किडक्या औलादी महाराष्ट्रात जन्मल्या !


किडक्या औलादी महाराष्ट्रात जन्मल्या !

काल परवा सोशल मिडयावर राजकिय वादातून छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पर्यंत मजल जाणारा वाद निर्माण झाला. सोशल मिडीयामधून यावर तीव्र संताप व्यक्त करुन एक लाट निर्माण झाली. सुरूवात पंकजा मुंडेच्या विरोधात कमेंट का केली असे म्हणत विठ्ठल तिडके याच्यात पवन नावाच्या युवकामध्ये चांगलाच वाद रंगला. तो वाद विठ्ठल ने पवनला विचारणा केली तु मराठा आहेस का ? पवन म्हणाला होय मी मराठ बहुजन आहे. पवन ने मराठा आहेस का म्हटलयाबरोबर राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्यावर कानात शिस्याचा रस ओतावा ऐकायलाही मन तयार होऊ नये अशा गलिच्छ अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. दोघांमध्ये वादाचा ज्वालामुखी चांगलाच भडकला. हा वाद रेकॉर्ड झाला एका व्हाईस क्लिपमध्ये हया वादाची क्लिप पवनने व्हॉटसॲप नामक सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल केली . दोन तिन पोलीस स्थानकामध्ये विठ्ठल तिडके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्याला अटक केली अशी चर्चा सोशल मिडीयावर पहावयास मिळाली. हा वाद जरा बाजुला केला तर एकच प्रश्न शिल्लक राहतो. नेमकं यातुन कोणाचा काय फायदा झाला, काय निष्पन्न झालं. हयात नसलेल्या महापुरषांबाबत अशा भाषेत बोलणाऱ्या औलादी जर महाराष्ट्रात पैदा होत असतील तर राज्याच्या अस्मितेसाठी ही लज्जास्पद, काळीमा फासणारी बाब जरुर आहे शिवाय अशा किडक्या नालायक औलादींचे वेळीच शिर कलम कादयाच्या माध्यमातून केले नाही तर उदया अशा प्रकारच्या जातीचा भडकाव करुन जनमानसांना त्रास देणाऱ्या औलादीउरावस बसतील. पण हे होऊच कसे शकते. नेमके जातीं जाती बाबत हा विरोध होण्याचं नेमकं कारण राजकारण असायला हवे कारण हा वाद राजकिय विचारातून अशा स्तराला जाऊन पोहचला ज्याला कि शेवटच नव्हता. आपण निषेध व्यक्त केला, गुन्हा नोंदवला, त्याला न्यायालयाअंतर्गत आता शिक्षाही हाईल मात्र पुढे काय ? पुन्हा असल्या किडक्या औलादी जन्माला येऊ नये म्हणुन आपण नेमक्या काय उपययोजना करतोय याचे भान सर्वांना असायला हवे ? केवळ राज्य, देश, जिल्हा, गावंची गावं नुसते बंद पाडून चालणार नाही. ठोस उपाययोजना केल्याशिवाय असल्या औलादी पुन्हा कोणत्याही महापुरूषांबाबत डोक्यात विचार करायला सुध्दा लाख वेळेस विचार करतील. कोणत्याही महापुरूषांबद्दल पुन्हा असे होणार नाही यासाठी आपण पाऊल जर वेळीच उचलले नाही तर ही नालायक औलादी पुन्हा असे कृत्य करण्यास प्रोत्साहीत होतील यांच्या अशा विचारांना खतपाणी मिळेल. हे भयान वास्तव आहे. निश:ब्दच आहे. यांच्यावर चांगले संस्कार झाले असते तर असल्या किडक्या औलादी महाराष्ट्रात जन्मला आल्याच नसत्या.


शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422,  hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..