कंट्रोल झेड इज नेव्हर इन आवर लाईफ ...

 



कंट्रोल झेड ही क्रिया संगणकाशी निगडीत आहे. त्यामुळं ती समजून घेणं महत्वाचं आहे. कंट्रोल झेड ही एक कॉम्प्युटरवर दैनंदिन कामकाज करतांना वापरली  जाणारी शॉर्टकट की आहे अर्थात काम करत असतांना एखादी क्रिया आपल्याला नको असेल किंवा एखादी झालेली चूक, क्रिया पूर्ववत करण्यासाठी या कीज चा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे संगणकावर केलेल्या कामात अचूकता येते. ही की, Undo या सुवीधेचे संक्षिप्त रुप आहे. तुम्ही कधीही जीवघेण्यास स्पर्धेच्या युगात अशा चुका करु नका की, त्याला Undo हे ऑप्शन अर्थात कंट्रोल झेड नसणार आहे. आयुष्याच्या पायर्‍या चढत असतांना कधीही मागे वळुन पाहू नका. इतिहासाच्या अभ्यास करतांना मागे वळुन जरुर पहा कारण आयुष्याच्या पायर्‍या ह्या जोपर्यंत यश संपादन होत नाही तोपर्यंत चढयच्याच असतात व इतिहासाचा अभ्यास करतांना अनुभवाच्या जोरावर आपलं जीवन जगायला शिकायचं असतं. प्रत्येकजण आयुष्यामध्ये रोज नवनवीन गोष्टी शिकत असतो. अर्थात माणूस आयुष्यभर काही ना काही शिकतच असतो, व्यक्ती हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. पण हे सर्व काही होणं जीवनात एकदाच असणार आहे. जसं निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. तसंच आयुष्यातून निघून गेलेले अनमोल क्षण हे कधीच परत मिळणार नाहीत. याची जाणीव मात्र पावला पावलावर ठेवा. नेहमीच डोळयासमोर सकरात्मक दृष्टीकोन ठेवून जीवन जगायचं असतं व इतरांना त्याबाबतची शिकवण द्यायची असते. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी खूप असतात. पण त्या अडचणीचा सामना करण्यासाठी इतरांना त्रास होणार नाही याची सुध्दा खबरदारी घेवूनच काम करायचं असतं. अनावधानाने जर इतर कोणाचं मन दुःखावलं असेल तर तात्काळ क्षमा मागायला शिका. कारण तोंडातून निघालेला शब्द व धनुष्यातून निघालेला बाण कधीच परत मिळवता येत नाही. व यामुळे होणारे नुकसान कधीच भरुन निघत नाही. जर आयुष्याला कंट्रोल झेड चे बटन असतं तर, एवढा जरी विचार केला तरी किती तरी आनंद मिळतो. तसं झाल्याची अनूभूती येते. हे सर्व शक्य होईल पण आपापल्या स्वप्नात. आयुष्यात केलेल्या चुका कधीही दुरूस्त होणार नाहीत कारण चुक झालेली वेळ पुन्हा येणार नाही किंवा ती वेळ पुन्हा पाठीमागे जाणार नाही. म्हणूनच काम करत असतांना विचारपूर्वक करा, अभ्यासपूर्ण करा. चुक करणार्‍यापेक्षा क्षमा करणारा केव्हाही श्रेष्ठच असतो. म्हणून नेहमीच इतरांचे आभार मानायला शिका व त्याआधी क्षमा करायला शिका. मी पणा, राग, लोभ, मत्सर ह्या सर्व गोष्टी आयुष्यात गौण समजा. आयुष्य खुप सुंदर आहे ते सुंदर आयुष्य आनंदानं जगण्यासाठी धडपड करा. कारण,  कंट्रोल झेड इज नेव्हर इन आवर लाईफ .

-   शंकर चव्हाण (महाराष्ट्र राज्य) 9921042422

Write to : hr.shankarchavan@gmail.com

*****

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..