शेतकरी आक्रमक झाल्यास पळता भुई थोडी होईल !


शेतकरी आक्रमक झाल्यास पळता भुई थोडी होईल !

एक कमी उंचीचा मंत्री, आपली बौध्दीक पातळीच्या पलिकडे जाऊन लाखोंच्या पोशिंद्याबद्दल बरेवाईट काही बोलून जातो आणि पुन्हा निर्लज्जासारखे संवाद यात्रा काढून शेतकऱ्यांशीच संवाद साधण्यासाठी येतो, अशा बडव्यांना पोकळ बांबूचे फटके का देऊ नये ? एवढी आक्रमकता जर शेतकऱ्यांनी दाखवली असती तर काय झाले असते ? फक्त विचार करुन बघा किती भय वाटणारे आहे, प्रत्येक वेळी मार्मीक उत्तरे देऊ न शकलेला शेतकरी कधी आक्रमक झाला तर ? काही दिवसांपूर्वी एकाने खालच्या पातळीवर जाऊन देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या पत्नीविषयी वादग्रस्त व मानव जातीला काळीमा फासेल अशा शब्दांमध्ये आग ओकली होती. ते प्रकरण जीवंत असतांनाच पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बाबतीतही असा प्रकार जन्म घेतोय. याची सोशल मिडीयावर निषेधात्मक पाऊले उमटली, जवानांच्या पत्नींविषयी जेंव्हा असे वादग्रस्त विधान एकाने केले होते त्यावेळी सुध्दा अशाच सोशल मिडीयावर प्रतिक्रियांचा महापूर उसळला. मात्र एवढी आक्रमकता व निषेध पुरेसा आहे का हो ? हाताल्या हजार दीड हजाराच्या फोनवरुन निषेधाच्या फैरी झाडल्या म्हणजे आपण आपले कर्तव्य बजावले व जबाबदारी झडकून बाजूला व्हावे असेच झाले म्हणायचे. पुढे काय ? हा प्रश्न का सतावत नाही तुम्हा मेंढरपध्दतींनी वेढलेल्या वेडया लोकांना ? एखादयावर अन्याय झाला तर त्याबाबत आजपर्यंत मोर्चे, उपोषणं, निवेदनं, निषेध व्यक्त करुन काही प्रश्न सुटणार आहेत का ? कुठं तरी आपण चुकलो ? असं नाही का वाटत. तो कोण कुठला विचाराने कमी उंचीचा मंत्री शेतकऱ्यांविषयी विधान करतो आणि आपण फक्त सोशल मिडीयावर निषेध व्यक्त करुन मोकळे व गप्प ? लाखोच्या पोशिंदयाची एवढीच का किंम्मत ? त्याने कष्टाची भाकरी तुमच्या मुखात घातली, रात्रंदिवस तुमच्यासाठी घाम गाळला, त्याचे उपकाराला कुठेतरी जागा. शेतकऱ्यांविषयी असे उद्गार काढणारे निर्लज्य मंत्री जर महराष्ट्रासारख्या पावनभुमीमध्ये पैदा होत असतील तर ही महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी शरमेची बाब तर आहेच शिवाय शेतकऱ्यांसोबत अशी घटना पुन्हा होऊ नये त्यासाठी आपण ठोस काय भूमिका घेतली पाहिजे याचा सखोल विचार नक्कीच व्हायला हवा. पण एक लक्षात असू दया महत्वाचं म्हणजे अशा गोष्टींच्या मानसिक छळाला कंटाळून शेतकऱ्यांनी जर आक्रमक पावित्रा घेतला तर अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करणाऱ्या कुविचारी लोकांना पळण्यासाठी पळता भुई थोडी होईल याचे भान त्यांनी ठेवावे. शेतकऱ्यांनी जर संप केला तर विचार करा काय होईल. नोट बंदीच्या झळा जनता अजुनही सोसत आहे हे ताजे उदाहरण काही कमी नाही की काय केल्यास काय होऊ शकते व काय केल्यास कोणाला जास्त फटका बसू शकतो. नेमके काय म्हणायचे आहे ते समजणाऱ्यांनी समजून घ्यावे ज्यांना कळत नाही अशा लोकांनी महाराष्ट्र सोडून पाकिस्तानात गेले तरी चालेल. कारण शेतकऱ्यांविषयी असे लज्जास्पद उद्गार काढून शेतकऱ्यांचा आपमान केल्यास त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा काहीच अधिकार नाही. अशा प्रकारचे कृत्य पुन्हा होणार नाही यासाठी आत्ताच जिभेला आवर घाला व केलेल्या चुकीबद्दल जाहिर माफी मागा यातच मंत्रीमहोदय आपले सौख्य सामावले आहे हे विसरु नका. अन्यथा होणारे परिणाम भोगण्यास तयार रहा. 


- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

  1. खरच लोकशाहीच्या नावाखाली यांनी देशात हुकूमशाही चालवली आहे आणि लोकांच्या भावनांशी खेळण्याचा धंदा सुरू केला आहे.

    ReplyDelete

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..