवहारांकडे होत आहे. जसे फायदे आहेत तसेच याचा काही लोक गैरफायदाही घेऊन फसवणूक करतात. तसेच ऑनलाईन फिशिंग म्हण्जेच फसवणुकीचेही तितकेच प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. एक किस्सा असा आहे की, मी स्वत: आयटी क्षेत्रात गेली पंधराहून अधिक वर्षे झालं काम करतोय, मला स्वॉफ्टवेअर व हार्डवेअरमधील जवळपास बऱ्यापैकी ज्ञान आहेच शिवाय बेवसाईटबद़दल व कॉप्युटरचे तसेच मोबईलचे वेगवेगळे सॉप्टवेरबाबत माझा अभ्यास सुरू असतो. थोडक्यात काय तर मी जनरेशन प्रमाणे अपडेट असतोच.  त्या पंधदा वर्षामध्ये ऑनलाईन आर्थिक फसवणूक झालेले व फिशिंगच्या प्रकारात अडकलेले बळीचे बकरे अनेक आहेत, पैकी सात-आठ प्रकरणं मला निश्चित माहित आहेत. त्यात अलिकडचे एक प्रकारण म्हणजे 50 ते 55 वयोगटातील एक जोडपं माझ्याकडे घामाघूम होउन आलं. मी आपलं लॅपटॉपवर ऑनलाईन बँकींगशी संबंधीत कांम आटोपून ऑफीस बंद करुन निघालोच होतो. तेवढ्यात सर आम्हाला मदत करा ! आमच्याकडून खुप मोठा घोळ झाला आहे! वगैरे वगैरे बोलत होते, तेवढ्यात मला सांगायला सुरूवात केली की, अमुक अमुक ठिकाणाहून आम्हाला आम्हाला एक फोन आला त्यांनी आम्हाला एटीएम नंबर  सीव्हीव्ही पिन व क्रेडीट कार्ड नंबरसह इतर माहिती  विचारली व आम्ही ती घाईमध्ये सांगितील व आमचे पैसे डेबीट म्हणजे खात्यातून वजा झाले व क्रेडीटकार्डमधूनपण आपोआप वजा  केले ! आम्ही ओटीपी नावाचा कोड आमच्या मोबाईलवर आला तो त्या फसवणुक करणाऱ्याला सांगितला, त्यामुळेच आमचं असं झालं! अम्ही आता काय करावं ? आमची प्लीज मदत का सर,  मी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं. व पोलीसांत तक्रार दाखल करुन संबंधीत बँकेला कळवण्याचे काम केले. अशाप्रकारे फसवणूक होउन त्यांची जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले. आणखीन एक नवीन प्रकार माझ्‍या समोल आला पण मी वेळीच सावध झाल्याने हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे माझ्या लक्षात आले. ते असे की, मी ऑनलाईन एका संकेतस्थळावर जुनी कार शोधत होतो. मी माझ्या शहराच्या लोकेशनवर एक कार पाहिली, मी त्या संबंधीत व्यक्तस संपर्क केला असता. एक अंदाचे 23-24 वर्षाचा तरुण राजस्थानमधून बोलतोय म्हणून सांगत होता व मी तुमच्या आधारकार्डच्या पत्त्यावर गाडी पाठवतो व मला माझ्या खात्यावर अमुक अमुक एवढी रक्कम जमा करा असं म्हणाला. तसेच दुसऱ्या दिवशीही असाच मी एक फोन केला व कार एअरपोर्टवर असल्याचे मला तो व्यक्ती बोलला. कार दुसरीकडे व लोकेश्न आपल्या जवळपासचे सेट करुन असे फसवणूकीचे प्रकार नेहमीच होत असल्योच समोर आहे. तसेच मी त्या युजरला ब्लॉक केलं व संबंधीत संकेतस्थाळाकडे त्याची तक्रारही केली. असे प्रकर हमखास होत असतात. एटीएमचा नंबर सांगा, तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुमचे पार्सल एअरपोर्टवर आले आहे टॅक्स भराव सोडवून घ्या असे विविध बहाणे असणारे फसवणुकीचे प्रकार होत असतात त्यामुळे या डिजीटल युगात अत्यंत सावधागिरीने आपणास रहायचे आहे व ऑनलाईन आर्थिक व्यवहार हाताळायचे आहेत. घाईमध्ये व मोहापोटी कसल्याच गोष्टीचे समर्थन करुन बळी पडू नका कारण सध्या मोठ्या प्रमाणात अशे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत व सर्वसामान्य नागरीकांच्या समस्येत वाढ होत आहे. अशा गोष्टींना पोलीसांत तक्रार केली जाईपर्यंत व पुढील प्रकरण वाढेपर्यत आपण स्वतःच स्वतःच्या आर्थिक मालमत्तेची रक्षणाची जाबबदारी पार पाडावी व स्मार्ट बनावे. जेणेकरुन फसवणुक होणार नाही. व अशा प्रकारचे फोन आल्यास तात्काळ समजेल की हा फोन कशाप्रकारचा आहे. आम्ही बँकेतून अमूक अमूक बोलतोय असं सांगून सुध्दा फ सवणूक होउ, तुमचे टीव्हीचे रिजार्ज करतो तुमचा एटीएम क्रमांक सांगा म्हणून सुध्दा फावणूक होवू शकते, त्यासाठी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच आपला घामाचा पैसा अगदी सहज रित्या आपणाल्याला फसवून कोणीतरी मजा मारत असेल तर ही अत्यंत चिंतेचा विषय आहे यावर आळा बसण्यासाठी आपण अशा प्रकारचे फोन कॉल व क्रमांक त्वरीत ब्लॉक करुन आपण आपली अर्थिक मालमता चोरी होण्यापासून बचाव करु शकतो. असे काही वाटल्यास इंटरनेटवर फसवणूक कशा प्रकारे होते व सावधानी कशी बाळगावी याबबत जनजागृती करणारे व्हीडीओ असतात, अधिक माहितीसाठी त्याचा संदर्भ घेतलेला अधिक फायदेशिर ठरते. अशा फसवणूकीपासून सावध रहा व स्मार्ट बना.
शंकर चव्हाण, अंबाजोगाई, 9921042422

Comments

  1. वास्तव समोर आणणारा लेख.. छान

    ReplyDelete

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..