बाजारात ‘तुरी’ अन् मुख्यमंत्री शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करी !


बाजारात ‘तुरी’ अन् मुख्यमंत्री शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करी !
खचलेला, खंगलेला शेतकरी शेतावरी, टवटवीत एसीत सर्वांगानी फुगलेले मुख्यमंत्री अन् बाजारात भाव न मिळाल्याने धुळखात पडलेल्या ‘तुरी’ हे समीकरण व हा राडा गेल्या दोन महिन्यांपासून सोशल मिडीयासह सर्व मिडीयांचा विषय बनला आहे. राज्यात नेमकं काय चाललंय ? विरोधक टिका करतात पण राजकिय वर्तुळात हे असावं पण शेतकऱ्यांसोबत असा खिलवाड करणारे कृत्य करणे व त्यांच्या जीवाशी खेळणे हे मात्र जरा अतिच होत आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. निव्वळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर शेतमजुरांना सुध्दा याचा फटका बसला आहे. शेतकऱ्याने शेतात पिकवलेले उत्पन्न दरवेळी त्याचे भाव कमी असल्याने त्याच्या पदारात काहीच उरत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळवून देऊ अन् आता या तुरीच्या पिकाचा बाऊ करत असून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचं काय झालं देवेंद्र भाऊ अशी म्हणायची वेळ आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र फडणवीस सरकार गंभीर नसल्याने शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे की काय असं वाटू लागले आहे. नेमके हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत काय घडवून आणणार आहे याची भिती शेतकऱ्यांसह शेतमजुरांना वाटत आहे. कर्जमाफीचं भिजत घोंगडं जसंच्या तसं अजूनही तसंच आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यास फडणवीसांना वेळ नाही आणि त्यांना वेगवेगळया ठिकाणी जाऊन पुरस्कार वितरण व उदघाटन सोहळेच्या सोहळे पार पाडण्यास वेळ आहे. देवेंद्र साहेब, या शेतकऱ्यांच्या बांधावर आणि उघडा डोळे पहा नीट की, शेतकरी किती सुखावलाय, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज कुठं नेऊन ठेवलंय, आपण स्वत: एसी गाडयांमध्ये फिरता इथं आम्ही कर्जबाजारी होऊन बसलोय, आमच्या मदतीला तुम्ही तरी याल अशी आस आम्हास होती पण तुम्ही तर आमचा विश्वास घात केलात, अशा किंकाळया शेतकऱ्यांच्या ऐकावयास मिळत आहेत. खरंच शेतकऱ्यांच्या घरच्या परिस्थीतीचा अभ्यास केल्यास दोन दिवस झोप लागणार नाही किंवा तहान, असं भयान वास्तव डोळयासमोर आपण रोजच पाहातोय. त्याच्या कर्जाचे व सातबाऱ्याचे पुनर्वसन होणे गरजेचे तर आहेच पण शेतकऱ्यांसाठी दरमहा पेंन्शन योजना सुरु करुन त्याला लागणारे शेतीशी निगडीत सर्व गोष्टी शासनाकडून मोफत उपलब्ध करायला हव्यात. त्याशिवाय शेतकरी व आपला कृषीप्रधान भारत देश सुजलाम सुफलाम होणार नाही आणि हे तुरीचं लफडं जरा फडणवीसांनी लवकरात लवकर सोडवून, अभ्यास करुन पुढचा  विषय हाती घेतला तर बरे होईल. मुख्यमंत्री म्हणुन आपणाला आपल्या कर्तव्याचा विसर पडू नये असं या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना वाटते.  शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांना जर दरवेळी असाच हमी भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांनी शेतात पिक पिकवण्यासाठी लावलेला कस, पैसा व ही सर्व जुगाररुपी बाब परतफेडण्यासाठी त्याच्याजवळ काहीच शिल्लक राहणार नाही व शेतकरी व कुटूंब मरणाच्या वाटेवर येईल. एका निष्पापाच्या बळी जाण्याचं पाप तुम्ही नका डोक्यावर घेऊ. माणुस म्हणुन काही तरी माणसासाठी करा ही सर्व प्रार्थना तुम्हाला का कारायची ? तर तुमच्या हातामध्ये निर्णय घेण्याची व अंमलबाजावणी करण्याची ताकतीची जादूची कांडी आहे म्हणून. आपल्या पॉझीटिव्ह निर्णयाकडे सुखलेला शेतकरी आस लावून आहे. साहेब नाही तर हया तुरीच्या प्रकरणामुळे बाजारात तुरी अन् मुख्यमंत्री शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करी ? असं म्हणायची वेळ आपल्यावर येऊ देऊ नका एवढीच कळकळीची विनंती.

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

  1. भारत देश सुजलाम सुफलाम होणार नाही आणि हे तुरीचं लफडं जरा फडणवीसांनी लवकरात लवकर सोडवून, अभ्यास करुन पुढचा विषय हाती घेतला तर बरे होईल.......bhari

    ReplyDelete
  2. आपले मा.मुख्यमंत्री साहेब आम्हा सर्व शेतकरी बांधवांची विनंती आहे की तुरीचा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर सोडवावा. मुखमंत्र्यांनीच तूर खरेदी मध्ये घोटाळा झाला असे सांगणे बरोबर नाही. त्या घोटाळ्याची चौकशी करून इतक्या दिवसात तूर प्रश्न मार्गी लावायला हवा होता. नाहीतर आगामी निवडणुकीत "शेतकरच्या हाती तुरी अन मुख्यमंत्री घरी" अशी वेळ येऊ नये म्हणजे झालं.

    ReplyDelete

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?