हसवणारा पाहिजेच ...
तणावमुक्त आयुष्य जगायचं असेल तर जीवनात आनंदमय क्षण खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्ही पैशाने कितीही श्रीमंत असाल पण आनंद कधीही पैशाने विकत घेऊ शकणार नाहीत. आनंद होणं हे एक नैसर्गिक वरदान आहे. आनंद हा मानवी आयुष्यातला अनमोल रत्न आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या कुटूंबामध्ये एक तरी हसवणारा व्यक्ती पाहिजेच कारण हा आयुष्याचा महत्त्वाचा व अनमोल भाग आहे. तुम्ही एखादा दिवस उदास झालात तर त्या क्षणी तुम्हाला तेंव्हा सहानुभूतीची व आधाराची अत्यंत आवश्यता असते. त्या क्षणी जर तुम्हाला हसवणारा व आनंद देणारा कोणी भोटला तर तो तुमचा दु:खाचा क्षण क्षणार्धात आनंदाचा नक्कीच करेल. एरवी आपण मनोरंजनाचा भाग म्हणून विनोदी चित्रपट विनोद, विनोदी कथा, विनोदी नाटकं, चित्रपटंव विनोदी कार्यक्रम पाहतो कारण त्याची आपल्याला का गरज आहे आणि हे जर जाणून घ्यायचा असेल तर त्या हसवणार्या व्यक्तीला जाऊन विचारा हसवण्यासाठी किती मेहनत व कष्ट लागतात. समाजात सामाजिक कार्य करण्यासाठी खूप मोलाचे योगदान द्यावं लागतं स्वतःला खूप झिजवावं लागतं, प्रचंड मेहनतीच्या जोरावर समाजसेवा सफल होते व श्रेष्ठ ठरते. इतरांना हसण्यासाठी हसवणार्या व्यक्त...