जन्मतः कोणीही गुन्हेगार नसतो ...
एखाद्या
व्यक्तीवर अन्याय झाला की, मानसिक विचारांमुळे त्याचे विचारपरिवर्तन होते व माणूस गुन्हेगारी
क्षेत्राकडे आपोआप खेचला जातो. विनाकारण एखाद्या व्यक्तीला जर त्रास झाला तर तो आपोआपच
गुन्हेगार बनला जातो. समाजामध्ये काही विकृत विचारांची धारणा असलेले लोक असतात त्यांच्या
हातून गुन्हा घडतो व ते स्वत: गुन्हा करतात तेव्हा त्यांनी गुन्हेगारी करून आपली उपजीविका
उदरनिर्वाह करण्याचे स्वतः ठरवलेले असते. अशा प्रकारचे गुन्हेगार हे वेगळ्या स्वरूपाचे
असतात त्यामुळे विनाकारण अन्याय झालेल्या गुन्हेगार व स्वतःहून गुन्हेगारी क्षेत्राकडे
गेलेल्या गुन्हेगारांमध्ये फरक आहे. आपण जेव्हा एखादी कृती करतो तेव्हा त्यापासून इतर
कोणाचे नुकसान तर होत नाही ना असा विचार केला पाहिजे कारण हासुद्धा भाग अनेकांना गुन्हेगारी
क्षेत्राकडे जाण्यापासून वाचवू शकतो. त्यामुळे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या
क्षेत्रामध्ये अतिशय प्रामाणिकपणे आपले कर्तव्य केले तर आपल्यामुळे एखाद्यावर अन्याय
झाला नाही तर आपले जीवन सार्थकी झाले असे समजावे. नाण्याच्या दोन बाजू असतात एक चांगली
आणि एक वाईट. आपलं काम नाण्याच्या कोणत्या बाजूने चालायचं हे आपण स्वतः ठरवू शकतो.
आपल्या नकळत जर एखाद्यावर अन्याय झाला व त्याची नुकसानभरपाई आपण केली तर त्यापासून
तयार होणारा गुन्हेगार हा तिथेच रोखला जाऊ शकतो. जेणेकरून गुन्हेगारी क्षेत्रांमध्ये
होणारी वाढ थांबेल. वैचारिक वाद, अनैतिक संबंध, पैसा, जमिनीचे वाद किंवा इतर किरकोळ
गोष्टीवरून माणसांमाणसांमध्ये वाद होत असतात. या वादातून एखाद्याने एक पाऊल मागे सरकावे
अन्यथा पुढे होणारे परिणाम हे पोलीस ठाण्यात, न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा तिसरा कुठलाही
पर्याय कोणासमोर उरत नाही आणि यामुळे फक्त नुकसान होते. त्यामुळे वेळीच सावधगिरी बाळगून
दोन्ही व्यक्तीने आपसात वैचारिक पातळीवर समजून घेऊन वाद मिटलेला केव्हाही चांगला. देशामध्ये
प्रचंड प्रमाणामध्ये गुन्हेगारी फोफावली आहे. दिवसेंदिवस विविध प्रकारचे गुन्हे घडत
आहेत. त्यामुळे देश विचारांच्या पलीकडे जाऊन जनावरांच्या कळपामध्ये जाऊन बसला आहे असं
म्हटलं तर वावगं ठरू नये. हल्लीची परिस्थिती लक्षात घेता कोणीही एकमेकांना विचारण्यासाठी
अजिबात तयार नाही. एकमेकांचे ऐकण्यास तयार नाही आपलंच खरं म्हणून चुकीचं असेल तरी पण
तो त्याच्या मतावर ठाम आहे. त्यामुळे नुकसान देशाचे होते हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे
एखाद्या व्यक्तीवर अन्याय होणार नाही असेच जन्मभर वागा कारण जन्मत: कोणीही गुन्हेगार
नसतो.
- शंकर चव्हाण (महाराष्ट्र राज्य) 9921042422
Write to : hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment