इथं बलात्कारांचा कहर झालाय, अन् देवा तू सांग ना कुठं गेला हरवुनी ...

 

सार्‍या जगात बलात्काराच्या गुन्ह्यांनी उच्चांक गाठला आहे, त्यात आपला भारत देश सुध्दा मागे नाही. सन 2019 च्या अहवालानुसार देशात 32033 बलात्काराच्या गुन्ह्यांची पोलीस ठाण्यात नोंद झाली. सन 2019 मध्ये भारतात दर 16 मिनिटांनी बलात्काराची नोंद झाली. त्यात महाराष्ट्रामध्ये 2299 गुन्ह्यांनी नोंद आहे, तसेच देशामध्ये 18 वर्षे वयावरील 27093 गुन्हयांची नोंद आहे व 18 वर्षाच्या खाली वय असणार्‍यांमध्ये 4940 बलात्कारांच्या गुन्हयांची नोंद भारतामध्ये आहे. ही फक्त पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याचा अहवाल आहे, यामध्ये गुन्हे नोंद न झालेले, न होऊ दिलेले यांची नोंद अजिबात नाही. हा बलात्काराचा कहरच. विचार करा देशात दर 16 मिनीटाला एक बलात्कार होत असेल तर ही बाब किती गंभीर स्वरुपाची आहे याचा विचार करायला हवा. स्त्रीयांचं किती मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण होत असेल. त्यांच्यावर किती मोठया प्रमाणात अत्याचार होत आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सुध्दा मोठया प्रमाणात महिलांवर अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. देशाच्या राजधानीतच महिला सुरक्षीत नसलीत तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल जरा विचार करा. अल्पवयीन मुलींवर मोठया प्रमाणात भारत देशामध्ये अत्याचार होत आहेत. रोज कुठे ना कुठे 1 महिन्याच्या बाळापासून ते 17 वर्षांच्या अल्पवयीन चिमुकल्यांवर बलात्कार होत आहेत. काय ही देशात परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदवस बलात्काराच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढत होत आहे. लहान लहान मुलींवर पाशवी बलात्कार करुन निर्घृण खून केल्याच्याही अनेक घटना मोठया प्रमाणात घडल्या आहेत व दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. भारतामध्ये महिला अजितबातच सुरक्षित नाहीत अशी एकंदरीत परिस्थिती निर्माणा झाली आहे. घराच्या बाहेर पाय ठेवणं महिलांना आता डोकेदुखी झाली आहे. वासनांध झालेल्या पाशवी वृत्तीच्या पुरुषी राक्षसांकडून स्त्रीयांचे लैंगिक शोषण रोज होत आहे. अतिशय लहान चिमुकलीसोबत असे कृत्य होत असतांना जगात बलात्काराचा कहर झाला असतांना देवा तू सांग ना कुठं गेला हरवुनी. आता खरंच तुला अवतार घेण्याची गरज आहे. संपवून टाक सारं, अरे देवा आता तुझ्याशिवाय हे कोणीच रोखू शकणार नाही. वासनांध व व्यसनांध झालेली ही पिढी ज्या स्त्रीची इज्जत वाचवू शकत नाही त्या षंढ पिढीला जगण्याचा मुळीच अधिकार नाही. एखादा मोठा उल्का पृथ्वीवर पाठवून नष्ट करुन टाक हया सार्‍या जगाला असा टाहो ती चिमुकली तुझ्याकडं करते आहे. तिच्यासोबत जेंव्हा असं अनपेक्षित घटना घडते ती तुझ्या नावाचा टाहो फोडते रे बाबा, त्या निर्दोष निरागस बालिकेला या नराधमांच्या तावडीतून वाचवायचं सोडून तु कुठे बसला आहेस लपून. आता तरी धाव ना रे बाबा तिच्यासाठी.

बलात्कार करणार्‍यांला कठोरात कठोर शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे पाशवी बलात्कार हे नराधम करत राहतील व मोकाट सुटतील. वासनेच्या आहरी गेलेल्या त्या पुरुषी वृत्तीला ही काळीमा फासवणारी बाब आहे. बलात्कार करणार्‍या नराधमास, आरोपीस गुन्हा केल्यापासून एक तासाच्या आत जोपर्यंत चौका चौकामध्ये फासावर लटकवले जात नाही किंवा त्यांचे शिर त्याच्या धडापासून बाजूला केले जात नाहीत, तोपर्यंत बलात्कारांच्या गुन्हयामध्ये कायमची घट होणार नाही. अशी होणारी शिक्षा पाहून कोणीही स्त्रीयांकडं वाईट नजरेनं सुध्दा पाहण्याचं धाडस करणार नाही. कायदा एवढा कडक असून सुध्दा अशा प्रकारच्या गुन्हेगारी वृत्तीला मोठया प्रमाणात खतपाणी मिळत आहे. प्रत्येक घरामध्ये कोणीतरी स्त्रीचे लैंगिक शोषण, तिचा छळ, तिच्यावर अत्याचार करत असतात, ती बिचारी एवढं सारं सहन करुन आपलं जीवन दुसर्‍याच्या हातात ठेऊन जीव मुठीत ठेवून जगते आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी अजुनही स्त्री पुरुषांच्या जुलमी गुलामगिरीत दिवस काढत आहे. हे कुठं तरी थांबलं पाहिजे. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अश प्रकारच्या गुन्हेगारीला कुठे तरी पूर्णविराम द्यायला हवाच.

- शंकर चव्हाण (महाराष्ट्र राज्य) 9921042422

Write to : hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..